आशुतोष शिर्के
भारतीय विद्यार्थ्यांमध्ये हॉस्पिटॅलिटी (आदरातिथ्य) आणि टुरिझम (पर्यटन) क्षेत्र निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशातील शिक्षण हा एक उत्तम पर्याय आहे, कारण येथील अनेक विद्यापीठे आणि संस्था जागतिक दर्जाचे शिक्षण, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि करिअरच्या संधी खुल्या करतात.
या लेखात आपण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामधील उच्च शिक्षणासाठी सर्वोत्तम देश, संस्था, पदव्युत्तर अभ्यासक्रम, स्पेशलायझेशन आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती करून घेऊ.
हॉस्पिटॅलिटी शिक्षणासाठी सर्वोत्तम देश आणि संस्था
१. स्वित्झर्लंड: स्वित्झर्लंड हे हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे जागतिक केंद्र आहे. Ecole Hô teliè re de Lausanne ( EHL) ही जगातील सर्वोत्तम हॉस्पिटॅलिटी संस्था मानली जाते. एछ चे अभ्यासक्रम सैद्धांतिक आणि प्रॅक्टिकल शिक्षणाचा समतोल साधणारे आहेत. त्यामुळे विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट आणि लक्झरी सर्व्हिस मॅनेजमेंट ह्या क्षेत्रांमध्ये निपुणता मिळवू शकतात. स्वित्झर्लंड मधील इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन आणि लेस रॉचेस ग्लोबल हॉस्पिटॅलिटी एज्युकेशन या संस्थाही जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. स्वित्झर्लंडमधील उच्च शिक्षणाचा खर्च जास्त असला, तरी येथील शिक्षणाचा दर्जा आणि नोकरीच्या संधी यामुळे गुंतवणूक सार्थकी लागते.
२. युनायटेड स्टेट्स : अमेरिका हे इतर अनेक क्षेत्रातील शिक्षणाप्रमाणे हॉस्पिटॅलिटी शिक्षणासाठीही एक आकर्षक ठिकाण आहे. कॉर्नेल विद्यापीठाची स्कूल ऑफ हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन ही जगभरात प्रसिद्ध असलेली संस्था आहे. येथील अभ्यासक्रम हॉस्पिटॅलिटी उद्याोगातील नवसंकल्पनाना प्राधान्य देणारे आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ नेवेडा, लास वेगास आणि जॉन्सन अँड वेल्स युनिव्हर्सिटी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील उत्कृष्ट अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अमेरिकेत शिक्षणासाठी खर्च जास्त असला, तरी स्कॉलरशिप्स आणि पार्ट-टाइम नोकरीच्या संधी यामुळे खर्च व्यवस्थापन सोपे होते.
३. ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातील ब्ल्यू माऊंटन्स इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंट स्कूल आणि विल्यम अँग्लिस इन्स्टिट्यूट हे हॉस्पिटॅलिटी शिक्षणासाठी उत्तम पर्याय मानले जातात. येथील शिक्षण प्रणाली प्रॅक्टिकल लर्निंग आणि तिथल्या हॉटेल व पर्यटन उद्याोगाशी जोडलेली आहे. इथला शिक्षण आणि राहण्याचा खर्च वर उल्लेखलेल्या दोन देशांच्या तुलनेने कमी आहे, आणि ऑस्ट्रेलिया अवॉर्ड्स स्कॉलरशिप्ससारख्या शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
४. फ्रान्स : फ्रान्स हा गॅस्ट्रोनॉमी आणि लक्झरी हॉस्पिटॅलिटी शिक्षणासाठी जगप्रसिद्ध आहे. Institut Paul Bocuse ही संस्था पारंपरिक फ्रेंच क्युलिनरी तंत्र आणि आधुनिक हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट यांचा मेळ घालणारी म्हणून सुप्रसिद्ध आहे. Vatel Hotel & Tourism Business School देखील उत्तम पर्याय मानला जातो. फ्रान्समधील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये शिक्षण शुल्क कमी आहे, आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी अनेक स्कॉलरशिप्स देखील या विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत.
पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि स्पेशलायझेशन हॉस्पिटॅलिटी किंवा संबंधित क्षेत्रात भारतातून पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी परदेशातील विद्यापीठांमध्ये अनेक स्पेशलायझेशन्स असलेले पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
● हॉटेल आणि रिसॉर्ट मॅनेजमेंट: ईएचएल आणि कॉर्नेल येथील मास्टर प्रोग्राम्स हॉटेल ऑपरेशन्स, रिव्हेन्यू मॅनेजमेंट आणि गेस्ट सर्व्हिसेसवर लक्ष केंद्रित करतात. हे विषय जागतिक स्तरावरील आघाडीच्या हॉटेल उद्याोगांमधील करिअरसाठी उपयुक्त आहेत. .
