डॉ. सुशील मुजुमदार, प्राध्यापक, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च
संशोधन आणि विज्ञान या दोन्ही क्षेत्रांकडे यातही प्रामुख्याने संशोधन क्षेत्राकडे विद्यार्थी आणि पालकवर्ग कायम कुतूहलाने पाहत असतो. मात्र संशोधन आणि वैज्ञानिक म्हणजे अत्यंत वेगळे काहीतरी अथवा हे आपल्याला जमणार नाही अशी विद्यार्थ्यांची धारणा झालेली असते. मात्र, या क्षेत्राकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलायला हवा. सध्या अनेक विद्यार्थी वैज्ञानिक ही एक करिअर संधी म्हणून पाहात नाही. यापूर्वी वैज्ञानिक म्हणजे नेमके काय? त्यांचे काम असते? याबाबतही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. विज्ञान अथवा संशोधन या विषयांमुळे यात शिक्षण घेतल्यामुळे जागतिक स्तरावर नोकरीच्या तसेच या क्षेत्रातही व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर जे संशोधन केले आहे त्याचे प्रबंध या क्षेत्रातील नामांकित नियतकालिके तसेच प्रकाशन संस्था या ठिकाणी पाठवायचे असतात. या क्षेत्रात तुमचे जितके अधिक प्रबंध प्रकशित होतात तेवढे आधी महत्त्व तुम्हाला संशोधन क्षेत्रात एक वैज्ञानिक म्हणून प्राप्त होते. या क्षेत्रामध्ये पूर्णपणे संशोधनाचे शिक्षण देणाऱ्या आणि संशोधन वजा शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था कार्यरत आहे.
आयटी यांसारख्या संस्थांमध्ये संशोधन तसेच तंत्रज्ञान शिक्षण दिले जाते. तर आयएसएस यांसारख्या संस्थांमधून बेसिक सायन्स यांसारख्या विषयांना धरून प्रामुख्याने विज्ञान संशोधन शिकविले जाते. विद्यार्थ्यांना येथून शिक्षण घेऊन संशोधन क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. तसेच संशोधन, गणित, विज्ञान निगडित विषयाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्राध्यापक तसेच सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी उपलब्ध होते. यासाठी प्राधान्याने विज्ञान विषयात पदवी घेऊन डॉक्टरेट अर्थातच पीएचडीचे शिक्षण महत्त्वाचे असते. यासाठी भारतात अनेक शैक्षणिक संस्था आहे.
संशोधन क्षेत्रात शिक्षण देणाऱ्या विविध संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी जॅम, जेस्ट यांसारख्या विविध प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. संशोधन या क्षेत्रात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. विज्ञान अथवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना एखाद्या विशिष्ट प्रकल्पावर काम करून पाहायला हवे. जेणेकरून या विषयात गोडी निर्माण होईल.
संशोधन म्हणजे सतत अभ्यास, कठीण अभ्यासक्रम असा समज निर्माण झाला आहे. मात्र, असे नसून याचा अभ्यासक्रमही इतर क्षेत्रांप्रमाणचे असतो. त्यासाठी फक्त आवड असायला हवी. या क्षेत्रात नोकरी मिळाल्यावर पगार किती उत्त्पन्न किती असा पालकांना कायम प्रश्न असतो. या क्षेत्रात उत्तम अर्थार्जन करून देणाऱ्या नोकरीच्या संधी भारतात आणि परदेशातही उपलब्ध आहे. यामुळे पालकांनीही आपल्या पाल्याला संशोधन क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करावे.