CTET Result 2023: सीटीईटी निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (CTET 2023) निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. सीटीईटी २०२३ चा निकाल पुढील आठवड्यापर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सीटीईटी २०२३ निकालाची आतुरतेने वाट पाहणारे उमेदवार सीटीईटी २०२३ च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. यापूर्वी सीटीईटी २०२३ च्या या परीक्षेची उत्तर तालिका प्रसिद्ध झाली होती.

CTET 2023 परीक्षेची तात्पुरती उत्तर तालिका १६ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आणि आक्षेप विंडो १८ सप्टेंबर २०२३ रोजी बंद करण्यात आली. CTET 2023 ची परीक्षा २० ऑगस्ट रोजी झाली, ज्यामध्ये नोंदणीकृत उमेदवारांची संख्या २९ लाखांहून अधिक होती. नोंदणीकृत उमेदवारांपैकी सुमारे ८० टक्के उमेदवार परीक्षेला बसले होते. याशिवाय उमेदवार https://ctet.nic.in/ या लिंकवर क्लिक करून थेट निकाल पाहू शकतात. आपण खाली दिलेल्या पध्दतीद्वारे देखील निकाल तपासू शकता.

cleaning dirt by hand, banning laws,
हाताने मैला साफ करण्याची कृप्रथा : बंदी घालणाऱ्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, उच्च न्यायालयाचे आदेश
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

(हे ही वाचा : केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या )

सीटीईटी 2023 निकाल कसे तपासाल?

  • CTET च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर “CTET निकाल 2023” लिंक पहा आणि त्यावर क्लिक करा.
  • तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा CTET निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल.
  • CTET निकाल 2023 तपासा आणि सेव्ह करा.

CTET 2023 मार्कशीट कशी मिळेल?

CBSE उमेदवारांना CTET मार्कशीट डिजीलॉकरद्वारे वितरित करेल, त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लॉगिन क्रेडेन्शियल्स पाठवल्या जातील.