फारुक नाईकवाडे

अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे मागील लेखामध्ये पाहिले. प्रत्यक्ष तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू.

Education Opportunities at Bhabha Atomic Research Centre mrj 95
शिक्षणाची संधी : बी.ए.आर.सी.मधील संधी
UPSC Preparation Late Ancient and Early Medieval History
UPSC ची तयारी : उत्तर प्राचीन आणि आद्या मध्ययुगीन इतिहास
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण
mpsc main exam 2025 will be conducted in descriptive mode
विश्लेषण : ‘एमपीएससी’च्या वर्णनात्मक परीक्षेचे स्वरूप कसे असेल?
pandharpur Six idols found marathi news
Video: पंढरीच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात सहा मूर्ती सापडल्या
MPSC Verdict on confusion in Clerk Typist exam Nagpur
एमपीएससी: लिपिक-टंकलेखक परीक्षेतील गोंधळाबाबत मोठा निर्णय; ‘या’ उमेदवारांना कारवाईचा इशारा
MPSC, exams, postponed,
एमपीएससीच्या तीन परीक्षा लांबणीवर, आता परीक्षा कधी होणार?
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्रा  बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

या घटकाबाबत प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येते की जागतिक आणि भारतातील चालू घडामोडी असे ढोबळ वर्गीकरण केलेले असले तरी या घटकामध्ये ब-यापैकी व्यापक बाबी समाविष्ट होतात, त्या पुढीलप्रमाणे:

जागतिक चालू घडामोडी

● यामध्ये क्रीडा, पुरस्कार, संमेलने, विज्ञान, व्यक्तिविशेष याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बाबी येतात.

● विश्व चषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत / महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

● साहित्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार, चर्चेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चर्चेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी पहाव्यात.

● चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.

● भारतातील व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्या बाबतची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : बी.ए.आर.सी.मधील संधी

● नैसर्गिक आपत्ती, वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक / खगोलशास्त्रीय / लक्षणीय पर्यावरणीय घटना यांबाबत मूलभूत व संकल्पनात्मक माहिती करून घ्यावी.

● खगोलशस्त्रीय शोध, वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानविषयक अद्यायावत माहिती, भारताचा सहभाग असलेले महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प यांवा आढावा घ्यावा.

● महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना, परिषदा त्यांमधील भारताची भूमिका, झालेले ठराव / निर्णय, व इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यावा.

भारतातील चालू घडामोडी:

● राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, त्यातील विजेते, महाराष्ट्राची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

● राष्ट्रीय स्तरावरील साहित्य, चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार तसेच पद्मा पुरस्कार, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.

हेही वाचा >>> UPSC ची तयारी : उत्तर प्राचीन आणि आद्या मध्ययुगीन इतिहास

● महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने यांची माहिती असायला हवी.

● चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती यांचा आढावा घ्यायला हवा.

● सामान्य अध्ययन घटकांशी संबंधित चालू घडामोडी

उमेदवारांना घटक विषयांचे पारंपरिक ज्ञान असणे आणि त्या त्या विषयाची समज असणे अपेक्षित असले तरी त्यापुढे जाऊन त्यांना आपल्या परिवेशाबाबत अद्यायावत माहिती असणे आणि तिच्याबाबत त्यांनी जागरूक असणेही आयोगाला अपेक्षित आहे. त्या दृष्टीने चालू घडामोडी हा घटक म्हटले तर वेगळा आणि म्हटले तर इतर घटक विषयांचा संदर्भ असा विचारात घेता येतो.

अनेक जागतिक घटनांचा प्रभाव भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांवर पडत असतो. या सर्व बदलांचे प्रतिबिंब ‘सामान्य अध्ययन’ प्रश्नपत्रिकेत उमटते. हे लक्षात घेऊन चालू घडामोडींची तयारी करताना एका बाजूला स्वतंत्र चालू घडामोडी, तर दुसऱ्या बाजूला त्या त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करणे आवश्यक आहे. यामध्ये समाविष्ट होऊ शकणारे मुद्दे पुढीलप्रमाणे:

यामध्ये भारताचे द्विपक्षीय तसेच संघट्ना सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध, निवडणुका, नवीन विधेयके, धोरणे, कायदे या राज्यव्यवस्था घटकाशी संबंधित बाबी पहायला हव्यात.

नैसर्गिक आपत्ती, वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक घटना, त्यांची वैशिष्ट्ये समजून घ्यावीत.

आर्थिक विकास दर, वेगवेगळे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय निर्देशांक, जनगणना, बँक दर, जीएसटी, आर्थिक क्षेत्रातील नवे निर्णय, जीडीपी, जीएनपी यांची अद्यायावत माहिती असायला हवी.

विविध शासकीय योजना, त्यांच्या तरतुदी, लाभार्थी यांचा आढावा घ्यायला हवा.

सामान्य ज्ञान स्वरुपाची माहिती

यामध्ये खेळांचे नियम, लोकपरंपरा, सर्वात मोठे / लहान भौगोलिक क्षेत्र, शहरांची उपनावे, प्रसिद्ध व्यक्तींची अवतरणे अशासारखे मुद्दे विचारले जाऊ शकतात. मागील काही वर्षांपासून अशा स्वरुपाचे अॅबस्ट्रक्ट प्रश्न विचारण्याचे प्रमाण खूपच नगण्य झाले आहे. त्यामुळे हे प्रश्न ऑप्शनला टाकून तयारी करणे जास्त व्यवहार्य ठरेल.

अभ्यासासाठी विभागणी केली तरी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नप्रत्रिका अभ्यासणे आवश्यक आहे. त्याकरता प्रश्नप्रत्रिकांचे नियमित वाचन करायला हवे. प्रश्नांचे स्वरूप लक्षात आले की, नेमके काय वाचायला हवे, ते कळते. वृत्तपत्रांतील बातमी आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक ‘माहिती’ यातला फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.

बरेच वेळा चालू घडामोडींच्या तयारीसाठी नेमका आणि खात्रीशीर पर्याय कोणता याबाबत उमेदवार गोंधळात असतात. बाजारात उपलब्ध स्त्रोतांमधून पुरस्कार, स्पर्धा, नवे शोध, संमेलने अशा पद्धतीची पूर्णत: वस्तुनिष्ठ मुद्द्यांची तयारी होऊ शकेल. पण विश्लेषणात्मक मुद्यांसाठी मूळ दस्तावेज, अधिकृत संकेतस्थळे यांतून तयारी करणे जास्त उपयोगी ठरते.