● लक्झरी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट: ग्लिऑन आणि लेस रॉचेस येथील पीजी अभ्यासक्रम लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट, स्पा मॅनेजमेंट आणि हाय-एंड इव्हेंट प्लॅनिंगवर केंद्रित आहेत.
● गॅस्ट्रोनॉमी आणि क्युलिनरी आर्ट्स: Institut Paul Bocuse मधील मास्टर प्रोग्राम्स फूड इनोव्हेशन, रेस्टॉरंट मॅनेजमेंट आणि क्युलिनरी लीडरशिप इत्यादी विषय फाइन डायनिंग क्षेत्रात करिअरसाठी महत्त्वाचे मानले जातात.
● इव्हेंट आणि टुरिझम मॅनेजमेंट: विल्यम अँग्लिस इन्स्टिट्यूट आणि वॅटेल येथील प्रोग्राम्स इव्हेंट प्लॅनिंग, डेस्टिनेशन मॅनेजमेंट आणि सस्टेनेबल टुरिझमवर लक्ष केंद्रित करतात, भारतातील वाढता पर्यटन उद्याोग लक्षात घेता ह्या विषयांमधील स्पेशलायझेशन पुढच्या काळात महत्त्वाचे ठरू शकेल.
● हॉस्पिटॅलिटी एन्टरप्रेन्योरशिप: ईएचएल आणि कॉर्नेल येथील काही प्रोग्राम्स विद्यार्थ्यांना स्वत:चा हॉस्पिटॅलिटी व्यवसाय सुरू करण्यासाठी नेतृत्व आणि व्यवसाय विकास कौशल्ये शिकवतात.
या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा कालावधी साधारणपणे १-२ वर्षे आहे, आणि प्रवेशासाठी हॉस्पिटॅलिटी किंवा बिझनेस क्षेत्रातील पदवी, कामाचा अनुभव (१-३ वर्षे, काही बाबतीत ऐच्छिक), आणि IELTS/ TOEFL स्कोअर आवश्यक असतात.
प्रवेश प्रक्रिया आणि तयारी
परदेशात हॉस्पिटॅलिटी शिक्षण घेण्यासाठी महत्वाच्या पायऱ्या:
१. संशोधन आणि निवड: आपल्या आवडीचे पीजी अभ्यासक्रम आणि स्पेशलायझेशन निवडा. प्रत्येक विद्यापीठाचे प्रवेश निकष , शुल्क आणि स्कॉलरशिप्स याची माहिती घ्या.
२. प्रवेशासाठीचे निकष: : पीजी अभ्यासक्रमांसाठी बॅचलर डिग्री, इंग्रजी प्राविण्य चाचणी ( IELTS/ TOEFL), स्टेटमेंट ऑफ पर्पज ( रडढ), आणि शिफारस पत्रे ( LORs) आवश्यक आहेत. काही संस्थांना ॅटअळ किंवा ॅफए स्कोअर आणि कामाचा अनुभव लागतो.
३ आर्थिक नियोजन: ट्यूशन फी, राहण्याचा खर्च आणि इतर खर्चांचा अंदाज घ्या. स्वित्झर्लंड आणि अमेरिकेत खर्च जास्त आहे, तर फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियात तुलनेने कमी आहे. स्कॉलरशिप्स, पार्ट-टाइम जॉब्स (२० तास/आठवडा), आणि स्टुडंट लोन्स यामुळे आर्थिक भार कमी होऊ शकतो.
४. व्हिसा प्रक्रिया: अमेरिकेसाठी F-1 व्हिसा, ऑस्ट्रेलियासाठी Subclass 500 व्हिसा, आणि फ्रान्ससाठी स्टुडंट व्हिसा आवश्यक आहे. यासाठी स्वीकृती पत्र, आर्थिक पुरावे आणि इंग्रजी प्राविण्य चाचणीचे स्कोअर आवश्यक आहेत.
५. शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य: ऑस्ट्रोलिया अवॉर्ड्स स्कॉलरशिप्स, फ्रेंच गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स आणि ईएचएल एक्सलन्स स्कॉलरशिप्स यासारख्या स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत. मात्र यासाठी लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.
काही टिप्स
● लवकर तयारी सुरू करा: पीजी प्रवेश प्रक्रिया आणि व्हिसा अर्जासाठी १२-१८ महिने आधी नियोजन करा.
● इंग्रजी प्राविण्य: कएछळर किंवा ळडएाछ ची तयारी करा, कारण याचे स्कोअर प्रवेशासाठी महत्त्वाचे आहेत.
● इंटर्नशिप आणि नेटवर्किंग: पीजी अभ्यासक्रमांदरम्यान इंटर्नशिप आणि नेटवर्किंगच्या संधींचा फायदा घ्या,
mentorashutosh@gmail. com