BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL )ने त्याच्या अधिकृत वेबसाइटवर प्रोजेक्ट इंजिनियर पोस्ट 1 साठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत संस्थेतील ११० जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना आनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख १७ मार्च २०२३ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BEL भरती २०२३ संबंधित शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पदांशी संबंधित शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध अधिसूचना पहावी लागेल. शिवाय अर्जाचा फॉर्म काळजीपुर्वक वाचल्यानंतरच अर्ज करा. अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी https://www.bel-india.in/ या अधिकृत लिंकला भेट द्या.

हेही वाचा- मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी बंपर भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

पदांची संख्या –

प्रोजेक्ट इंजिनियर पोस्ट १ – एकूण ११० जागांवर भरती.

शैक्षणिक पात्रता –

B.E/B.Tech/ B.Sc / इलेक्ट्रॉनिक्स/ दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/संगणक विज्ञान अभियांत्रिकी/माहिती विज्ञान/माहिती तंत्रज्ञान. पोस्टशी संबंधित पदांनुसार वरील इंजिनिअरिंगचं शिक्षण पुर्ण केलेलं असावं.

वयोमर्यादा –

प्रोजेक्ट इंजिनियर 1 पदाची वयोमर्यादा ३२ वर्षांपर्यंत देण्यात आली आहे. मात्र, संबंधित कास्टनुसार त्यात सुट देण्यात आली आहे.

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची सुरुवात – ३ मार्च २०२३
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस – १२ मार्च २०२३

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या – https://drive.google.com/file/d/1xyQv4MOaXdl9arRUmGzEAfLuoweQmH_2/view

महत्वाची कागदपत्रं –

हेही वाचा- ७ वी पास ते पदवीधारकांना पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; कॅन्टोन्मेंट बोर्डाने मागवले अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती

  • अर्जदारांचा बायोडेटा (Resume) फोटोसह भरलेला फॉर्म.
  • वयाच्या पुराव्यासंबंधी कागदपत्र.
  • BE/B.Tech/B.Sc अभियांत्रिकी प्रमाणपत्र.
  • सर्व सेमिस्टरच्या मार्कशीट.
  • जात प्रमाणपत्र (जर EWS/OBC/SC/ST/PWBD).
  • ओळखीचा पुरावा- आधार कार्ड /मतदार आयडी/ड्रायव्हिंग लायसन्स/इत्यादी.
  • २ पासपोर्ट साईझ फोटो
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bel recruitment 2023 for engineers to 110 post see more information on bharat electronics limited website jap
First published on: 07-03-2023 at 09:43 IST