सुहास पाटील

‘जॉईंट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स – २०२४ (JAM 2024)’ (ऑर्गनायझिंग इन्स्टिटय़ूट) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास (IITM) रविवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेणार आहे. JAM 2024 मधून इकॉनॉमिक्स, विज्ञानामधील उच्च शिक्षणासाठी सन २०२४-२५ करिता प्रवेश दिले जातील.

students choose the US for overseas higher education
अग्रलेख : ‘आ’ आणि ‘उ’!
Growing digital divide in education
शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!
master of human capital management and employee relations affiliated to mumbai and nagpur university
शिक्षणाची संधी : एचआर’मधील संधी
Centers for training of medical teachers are insufficient in the state
राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…

IITs मध्ये अंदाजे ३,००० जागांवर प्रवेश दिला जाईल. (JAM 2024 स्कोअर आधारित IISC  आणि CCMN मध्ये २००० प्रवेश उपलब्ध आहेत.) JAM स्कोअर पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उपयोगी पडतो – (i) M.Sc., (ii) M.Sc. Tech., (iii) M.S. (Research), (iv) M.Sc. – M. Tech. dual degree, (v) Joint M.Sc. dual degree

(i) एम.एस्सी. (दोन वर्ष) प्रोग्राम : आयआयटी भिलाई, भुवनेश्वर, बॉम्बे, दिल्ली, (आयएसएम) धनबाद, गांधीनगर, गुवाहाटी, हैदराबाद, इंदौर, जम्मू, जोधपूर, कानपूर, खरगपूर, मद्रास, मंडी, पलाक्कड, पाटणा, रूरकी, रोपार, तिरूपती आणि (बीएच्यू) वाराणसी येथे.

(ii) जॉईंट एम.एस्सी. – पीएच.डी. प्रोग्राम : भुवनेश्वर, खरगपूर; एम.एस्सी. – पीएच.डी. डय़ूअल डिग्री प्रोग्राम – IIT – बॉम्बे, इंदौर, कानपूर आणि इतर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम्स २०२४-२५ साठी प्रवेश.

हेही वाचा >>> करिअर मंत्र

JAM-2024 स्कोअरवर आधारित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस (IISc. Bangalore) मध्ये इंटिग्रेटेड पीएच.डी. प्रोग्रॅमसाठी प्रवेश.

JAM-2024 परीक्षा IITM, मद्रास आयोजित करत आहे. यातून (१) केमिस्ट्री (CY), (२) बायोटेक्नॉलॉजी (BT), (३) फिजिक्स (PH), (४) मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स (MS), (५) मॅथेमॅटिक्स (MA), (६) जीऑलॉजी (GG), (७) इकॉनॉमिक्स (EN) या विषयांतील उच्च शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. अशा उमेदवारांना MHRD तर्फे आणि इतर गव्हर्नमेंट एजन्सीजकडून आर्थिक मदत दिली जाते.

JAM स्कोअर IISER मधील प्रवेशासाठी वापरला जातो.

पात्रता : संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण. (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. निकाल २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत सादर करणे आवश्यक.) IIT इंदौर, बॉम्बे आणि रुरकी येथील एम.एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी) प्रवेशासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र आहेत.

अर्जाचे शुल्क : महिला/ अजा/ अज/ अपंग यांना रु. ९००/- (एका पेपरसाठी) व रु. १,२५०/- (दोन पपर्ससाठी); इतर उमेदवारांना रु. १,८००/- एका पेपरसाठी व रु. २,५००/- दोन पेपर्ससाठी.

निवड पद्धती : JAM 2024 मध्ये ७ टेस्ट पेपर्स असतील. कालावधी – प्रत्येकी ३ तास. ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट (CBT) दि. ११ फेब्रुवारी २०२४ सेशन-१ साठी (सकाळचे सत्र) CY, GG, MA आणि सेशन-२ साठी (दुपारचे सत्र) BT, EN, MS, PH. एकूण ६० प्रश्न, १०० गुण. प्रत्येक पेपर ३ सेक्शन्समध्ये विभागलेला असेल. सेक्शन ‘ए’ एकूण ३० MCQ प्रश्न १० प्रश्न १ गुणांचे, २० प्रश्न २ गुणांचे. सेक्शन-बी – एकूण १० प्रश्न मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन (MSQ) एकापेक्षा अधिक उत्तरे असलेले. सेक्शन-सी – एकूण २० प्रश्न न्यूमरिकल आन्सर टाईप (NAT) प्रश्न. प्रत्येकी १० प्रश्न १ व २ गुणांसाठी. चुकीच्या उत्तराला प्रश्नासाठी असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.

उमेदवारांना ऑनलाइन व्हर्च्युअल (virtual) कॅल्क्युलेटर वापरता येईल.

ऑनलाइन पद्धतीने उमेदवार एका टेस्ट पेपरसाठी किंवा २ टेस्ट पेपरसाठी (पात्र असल्यास अधिकची फी भरून) अर्ज करू शकतात.

IIT, बॉम्बे झोनमधील परीक्षा केंद्र : अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, मुंबई / नवी मुंबई/ ठाणे, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे, गोवा, वडोदरा, अहमदाबाद इ. केंद्रांवर JAM 2024 परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांना एकाच झोनमधील ३ परीक्षा केंद्रांसाठी पसंतीक्रम द्यावयाचा आहे.

JAM 2024 मेरिट लिस्ट २२ मार्च २०२४ रोजी https://jam.iitm.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

JAM-2024 टेस्ट पेपर्स आणि इतर माहिती वेळोवेळी https://jam.iitm.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : अक्षय ऊर्जेचे स्रोत कोणते? भारतात अक्षय ऊर्जेच्या निर्मितीसाठी कोणते प्रकल्प राबवले जातात?

