निलेश देशपांडे

मागील दोन लेखामध्ये आपण केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेतील अनिवार्य मराठी पेपरचे स्वरूप व पेपरची तयारी कशी करावी? व त्यासाठी लागणारी कौशल्ये कोणती? या घटकांवर सविस्तर चर्चा केली. आजच्या या तिसऱ्या लेखामध्ये आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाचा २०२३ चा मुख्य परीक्षेचा अनिवार्य मराठी पेपर व त्याचे स्वरूप यावर सखोल चर्चा करणार आहोत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
farmer suicide sharad pawar
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर – शरद पवार

आपणास मागील लेखांमधून हा अंदाज आलेलाच आहे की एकूण प्रश्न किती? त्याचे गुणांकन कसे असते? आपणास प्रश्न क्रमांक एक मध्ये एकूण चार विषय दिलेले आहेत. या दिलेल्या चार विषयांपैकी एका विषयावर आपणास ६०० शब्दात निबंध लिहिणे अनिवार्य आहे. यासाठी एकूण शंभर गुण आहेत. निबंध लेखनाच्या तयारीचा फायदा आपणास निबंध लेखनाचा जो स्वतंत्र पेपर आहे त्यामध्ये नक्कीच होतो. चार विषय पुढीलप्रमाणे दिलेले आहेत.

१) उपभोक्तावादी जीवनशैली व पर्यावरण

२) मोबाइल फोनचे व्यसन

३) ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा

४) दहशतवाद : एक आव्हान

निबंध लेखन करण्यासाठी तयारीचे जसे टप्पे आहेत तसेच लेखनाचे काही नियम पाळणे आवश्यक आहेत. निबंध कोणता लिहायचा हे अगोदर निश्चित करा. एकदा आपण निबंध कोणता लिहायचा हे ठरवले की त्याचे कच्चे मुद्दे तयार करा. कच्च्या पानावर कच्चे मुद्दे लिहून त्यांचा योग्य तो क्रम लावा. त्यानंतर जो निबंध तुम्ही लिहिणार आहात त्याचे शीर्षक लिहा. शीर्षक लिहिताना ते जसेच्या तसे लिहा. शीर्षकात उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह इ. जे चिन्ह असेल ते न चुकता द्या. पुढील सर्वांत महत्त्वाची पायरी म्हणजे आता तुम्ही निबंध कागदावर उतरवणार आहात. निबंध लेखनाची मुख्य त्रिसूत्री पुढीलप्रमाणे आहे.

१) प्रस्तावना (Introduction)

२) मुख्य गाभा (Main Body)

३) समारोप (Conclusion)

कोणताही निबंध लिहिताना वरील त्रिसूत्री पाळा :

१) प्रस्तावना (Introduction) : प्रस्तावनेमध्ये निबंधाच्या शीर्षकाचा समावेश होतो. प्रस्तावना अत्यंत दर्जेदार असावी. प्रस्तावनेमध्ये तुम्ही अनुभव, गोष्ट, अभंग इ. वर्तमानपत्रातील बातमीचा दाखला देऊन अशा कोणत्याही प्रकारे प्रस्तावना करू शकाल. प्रस्तावना हे निबंधाचे प्रथम दर्शन असते. ते दर्जेदार असायलाच हवे. एखाद्या सिनेमाचा टिझर पाहून आपण चित्रपट पाहायचा की नाही ठरवतो. तसे प्रस्तावना पाहून वाचकास पुढील निबंधात काय असेल? याची उत्सुकता लागली पाहिजे. First Impression is last Impression ते First Impression म्हणजे प्रस्तावना होय.

२) मुख्य गाभा घटक ( Main Body) : आपण प्रथमत: जे कच्चे मुद्दे तयार करून त्यांचा क्रम लावला आहे. ते क्रम लावलेले सर्व मुद्दे क्रमाने एक-एक करून मांडावेत. मुद्दे एकमेकांत गुंफताना मुद्द्यांची गुंफण एवढ्या सहजतेने करा की वाचणाऱ्याला पुढे-पुढे वाचत राहू वाटेल. एखाद्या फाटलेल्या सदऱ्याला आजी रफू करते. ती अशा प्रकारे करते की ते कापड रफू केले आहे याचा बघणाऱ्याला प्रथमदर्शनी अंदाजदेखील येत नाही. मित्रांनो, अगदी याचप्रकारे एक-एक मुद्दा एकमेकांत सहजतेने गुंफा. शक्य असेल आणि गरज असेल तर नक्कीच कविता, अभंग, श्लोक यांचा गरजेपुरता उपयोग करा. प्रमाणापेक्षा जास्त कविता, अंलकारीक भाषा वापरू नका. एकही मुद्दा सुटणार नाही, याची काळजी घ्यावी. शब्दांचे बंधन आहे, हे लिहिताना लक्षात ठेवावे.

३) समारोप (Conclusion) : निबंधाचा शेवट केल्याशिवाय आपण थांबू नये. एक स्वतंत्र परिच्छेद करून समारोप करावा. समारोप हा अत्यंत दर्जेदार असावा व समारोप सकारात्मक संदेश देणारा असावा. समारोपामधून तुम्ही त्या विषयासोबतच इतर मुद्दयांवरदेखील किती सकारात्मक आहात याचे दर्शन होते.

आता २०२३ च्या पेपरमध्ये विचारलेले विषय व त्यात अभिप्रेत असणारे मुद्दे विचारात घेऊ.

उपभोक्तावादी जीवनशैली व पर्यावरण

मुद्दे – उपभोक्तावादी जीवनशैली म्हणजे काय?; पर्यावरण; प्रदूषण; चंगळवाद; बदललेली जीवनशैली; बदललेल्या गरजा; अनावश्यक ऱ्हास; पर्यावरणाचा ऱ्हास; परिणाम; उपाय; उदाहरणे; समारोप.

मोबाइल फोनचे व्यसन :

मुद्दे – अनावश्यक वापर; ऑनलाइन गेम (पब्जी); व्हाट्सअप, फेसबुक, यूट्युब इ. शरीरावर होणारे परिणाम; मानसिक स्वास्थ्य; कारणे; उपाय; पालकांची जबाबदारी; शिक्षक, शाळा, महाविद्यालयांची जबाबदारी; चंगळवादी जगणे; समारोप.

ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा :

मुद्दे –गरज; फायदे; मर्यादा; उपाय; पाल्यांची जबाबदारी; पालकांची जबाबदारी; शिक्षकांची जबाबदारी; संधी व आव्हाने; आरोग्यावर होणारे परिणाम; उपाय; समारोप.

दहशतवाद एक आव्हान :

मुद्दे –दहशतवाद म्हणजे काय?; कारणे (आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक इ.); परिणाम; उपाय; शिक्षणाचे महत्त्व; जनजागृती; उदाहरणे; समारोप. वरील निबंध व त्या विषयांचा विचार करता एक मुख्य बाब लक्षात येते की, विद्यार्थ्यांनी भावी अधिकारी या नात्याने वर्तमानपत्र वाचले पाहिजे. एक मराठी वृत्तपत्र व एक इंग्रजी वृत्तपत्र अनुक्रमे दैनिक लोकसत्ता व इंडियन एक्स्प्रेस किंवा द हिंदू रोज वाचावे. लोकसत्ता पेपरची विशेष पुरवणी आवर्जून वाचावी. इतर पाच प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे नक्कीच भाषा कौशल्ये व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा सातत्याने आढावा घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण सामान्य अध्ययनाची जी संदर्भ पुस्तके अभ्यासतो ती पूरक ठरतात.