सुहास पाटील

वयोमर्यादा – (दि. १२ मे २०२३ रोजी) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर पदासाठी १८ ते २७ वर्षे, इतर पदांसाठी १८ ते २५ वर्षे.

Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया
RBI Orders, Special Audit, Norm Violations IIFL Finance, JM Financial Products limited, finance,
आयआयएफल, जेएमएफपीएलचे रिझर्व्ह बँकेकडून विशेष लेखापरीक्षण
student preparing for JEE exam
झोपण्यासाठी फक्त ४ तास, JEE परिक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्याचे वेळापत्रक पाहून जेईईच्या उमेदवारांना धक्का बसेल

कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे, माजी सैनिक – सैन्य दलातील सेवाकाल ३ वर्षे.

वेतन – पद क्र. ३ MTS (चौकीदार), पद क्र. ४ ट्रेड्समन मेट, पद क्र. ७ क्लिनर पदांसाठी वेतनश्रेणी – १ रु. १८,०००/- अधिक रु. ८,२८०/- महागाई भत्ता अधिक इतर भत्ते.

पद क्र. २, ५, ६ व ९ साठी पे-लेव्हल – २ रु. १९,९०० अधिक रु. ९,१५४/- महागाई भत्ता अधिक इतर भत्ते.

पद क्र. १४ फायर इंजिन ड्रायव्हर पदांसाठी वेतन श्रेणी-३ रु. २१,७०० अधिक रु. ९,९८२/- महागाई भत्ता अधिक इतर भत्ते.

पद क्र. ८ ते १० साठी दिव्यांग उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र नाहीत.

हेही वाचा >>> Arogya Vibhag Bharti 2024 : आरोग्य विभागामध्ये १,७२९ पदांची मेगा भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

निवड पद्धती – सर्व पदांसाठी उमेदवारांना टेक्निकल ट्रेड टेस्ट, फिजिकल टेस्ट (लागू असल्यास) उत्तीर्ण केल्यास लेखी परीक्षा द्यावी लागेल. ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा ( MCQ) (१) जनरल इंटेलिजन्स ॲण्ड रिझनिंग २५ प्रश्न, (२) जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, (३) जनरल इंग्लिश – ५० प्रश्न, (४) न्यूमरिकल ॲप्टिट्यूड – २५ प्रश्न. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण १५० प्रश्न, १५० गुण, वेळ २ तास. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. प्रश्नपत्रिका हिंदी/ इंग्रजी भाषेत असेल.

अर्जाचा नमुना आणि परीक्षेचा अभ्यासक्रम एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १३-१९ जानेवारी २०२४ च्या अंकातील विस्तृत जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

अर्जाच्या लिफाफ्यावर काय लिहावयाचे आहे, त्याचा नमुना (Format) जाहिरातीमधील ’ Appendix- Il मध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये दिल्याप्रमाणे विचारलेली माहिती लिहावयाची आहे.

१० वीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी नमूद केलेल्या रंगाच्या शाईने लिहाव्यात जसे की, ५० टक्क्यां पेक्षा कमी गुण असल्यास लाल रंगाच्या शाईने ५१-६० टक्के दरम्यानचे गुण असल्यास निळ्या रंगाच्या शाईने आणि ६१ टक्के आणि जास्त असल्यास काळ्या रंगाच्या शाईने लिहावे.

काढताना पुढील सूत्र वापरावीत.

i) परीक्षेत मिळालेले गुण परीक्षेसाठी असलेले एकूण गुण गुणिले १०० बरोबर गुणांचे टक्के

ii) CGPA करिता CGPA गुणिले ९.५ टक्के

iii) ग्रेडिंगकरिता ग्रेड अ बरोबर ९० – १०० टक्के मधील कमीत कमी गुण (९० टक्के) धरले जातील.

टक्केवारी लिहिताना आलेल्या ०.५ decimal point पेक्षा कमी असल्यास मागील अंक पकडावा. (जसे ४८.४९ टक्के साठी ४८ टक्के घ्यावे.) टक्केवारी लिहिताना आलेल्या गुणांत ०.५ decimal point पेक्षा जास्त असल्यास पुढील अंक पकडावा. (जसे ५०.५० टक्क्यांकरिता ५१ टक्के घ्यावे.)

अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावीत.

i) दोन स्वयंसाक्षांकीत केलेले फोटोग्राफ्स (मागील बाजूस स्वतचे नाव आणि वडिलांचे नाव लिहावे.)

ii) एक स्वत:चा पत्ता लिहिलेला Registered Envelope ज्यावर योग्य ते पोस्टाचे तिकीट लावलेले असावे.

iii) आवश्यक त्या सर्टिफिकेट्सच्या स्वयंसाक्षांकीत केलेल्या प्रती.

iv) अॅडमिट कार्ड (दोन प्रती) (जाहिरातीच्या Annexure- VI मध्ये उपलब्ध आहे.)

v) इमाव उमेदवारांनी Appendix IV मधील घोषणापत्र जोडावे.

विहीत नमुन्यातील अर्ज हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून भरावेत.

निवड झाल्यास उमेदवारांना कुठे नेमणूक हवी आहे, त्याचे तीन पसंतीक्रम अर्जात नमूद करावेत.

उमेदवारांना फक्त एकाच ट्रेडसाठी अर्ज करता येईल. अर्ज पुढील पत्त्यावर दि. २ फेब्रुवारी २०२४ पर्यंत स्वीकारले जातील. The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – २ ATC/ ASC Centre ( North) – १ ATC, Agram Post, Bangalore – ०७.