विक्रांत भोसले

विद्यार्थी मित्रहोआज आपण सामाजिक मानसशास्त्र या विषयातील भावनिक बुद्धिमत्ता या घटकावर नितीशास्त्राच्या ( Ethics) पेपरमध्ये कसे प्रश्न येतात आणि त्यासाठी काय तयारी करावे लागते याची चर्चा करणार आहोत.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
Archaeological Survey of India
विश्लेषण: भारतीय संस्कृती संबंधित १८ स्मारके चक्क गायब! भारतीय पुरातत्त्व खातं याला किती जबाबदार?

भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व मानवी जीवनामध्ये अगदी सुरुवातीपासून राहिलेले आहे. डार्विनच्या निरीक्षणानुसार, ‘‘भावनांना शरीरशास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे.’’ म्हणजेच भावना ह्या शरीर टिकवून ठेवण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. परंतु हे नेहमीच खरे ठरेल असे नाही. कारण कधी कधी भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेणे वा कृती करणे हे विघातक ठरू शकते. जसे की रागाच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय बऱ्याचदा पश्चाताप करायला लावतात. म्हणूनच भावनांना समजून घेणे आणि त्यांवर नियंत्रण ठेवणे अपरिहार्य ठरते.

प्रशासकीय कामकाजाचा मुख्य भाग म्हणजे इतरांकडून यशस्वीपणे काम करून घेता येणे. परंतु हे नेहमीच विवेकीपणे करता येत नाही. कधी कधी स्वत:मध्ये आणि इतरांमध्ये परिस्थितीनुसार विविध भावनांचा उदय होतो. आणि अशावेळी बौद्धिक कामे करणे कठीण होते. भावनिक बुद्धिमत्ता ही आपल्याला अशा परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनवू शकते. बऱ्याच संशोधकांच्या अभ्यासानंतर एक निष्कर्ष असा निघाला आहे की ज्याचा भावनिक बुद्ध्यांक (EQ) चांगला आहे, तो आपल्या बुद्धिमत्तेचा (IQ) उत्तम वापर करू शकतो.

अशा ह्या संकल्पनांचे आकलन विद्यार्थ्यांना आहे का आणि त्याचे उपयोजन करता येते का आणि त्यावर आधारित समस्या सोडवता येतात का हे सर्व आयोगाच्या परीक्षेमध्ये तपासले जाते आणि तशा अर्थाचे प्रश्न विचारले जातात वा तसे केस स्टडीज येतात. आता आपण २०२३ च्या मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाची चर्चा करूयात.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : आर्मी सर्व्हिस कॉर्प्समधील संधी

Q. kk What really matters for success, character, happiness and lifelong achievements is a definite set of emotional skills – your EQ – not just purely cognitive abilities that are measured by conventional IQ tests.ll Do you agree with this view? Give reasons in support of your answer. (150 words, 10 marks)

प्र. ‘‘यश, चारित्र्य, आनंद आणि शाश्वत अशा महान कार्यासाठी काय खरे महत्त्वाचे असते तर ते म्हणजे भावनिक कौशल्यांचा एक नेमका संच-तुमचा भावनिक बुद्ध्यांक – न की फक्त बौद्धिक क्षमता की जी पारंपरिक बुद्ध्यांक चाचण्याद्वारे मोजली जाते.’’ या मताशी तुम्ही सहमत आहात का? तुमच्या उत्तराच्या समर्थनासाठी कारणे द्या. (१५० शब्द, १० गुण)

(उत्तरासाठी सूचना — या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी Peter Salovey आणि John Mayer तसेच Daniel Goleman यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या प्रारूपांचा वापर करून उत्तर देणे जास्त अचूक राहील. त्यांनी नमूद केलेल्या क्षमतांचा आणि आयामांचा संबंध थेट यश, चारित्र्य, आनंद आणि शाश्वत महान कार्य यांच्याशी कसा आहे, हे दाखवणे आणि त्याची कारणे देणे हे एक चांगले उत्तर लिहिण्यासाठी आवश्यक राहील. ऐतिहासिक वा चालू घडामोडीतील उदाहरणे देऊन लिहिलेल्या युक्तिवादाचे समर्थन केले की उत्तराचा समारोप करता येईल.)

उत्तर – मानवी जीवनामध्ये यश प्राप्त करणे, चारित्र्याची जडणघडण होणे, आनंद अनुभवाने वा अनुभवता येणे याचा घनिष्ट संबंध हा इतरांशी असलेल्या नातेसंबंधाच्या असलेल्या दर्जाशी आहे. कारण इतरांच्या योगदानाशिवाय हे सर्व प्राप्त करणे हे जवळजवळ अशक्यच आहे. आणि जर एखादे शाश्वत महान कार्य करायचे असेल तर त्यासाठी आवश्यक लागणाऱ्या क्षमता विकसित करणे आणि योग्य पाठिंबा असणे हेही नाते संबंधांवर अवलंबून असते. या बाबतीत फक्त बुद्धिमत्ता असणे पुरेसे ठरत नाही. बुद्धिमत्तेमुळे पुस्तकी वा तांत्रिक ज्ञान प्राप्त तर होईल पण त्याचे यशस्वी उपयोजन करायचे असेल तर इतरांचे सहकार्य हे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> Arogya Vibhag Bharti 2024 : आरोग्य विभागामध्ये १,७२९ पदांची मेगा भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

परंतु इतरांशी जर योग्य नातेसंबंध प्रस्थापित करून वरील सर्व उद्दिष्ट साध्य करायची असतील तर स्वत:च्या आणि इतरांच्या भावना ओळखता आल्या पाहिजेत. त्यांचे अचूक आकलन करता आले पाहिजे. वयानुसार काळानुसार स्वत:च्या आणि इतरांच्या भावनिक प्रतिसादांमध्ये कसे बदल होतात, हे ओळखता आले पाहिजे. नकारात्मक आणि सकारात्मक भावनांचा वापर करून गुंतागुंतीची कामे करता आली पाहिजेत. तात्पुरत्या आणि लगेच मिळणाऱ्या सुखांना बाजूला ठेवून शाश्वत मूल्यांचा पाठपुरावा करता आला पाहिजे. यासाठी ‘स्व’ची जाणीव असली पाहिजे, ‘स्व’चे व्यवस्थापन करता आले पाहिजे, तसेच सामाजिक जाणीव असली पाहिजे आणि सामाजिक कौशल्य जसे की वाटाघाटी करता येणे, सामाजिक प्रभाव पाडता येणे, नेतृत्व करते येणे हे सर्व जमले पाहिजे. या सर्व क्षमतांना एकत्रितपणे भावनिक बुद्धिमत्ता असे म्हणतात.

या क्षमतेबाबत एक चांगली गोष्ट म्हणजे वयाच्या अगदी शेवटपर्यंत भावनिक बुद्धिमत्ता विकसित व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करता येतात आणि त्याला यशही मिळू शकते. या पुढील लेखामधे आपण प्रशासनातील सचोटी या घटकावर आलेल्या प्रश्नांची त्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीच्या रणनीतीची चर्चा करणार आहोत.