DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरातील प्रगत तंत्रज्ञान संस्थेअंतर्गत ‘ज्युनियर रिसर्च फेलो’ आणि ‘प्रकल्प सहाय्यक’ या पदांच्या रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी नेमक्या किती जागांवर भरती करण्यात येणार आहे, ते इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या. तसेच नोकरीचा अर्ज कसा करावा आणि त्याची अंतिम तारीखदेखील माहीत करून घ्या.

DIAT Pune recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी एका जागेवर भरती करण्यात येणार आहे.

India Post Recruitment 2024
India Post Jobs 2024: इंडिया पोस्टमध्ये निघाली भरती! ६३ हजारपर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Mumbai University job hiring 2024 post
Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठात भरती! ‘या’ पदांसाठी लगेच करा अर्ज….

प्रकल्प सहाय्यक या पदासाठी एका जागेवर भरती करण्यात येणार आहे.

DIAT Pune recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पुढील शिक्षण आवश्यक आहे –
या पदासाठी उमेद्वाराकडे, NET/GATE सह प्रथम श्रेणीतील B.E./ B.Tech/ M.Sc क्षेत्रातील पदवी असणे अनिवार्य आहे.

प्रकल्प सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पुढील शिक्षण आवश्यक आहे –
या पदासाठी उमेद्वाराकडे, B.E./ B.Tech/ M.E/M.Tech/M.sc क्षेत्रातील पदवी असणे अनिवार्य आहे.

हेही वाचा : CIFE Mumbai recruitment 2024 : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! पाहा अधिक माहिती

DIAT Pune recruitment 2024 : वेतन

ज्युनियर रिसर्च फेलो या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास दरमहा ३७,०००/- रुपये असे वेतन देण्यात येईल.

प्रकल्प सहाय्यक या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास दरमहा २५,०००/- रुपये असे वेतन देण्यात येईल.

DIAT Pune recruitment 2024 – प्रगत तंत्रज्ञान संस्था अधिकृत वेबसाइट लिंक
https://diat.ac.in/

DIAT Pune recruitment 2024 – ज्युनियर रिसर्च फेलो अधिसूचना –
https://diat.ac.in/wp-content/uploads/2024/04/Advt-No.13-2024-JRF.pdf

DIAT Pune recruitment 2024 – प्रकल्प सहाय्यक अधिसूचना
https://diat.ac.in/wp-content/uploads/2024/04/Advt-No.14-2024-PA.pdf

DIAT Pune recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी नोकरीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी आपली संपूर्ण आणि योग्य माहिती अर्जात भरणे आवश्यक आहे.
अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
नोकरीचा अर्ज पाठविणाऱ्या उमेदवारांनी अर्ज अंतिम तारखेआधी पाठवणे आवश्यक आहे.
दोन्ही पदांसाठी अंतिम तारीख ही २ मे २०२४ अशी ठेवण्यात आली आहे.

ज्युनियर रिसर्च फेलो आणि प्रकल्प सहाय्यक या पदांसंबंधी उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास प्रगत तंत्रज्ञान संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.