विक्रांत भोसले

विद्यार्थी मित्रहोआपण आज काही तत्त्वज्ञानात्मक निबंधांची चर्चा करणार आहोत. मागील लेखामधील निबंधाची चर्चा पूर्ण करणार आहोत. परंतु यापूर्वी या निबंधांच्या तयारीसाठी काय प्राथमिक वाचन करणे आवश्यक आहे, हे थोडक्यात पाहणे गरजेचे आहे.

Art and Culture with Devdutt Pattanaik | How pottery offers glimpses of cultures
देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | मातीची भांडी संस्कृतीची झलक कशी देतात?  
state bank of india research report on mrp
विश्लेषण : हमीभावाचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत आहे?
Today is July 21 birthday of the pioneer of employment guarantee scheme V S Page
वि. स. पागे : ज्ञानवंत कर्मयोगी
समरार्थ फिक्शन...
समरार्थ फिक्शन…
article about veteran feminist writer vidyut bhagwat career journey
व्यक्तिवेध : विद्युत भागवत
loksatta kutuhal using artificial intelligence to write a dialogue
कुतूहल : लिखित संवाद कृत्रिम बुद्धिमत्ता
book information nexus by author yuval noah harari
बुकमार्क : हरारीच्या पुस्तकात नवं काय?
Ancient 'scholar warriors' now in the Indian Army; What exactly is this concept?
प्राचीन ‘विद्वान योद्धा’ आता भारतीय लष्करात; काय आहे नेमकी ही संकल्पना?

या तयारीसाठी तत्त्वज्ञानाचा, मग ते भारतीय असो वा पाश्चात्य, थोडक्यात इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये काही इंग्रजी पुस्तकांचा उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, 1. Sophiel s world – Jostein Gaarder 2. An Introduction to Indian Philosophy – Datta and Chatterji ( first two chapters) तसेच भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली 1. Discovery of India 2. Glimpses of World History ही पुस्तके आपल्याला इतिहासाकडे विवेकवादी भूमिकेने कसे पाहायचे हे सांगतात. तसेच बर्ट्रांड रसेल (Bertrand Russell) या तत्त्ववेत्त्याने शिक्षण, विज्ञान, आनंद आणि तत्सम विषयांवर लिहिलेले निबंधदेखील या कामी येऊ शकतात. तसेच विविध वृत्तपत्रांमध्ये मानवी जीवन आणि त्याबद्दलच्या अमूर्त कल्पना यांवर येणारे लेख आवर्जून वाचावेत. यातून देखील तत्त्वज्ञानात्मक संकल्पना आणि त्यांवरील विषयांची चर्चा करण्याची तयारी करता येते.

हेही वाचा >>> नववी ते १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची ओपन बुक परीक्षा होणार?CBSE यंदा नोव्हेंबरमध्ये करणार प्रयोग, काय बदलणार?

आता आपण निबंधांची थोडक्यात चर्चा करूया. आधी आपण मागील लेखातील निबंध पाहूया.

Topic 1 – Thinking is like a game, it does not begin unless there is an opposite team.

विषय 1 – विचार हा खेळासारखा आहे, विरोधक संघ असल्याशिवाय त्याची सुरुवात होत नाही.

कारणमीमांसा :

• विरोधक हा बऱ्याचदा धोका समजला जातो आणि त्यातून आत्मपरीक्षण करण्यास सुरुवात होऊन, आपल्या म्हणण्याची पुष्टी करण्यासाठी मनात रुतून बसलेल्या समजेवर वा श्रद्धांवर नव्याने विचार करणे सुरू होते.

• समाजातील एक दुसऱ्याशी चढाओढ करणाऱी कथने आणि विचारधारा ज्यामुळे चिकित्सक परीक्षण व त्यासाठी आवश्यक बनणारी विचार करण्याची गरज यामुळे देखील हे काहीवेळा घडते.

• काही वेळा लोकांचे जगणेच धोक्यात येऊन त्यांना नव्या पद्धतीने विचार करणे भाग पडते.

• विचारांची देवाणघेवाण होऊन एखाद्या गोष्टीबद्दलची परस्परविरोधी मते आणि वैविध्यपूर्ण दृष्टिकोन समोर येतात आणि एकप्रकारे त्यांची योग्यायोग्यता ठरविण्याचा खेळ सुरू होतो.

विरोधक नसताना लोक विचार का टाळतात?

• सुरक्षित व सहजता देणाऱ्या कवचामुळे

• सामाजिक प्रभावामुळे.

• निहित स्वार्थामुळे.

• आज्ञापालनाचा धाक दाखविणाऱ्या अधिकार व्यक्तीच्या रोषाला सामोरे जाण्याच्या भीतीमुळे.

हेही वाचा >>> Central Bank Apprentice Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘शिकाऊ उमेदवार’ पदांसाठी मेगा भरती, आताच अर्ज करा

निष्कर्ष :

विचार करणे थांबवणे म्हणजे जगणे थांबवणे होय. कारण सॉक्रेटिसने म्हटल्याप्रमाणे, ‘‘परीक्षण न करता जगलेले जीवन हे बिनकामाचे जगणे असते.’’ पण इथे प्रश्न असा आहे की, आपल्याला विचार करायला भाग पाडण्यासाठी बाह्य परिस्थितीची वाट का पाहावी. विचार करण्याची प्रक्रिया स्वयंप्रेरित असू शकते. यासाठी आपल्या जीवनात आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या, मग ते कुटुंब, समुदाय किंवा राष्ट्र किंवा जग असोत, आपल्या जीवनात सुधारणा करण्यासाठी तर्कशुद्ध आणि चिकित्सकपणे विचार करण्याची सवय लावण्याची गरज आहे. शेवटी आपले ब्रीदवाक्य ‘वसुधैव कुटुंबकम’ हेच आहे आणि आपण आपल्या या मोठ्या कुटुंबाची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी विचार करण्याच्या या खेळाचा वापर करू शकतो.

