सुहास पाटील

न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड ( NIACL) (भारत सरकारचा उपक्रम), मुंबई. ३०० असिस्टंट (क्लास III कॅडर) पदांची भरती. ( Ref. No. CORP. HRM/ Asstt/२०२३ २९.०१.२०२४) पदाचे नाव – असिस्टंट (क्लास III कॅडर). एकूण रिक्त पदे – ३०० (अजा – ६८, अज – ४३, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – ३०, खुला – १४९)

foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील (कंसात स्थानिय भाषा दिलेली आहे.) – महाराष्ट्र (मराठी) – ८१ पदे (अजा – २१, अज – ९, इमाव – ०, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ४३) (४ पदे दिव्यांगसाठी राखीव) (कॅटेगरी VI/ HI/ OC, ID/ MD साठी प्रत्येकी १ पद); गोवा (कोंकणी) – १ पद (खुला); गुजरात (गुजराती) – २४ पदे. कर्नाटक (कन्नड) – १७ पदे; मध्य प्रदेश (हिंदी) – ९ पदे; राजस्थान – ५ पदे (हिंदी); उत्तर प्रदेश – १४ पदे (हिंदी); उत्तराखंड – ५ पदे (हिंदी) इ.

पात्रता – (दि. १ जानेवारी २०२४ रोजी) कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. (उमेदवार १० वी/ १२ वी/ पदवी स्तरावर इंग्रजी विषयात उत्तीर्ण असावा. तसेच स्थानिय भाषा अवगत असावी. (लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक.))

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२४ रोजी) २१ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे) (पुनर्विवाह न केलेल्या विधवा/ घटस्फोटीत/ कायद्याने विभक्त महिला – ५ वर्षे; NIACL चे कर्मचारी – ५ वर्षे).

हेही वाचा >>> RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदासाठी होणार मेगा भरती; उमेदवार ‘या’ तारखेपासून करू शकतात अर्ज

वेतन – बेसिक पे रु. २२,४०५/, अंदाजे दरमहा वेतन रु. ३७,०००/.

निवड पद्धती – टियर-१ – प्रीलिमिनरी ऑनलाइन एक्झामिनेशन – ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० गुणांसाठी (इंग्लिश लँग्वेज – ३० गुण, रिझनिंग अॅबिलिटी – ३५ गुण, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ३५ प्रश्न, प्रत्येकी वेळ २० मिनिटे, एकूण वेळ १ तास.)

टियर-२ – मेन एक्झामिनेशन – ऑब्जेक्टिव्ह टेस्ट २५० गुणांसाठी आणि डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट ३० गुणांसाठी.

ऑब्जेक्टिव्ह टेस्ट – २०० गुण, वेळ २ तास ३० मिनिटे. (रिझनिंग – ४० प्रश्न, ५० गुण; इंग्लिश लँग्वेज – ४० प्रश्न, ५० गुण; जनरल अवेअरनेस – ४० प्रश्न, ५० गुण; न्यूमरिकल अॅप्टिट्यूड – ४० प्रश्न, ५० गुण; कॉम्प्युटर नॉलेज – ४० प्रश्न, ५० गुण)

डिस्क्रीप्टिव्ह टेस्टचा कालावधी ३० मिनिटे. गुण – ३०. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज. (लेटर रायटींग – १० गुण, निबंध लेखन – २० गुण) डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपरमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

अंतिम निवड – स्थानिय भाषेच्या पेपरमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची निवड यादी वैद्याकिय तपासणीनंतर ऑनलाइन मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.

टियर-१ – पूर्व परीक्षा केंद्र – महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/नवी मुंबई/ठाणे/ टटफ, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी.

प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग – अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग उमेदवारांना प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंगकरिता ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी लागेल.

प्रोबेशन कालावधी ६ महिन्यांचा असेल जो आणखीन वाढविला जावू शकतो.

अर्जाचे शुल्क – अजा/ अज/ दिव्यांग रु. १००/- इतर उमेदवारांना रु. ८५०/-.

ऑनलाइन अॅप्लिकेशन रजिस्ट्रेशन http://newindia.co.io या संकेतस्थळावर दि. १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावे. टियर-१ परीक्षा दि. २ मार्च २०२४ रोजी घेतली जाईल.