Cabinet Secretariat Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. कारण- मंत्रिमंडळ सचिवालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सचिवालय भरती २०२४ संदर्भात सचिवालयाने अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) पदांच्या एकूण १६० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून, या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा.

या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२४ आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंबंधीत अधिकृत जाहिरात नीट वाचावी. त्यातील पगार, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज शुल्क आणि इतर सर्व माहिती वाचल्यानंतरच अर्ज करावा.

पदाचा तपशील आणि संख्या (Cabinet Secretariat Recruitment 2024)

पदाचे नाव – डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)

१) Computer Science/IT – ८०
२) Electronics & Communication – ८०

एकूण पदसंख्या – १६०

शैक्षणिक पात्रता (Cabinet Secretariat Recruitment 2024 Education Qualification)

उमेदवार संबंधित विषयात B.E./ B.Tech. किंवा M.Sc. पदवी प्राप्त केलेला असावा. तसेच संबंधित विषयात GATE स्कोर असावा.

वयोमर्यादा (Cabinet Secretariat Recruitment 2024 Age Limit)

उमेदवाराचे वय २० ऑक्टोबर २०४ पर्यंत १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे. त्यात एससी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट आहे.

वेतन (Cabinet Secretariat Recruitment 2024 Salary)

निवड झालेल्या उमेदवारांना सर्व भत्त्यांसह दर महिना ९५ हजार रुपये पगार असेल.

हेही वाचा – CIDCO Lottery 2024 : सिडको लॉटरीसाठी कसा करावा ऑनलाइन अर्ज? आवश्यक कागदपत्रं अन् पात्रता काय? सर्वकाही वाचा एका क्लिकवर

अर्ज पाठविण्यासाठी अधिकृत पत्ता

उमेदवारांना पोस्ट बॅग नंबर, ००१, लोढी रोड हेड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली-११०००३ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २० ऑक्टोबर २०२५

अर्ज शुल्क – नाही

नोकरी ठिकाण : दिल्ली

महत्त्वाच्या लिंक (Cabinet Secretariat Recruitment 2024 Notification)

अधिकृत वेबसाईट
https://cabsec.gov.in/

अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1TfYTQB2xJPk0zX2t_In4IHTz0DjeMENC/view

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी
Cabinet Secretariat Recruitment 2024 Application Form