CBSE Board 12th Results 2025 Declared: महाराष्ट्रा बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकालासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSC) बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय. यंदा एकूण ८८.३९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात ०.४१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
CBSE Result 2025 division wise result : विभागानुसार निकालाचा विचार केल्यास विजयवाडा विभाग सर्वात पुढे आहे. या विभागाचा निकाल ९९.६० टक्के लागला आहे. इतर विभागांचा निकाल खालीलप्रमाणे
विजयवाडा – ९९.६०%
त्रिवेंद्रम – ९९.३२%
चेन्नई – ९७.३९%
बेंगळुरू – ९५.९५%
दिल्ली पश्चिम – ९५.३७%
दिल्ली पूर्व – ९५.०६%
चंदीगड – ९१.६१%
पंचकुला – ९१.१७%
पुणे – ९०.९३
CBSE इयत्ता 12वीचा निकाल cbseresults.nic.in आणि cbse.gov .in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. यासह DigiLocker वेबसाइट – digilocker.gov.in आणि UMANG ॲपवर सुद्धा आपल्याला निकाल तपासता येईल.
कुठे चेक कराल निकाल?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई इयत्ता १२ वीचा निकाल २०२५ ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून निकाल डाउनलोड करण्यासाठी त्यांच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करावा लागेल. विद्यार्थी त्यांचे निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक तपासू शकतात.अधिकृत वेबसाइटवर तुमचे निकाल तपासा.https://cbseresults.nic.in/
महाराष्ट्र CBSC बोर्डाचा १२ वीचा निकाल काय?
- सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल ८८.३९ टक्के
- मागील वर्षीच्या तुलनेत ०.४१ टक्क्यांनी निकालात वाढ
- सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेचा महाराष्ट्र विभागाचा निकाल ९०.९३%
- महाराष्ट्र मध्ये ८८.८९% मुले उत्तीर्ण तर मुलींचा निकाल ९२.७५%
खाली दिलेल्या लिंकवर बघू शकता निकाल
cbse.gov.in
cbseresults.nic.in
results.cbse.gov.in
डिजीलॉकरवर कसा बघायचा बारावीचा निकाल?
‘डिजिलॉकर’ अॅप डाउनलोड करा
digiLocker.gov.in वर जा.
तुमचा रोल नंबर, वर्ग, शाळेचा कोड आणि ६ अंकी पिन (शाळेने दिलेल्या माहितीनुसार) टाका.
त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल तो भरा.
तुम्हाला तुमची मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.