Topic 2 – Visionary decision- making happens at the intersection of intuition and logic.

विषय 2 – अंतर्ज्ञान आणि तर्क या दोन बाबींची गाठ एकदुसऱ्याशी जिथे पडते (छेदनबिंदू), त्या ठिकाणी दूरदर्शी निर्णय घेण्याची क्रिया घडते.

अर्थस्पष्टीकरण :

• प्रत्येक समाजाला अशा लोकांची गरज असते, जे मोजकेच असतात, पण समाजाच्या भविष्याची फक्त कल्पनाच करू शकत नाहीत तर त्याला आकार देण्याची कुवत बाळगून असतात. हे लोक दूरदर्शी नेते म्हणून ओळखले जातात.

• तथापि, हे दूरदर्शी निर्णय घेणे आपोआप होत नाही. आपल्या सभोवतालच्या मानवी जीवनाची आणि समाजाची सर्वांगीण समज असणे आवश्यक आहे.

• अशा व्यक्तीकडे एक सुसंगत आणि सुदृढ तत्त्वज्ञानात्मक समज असणे आवश्यक असते, जी एखाद्या नेत्याला भविष्यातल्या घडामोडी समजून घेण्यासाठी आणि त्याला आकार देण्यासाठी धोरण तयार करण्यात मदत करेल.

• तथापि, भविष्याबद्दलची ही समज कधीकधी त्यांच्या मनात अस्पष्टपणे चमकते. आम्ही याला अंतर्ज्ञान किंवा अंत:प्रेरणा म्हणतो, ज्याद्वारे त्यांना असे समजते की, भविष्यात अशी विशिष्ट धोरणे, तत्त्वे आणि मूल्यांची गरज असेल. तथापि, त्यांना हे देखील कळते की अशी दृष्टी तर्कशुद्धपणे विचार करण्यातूनच येऊ शकते.

• तर्काचा अवलंब करूनच ते त्यांच्या दृष्टीची सांगड वर्तमान वास्तवाशी घालतात. यामुळे त्यांच्या दृष्टीमध्ये एक प्रकारचा ठामपणा निर्माण होतो.

• अशारितीने, ते त्यांची दृष्टी साकारण्याच्या शक्यतेबद्दल स्वत:ला पटवून देऊ शकतात आणि नंतर ते त्यांच्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित करू शकतात.

कारणमीमांसा:

• केवळ तर्काचा वापर केल्याने स्वत:च्या किंवा इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाते.

• केवळ अंतर्ज्ञान वास्तववादी आणि दीर्घकालीन योजना तयार करण्यात अपयशी ठरते.

• दूरदर्शी निर्णय घेण्यासाठी अंतर्ज्ञान आणि तर्कशास्त्र यांची विवेकपूर्ण सांगड आवश्यक आहे.

• जे नेते त्यांच्या अंत:प्रेरणा आणि त्यांच्या विवेकशीलतेला योग्य स्थान देऊ शकतात, त्यांच्या बाबतीत असे घडते.

• लोकशाहीत नेत्यांनी मांडलेल्या दृष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी

सहमती निर्माण करणे आवश्यक आहे.

• तार्किक विचार आणि अंतर्ज्ञानी समज एक योग्य वातावरण तयार करते ज्यामध्ये लोक दृष्टीच्या वैधतेबद्दल विचार करतात आणि त्यातून प्रेरित होतात.

निष्कर्ष :

मनुष्यात जन्मजात अशी इच्छा असते की, त्यांच्या स्वत:च्या क्षमतांचा सर्वोच्च विकास व्हावा. काही लोकांमध्ये ही इच्छा सुप्त असते तर काहींमध्ये ती खूप सक्रिय असते. शिवाय, योग्य वातावरणाअभावी लोकांना त्यांच्यातील उच्च क्षमतेची जाणीव होऊ शकत नाहीत. हे योग्य वातावरण आपोआप निर्माण होऊ शकत नाही, पण जेव्हा सुजाण लोक समाजाचा कारभार हाती घेतात तेव्हा हे होऊ शकते. हे लोक असे असतात, ज्यांचे अंत:करण योग्य अंत:प्रेरणा जागवतात आणि त्यांचे प्रशिक्षित मेंदू त्यांच्या स्वप्नांना वास्तवाशी जोडतात. यामुळे सामाजिक प्रगती शक्य होते आणि अशी प्रगती होणे खूप इष्ट असते. विद्यार्थी मित्रहो, निबंध लेखन हे फक्त वाचानाद्वारे शिकता येत नाही. निबंध लेखनाचे आपण कितीही नियम शिकलो तरी जोपर्यंत आपण ते प्रत्यक्ष सरावातून लेखनात वापरत नाही तोपर्यंत खरी तयारी होणार नाही. अशा तयारीसाठी तुम्हा सर्वांनी फक्त आयोगाने दिलेल्या विषयांवर लिहिण्याचा सराव करावा.