विवेक वेलणकर

जागतिक स्तरावर नव्वद टक्के व्यापार व वाहतूक सागरातून होते. कोळसा / खनिज तेलापासून ते अन्नधान्यापर्यंत आणि यंत्रसामुग्री पासून खनिजांपर्यंत सर्वच वस्तूंची आयात निर्यात सागरी मार्गानेच होते. जागतिक अर्थव्यवस्थेला अबाधितपणे कार्यरत ठेवण्यासाठी जहाज वाहतूक वंगणाची भूमिका निभावत आहे. जहाजातून वाहतूक ही इतर कोणत्याही पर्यायांपेक्षा अत्यंत किफायतशीर व अत्यंत कमी प्रदूषण करणारी असल्याने या क्षेत्रात जगभरातच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे.

हेही वाचा >>> DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर होणार भरती; जाणून घ्या….

आज या मर्चंट नेव्ही क्षेत्रात जगभरात पंधरा लाखांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे तर सत्तर हजारांहून अधिक भारतीय या क्षेत्रात करिअर करत आहेत. बारावीनंतर मर्चंट नेव्ही मधील प्रशिक्षणाच्या अनेक संधी आहेत जसे की बीएससी नॉटीकल सायन्स, बीएससी शिप बिल्डींग व रिपेअर, बीबीए लॉजिस्टीक्स आणि ई कॉमर्स, बी टेक मरीन इंजिनीअरिंग, बी टेक नेव्हल आर्किटेक्चर. या कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटीची सीईटी द्यावी लागते. यंदा ही सीईटी ८ जून रोजी होणार असून त्याकरिता ऑनलाइन पद्धतीने imu. edu. in या संकेतस्थळावर ५ मे पर्यंत अर्ज भरणे आवश्यक आहे. ही सीईटी कॉम्प्युटर बेस्ड असून त्यात तीन तासांत दोनशे गुणांची परीक्षा होते. या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी पाव गुण वजा केला जातो. या परीक्षेत ५० मार्कांचे फिजिक्स, ५० मार्कांचे मॅथेमॅटिक्स, २० मार्कांचे फिजिक्स आहे. मात्र हे अकरावी बारावीच्या सिलॅबस वर आधारित आहे. याशिवाय ४० मार्कांचे इंग्रजी व ४० मार्कांचे सामान्यज्ञान व रीझनिंग अॅबिलिटी वर प्रश्न असतात. फिजिक्स, मॅथेमॅटिक्स व इंग्रजी या तीन विषयांवर भर दिला तरी ७० टक्के गुण मिळवणे शक्य आहे. या परीक्षेतून विद्यार्थ्यांना रँक मिळू शकतात आणि त्याआधारे मर्चंट नेव्हीच्या चांगल्या कॉलेजात हव्या त्या कोर्सला प्रवेश मिळू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदवीनंतर विद्यार्थ्यांना एम टेक मरीन इंजिनीअरिंग व मॅनेजमेंट, एम टेक नेव्हल आर्किटेक्चर व ओशन इंजिनीअरिंग, एमबीए पोर्ट आणि शिप मॅनेजमेंट, एमबीए इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन व लॉजिस्टीक्स मॅनेजमेंट असे विविध उच्च शिक्षणाचे पर्याय या क्षेत्रात उपलब्ध आहेत.