Chartered accountant success story: यश मिळविण्यासाठी अपयश येणेही आवश्यक असते. किंबहुना जितके मोठे अपयश, तितके मोठे यश, असे म्हणावे लागेल. कारण- हिमांशु यांना अपयशाशी एकदा नव्हे, तर अनेकदा सामना करावा लागला होता. त्यांच्याविषयी माहिती घेताना अभ्यासात अपयश आले म्हणून आत्महत्या करणाऱ्यांच्या आठवणी नकळत जाग्या होतात. दहावी-बारावीमध्ये कमी गुण मिळाले किंवा नापास झालो म्हणून किंवा करिअरमध्ये अपयश आले म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या बातम्या आपण वाचतो. कोणत्याही व्यक्तीने असे टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार करण्याआधी हिमांशु यांचा प्रवास माहीत करून घ्यावा.

अपयशातून यशाकडे

कोणीही व्यक्ती जिद्द असेल, तर ती आपली स्वप्ने पूर्ण करू शकते. अविरत प्रयत्न केले, तर ध्येयपूर्ती अशक्य नसते हे हिमांशु यांनी दाखवून दिले. हिमांशु तब्बल नऊ वर्षांच्या संघर्षानंतर २०२४ मध्ये सीए झाले. यावेळी रिझल्ट तपासतानाचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला असून, यशाचा आनंद केवढा असतो हे त्यातून पाहायला मिळत आहे.

कसा होता हिमांशु यांचा प्रवास

हिमांशु भानुशाली यांना हे यश मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागलाच; पण अपयशही स्वीकारावे लागले. मात्र, अपयशी होऊनही ते हरले नाहीत. अपयश पचवून पुढे जाण्याची ताकद त्यांनी ठेवली आणि हेच त्यांचे खरे यश आहे. हिमांशु भानुशाली यांनी त्यांचा सीएचा प्रवास २०१५ ला सुरू केला होता. त्यावेळी सीएची परीक्षा देण्यासाठी आधी सीपीटी परीक्षा द्यावी लागते; मात्र हिमांशु भानुशाली २०१५ च्या पहिल्या प्रयत्नामध्ये नापास झाले. त्यानंतर पुढच्या वर्षी मात्र ते सीपीटी आणि नंतर २०१६ मध्ये आयपीसीसी ग्रुप-१ पास झाले. मात्र, पुन्हा त्यांना अपयशाने घेरले आणि त्यामुळे ते २०१७ ते २०१८ मध्ये आयपीसीसी ग्रुप-२ ची परीक्षा पास करू शकले नाहीत. त्यानंतर गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे त्यांना ब्रेक घ्यावा लागला. मात्र, पुन्हा त्यांनी नव्याने सुरुवात केली आणि पुन्हा एकदा परीक्षा दिली. २०२१ व २०२२ मध्ये त्यांना पुन्हा एकदा अनुत्तीर्ण होण्याचे दु:ख पचवावे लागले.

अखेर नऊ वर्षांनंतर सीए

विशेष बाब म्हणजे एवढ्या वेळा अपयश येऊनही हिमांशु हिंमत हरले नाहीत. त्यांनी पुन्हा २०२३ मध्ये परीक्षा दिली आणि अखेर नऊ वर्षांनंतर त्यांना सीए परीक्षा उत्तीर्ण होण्याचा सुखानंद अनुभवता आला. अपयशातून यशाकडे जाताना त्यांनी केलेला संघर्षाने त्यांना मिळालेली नवी दृष्टी महत्त्वपूर्ण ठरली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कष्टाचं चीज झालं! भाजी विक्रेत्या मावशींचा मुलगा झाला CA, लेकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली आई, Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हिमांशु सीए परीक्षेचा निकाल पाहत आहेत. यावेळी उत्तीर्ण झाल्याचे कळताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. इतक्या वर्षांची मेहनत अखेर कामी आल्याचा तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.