CBSE Class 10th and 12th Result 2024 dates: दहावी बारावीच्या निकालाची विद्यार्थ्यांसोबतच पालक, शिक्षक सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. मंडळाकडून लवकरच हा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा आणि बारावीचा निकालही या महिन्यात जाहीर होणार आहे. केंद्रीय बोर्डाने सीबीएसईच्या निकालाची तारीख आणि वेळ यासंबंधी कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र लवकरच हा निकाल लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सीबीएसई बोर्डचा अधिकृत निकाल कुठे बघायचा ? याच्या काही वेबसाईटची माहिती घेऊ.

सीबीएसईच्या इयत्ता १०वीचा आणि १२वीचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट results.cbse.nic वर प्रकाशित केला जाईल.

अधिकृत वेबसाइटसोबतच सीबीएसईच्या इयत्ता १०वीचा आणि १२वीचा निकाल खाली दिलेल्या वेबसाईट्सवरही तपासू शकता. विद्यार्थ्यांना एसएमएस सुविधा आणि डिजीलॉकरद्वारे निकाल पाहण्याचा पर्यायही असेल.

१. cbse.gov.in
२. cbseresults.nic.in
३. cbse.nic.in
४. digilocker.gov.in
५. results.gov.in

सीबीएसईच्या इयत्ता १०वीचा आणि १२वीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या दोन महिन्यांत पार पडल्या.

निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा

https://education.indianexpress.com/embed/board-exams?board-slug=cbse-board-result

सीबीएसईच्या इयत्ता १०वीचा आणि १२वीचा निकाल कसा तपासायचा?

१. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२. सीबीएसईचा बोर्ड निकाल २०२४ लिंकवर क्लिक करा.

३. खात्यात लॉग इन करा.

४. रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.

५. तुम्ही आता सीबीएसई बोर्डाचे १०वीचा आणि १२वीचे निकाल तपासू शकता.

६. आपण निकाल तपासू शकता आणि डाउनलोड देखील करू शकता.

हेही वाचा >> CBSE Result 2024: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार? समोर आली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र एसएससी, एचएससी निकाल २०२४ डाउनलोड करण्यासाठी डिजिलॉकर वापरु शकता?

विद्यार्थ्यांनी जाणून घ्या डिजिलॉकरवर नोंदणी आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे डाउनलोड कसे करावे. डिजिलॉकरवर १० वी आणि १२ वीचे निकालपत्र अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे डिजिलॉकर खाते असणे आवश्यक आहे.