JAM-2024 परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार IIT मध्ये प्रवेश दिला जाईल. त्यासाठी उमेदवारांनी (JAM 2024 मधून पात्र ठरलेल्या) JAM ऑनलाइन प्रोसेस सिस्टीम वेबसाईट (JOAPs) वर (https://jam.iitm.ac.in) कोणत्या प्रोग्रॅमसाठी कोणत्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्याचा पसंतीक्रम दि. १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाइन भरावयाचा आहे.

Mock Test लिंकमधून JAM 2024 परीक्षे अगोदर उमेदवारांना मॉक टेस्टची सोय JAM 2024 च्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल.

JAM 2024 साठी उमेदवारांनी https://jam.iitm.ac.in या संकेतस्थळावर १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आपले नाव रजिस्टर करून JAM online application form (JOAPS)) अर्ज दाखल करावा. ऑनलाइन अर्जासोबत फोटोग्राफ, सिग्नेचर, इमाव- NCL/EWS/SC/ST/PWD दाखले अपलोड करणे आवश्यक.

अ‍ॅडमिट कार्ड ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन पोर्टलवरून डाऊनलोड करून प्रिंट दि. ८ जानेवारी २०२४ पासून उपलब्ध.

शंका समाधानासाठी फोन नं. ०४४-२२५७८२०० (सकाळी १० ते १२ व दुपारी २ ते ५ वाजे दरम्यान), ई-मेल jam@iitm.ac.in

गुणवत्ता यादी २२ मार्च, २०२४ रोजी JAM 2024 वेबसाईटवर प्रसिद्ध होईल.

IIT बॉम्बे JAM 2024 करिता IIT बॉम्बे झोनसाठी वेबसाईट आहे http://jam.iitb.ac.in. ई-मेल आयडी आहे jam@iitb.ac.in, फोन नं. ०२२-२५७६७०६८

इंटिग्रेटेड पीएच.डी. प्रोग्राम इन (BIological Sciences/ Chemical Sciences/ Mathematical Sciences/ Physical Sciences) करिता ककरू बंगलोरमधील प्रवेशासाठी JAM 2024 उत्तीर्ण करून IISc बंगलोर येथे वेगळा अर्ज करणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> १० वी पास उमेदवारांना गुप्तचर विभागात नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांच्या ६७७ जागांसाठी भरती सुरु

JAM-2024 स्कोअरकार्ड (ज्या उमेदवाराची ऑल इंडिया रँक दर्शविलेली असेल दि. २४ एप्रिल ते ३१ जुलै २०२४ दरम्यान डाऊनलोड करता येईल.)

नोकरीची संधी

धुळे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी सिंधखेडा, धुळे, शिरपूर तालुका कार्यालयांतर्गत कोतवालपदांची भरती. भागनिहाय उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयांनुसार भरावयाच्या रिक्त पदांचा तपशील. (तालुक्यातील सजेनिहाय रिक्त पदे कोणत्या संवर्गासाठी उपलब्ध आहेत, याचा तपशील https:// dhulekotwal.mahabharti.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.) धुळे जिल्हा – एकूण रिक्त पदे – १७४.

(i) धुळे जिल्ह्यातील शिरपूर उपविभाग, धुळे यांचे कार्यालयांतर्गत शिरपूर – २२ पदे व सिंधखेडा – ३१ पदे.

(१) धुळे तालुका – १४ पदे.

(२) साक्री तालुका – ७ पदे.

कोतवाल पदांसाठी मासिक मानधन – रु. १५,०००/-. पात्रता : इयत्ता ४ थी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे. कोतवाल पदाकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही.

निवड पद्धती : लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे सामान्य ज्ञानावर आधारित ५० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण १०० गुण. लेखी परीक्षेत किमान ४० गुण मिळविणे आवश्यक. लेखी परीक्षेत गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती कागदपत्रे तपासणीकामी निवड यादी तसेच कागदपत्र तपासणीअंती अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ज्या सजेतील पदासाठी अर्ज केला आहे, त्याच सजातील अंतर्भूत असलेल्या गावातील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे. सजेतील अंतर्भूत गावांची यादी संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये पहावी. त्याबाबतचा पुरावा अर्ज भरतेवेळी सादर करणे आवश्यक. परीक्षेपूर्वी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. प्रत्येक सजेत केवळ एक पद उपलब्ध आहे व ते शासकीय निकषांनुसार आरक्षित करण्यात आलेले आहे. अर्ज करताना उमेदवाराने आरक्षण तपासूनच अर्ज करावा.

संपूर्ण भरती प्रक्रिया सजेनिहाय होणार असून संबंधित जिह्यातील सर्व उपविभागातील पदांसाठी एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्यात येईल. तात्पुरते नियुक्ती आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांना महिला आरक्षणाचा लाभ हवा असेल त्यांनी तशी मागणी ऑनलाइन अर्जात करणे अनिवार्य आहे. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणारम्या महिला उमेदवारांनी महाराष्ट्राचे अधिवासी (डोमिसाईल) असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.

परीक्षेचे शुल्क : खुला प्रवर्ग रु. ४००/-; मागासप्रवर्ग रु. ३००/-. ऑनलाइन अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरावे.

ऑनलाइन अर्ज धुळे जिल्ह्यांतील उमेदवारांनी https://dhulekotwal.mahabharti.com या संकेतस्थळावर दि. १५ ऑक्टोबर २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.suhassitaram@yahoo.com