Bharati Vidyapeeth Bharti 2023: पुण्यात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भारती विद्यापीठ पुणे येथे वित्त अधिकारी, परीक्षा नियंत्रक, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी या पदांसाठीच्या रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे यासाठीची अधिसूचना विद्यापीठाकडून जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना भारती विद्यापीठाच्या www.bvuniversity.edu.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. भारती विद्यापीठ पुणे भरती बोर्ड पुणे यांनी फेब्रुवारी २०२३ च्या जाहिरातीमध्ये विविध रिक्त जागांवर भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. तर उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत ही २८ फेब्रुवारी २०२३ ही असणार आहे. तर या पदासांठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्र याबाबतची माहिती जाणून घेऊया. हेही वाचा- आता दूर होणार नोकरीचं टेन्शन? हे डिप्लोमा कोर्स करा, IT सेक्टरमध्ये नोकरी पक्की, पगारही मिळणार तगडा प्रत्येक पदासाठीचे पात्रता निकष - वित्त अधिकारी - या पदासाठी उमेदवाराचे संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराला किमान अनुभव असणं आवश्यक आहे. परीक्षा नियंत्रक - संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आणि किमान अनुभव असणं गरजेच. प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी - संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आणि किमान अनुभव. हेही वाचा- BOI, IDBI, इंडियन बँकेत ७०० हुन अधिक पदांची बंपर भरती; लाखोंनी मिळवा पगार, जाणून घ्या तपशील कागदपत्र - उमेदवाराचा Resume (बायोडेटा) १० वी, १२ वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स इत्यादी…) उमेदवाराचे फोटो या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकला भेट द्या.