कोणत्याही शाखेतील पदवीनंतर एमबीए करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. देशभरातील अडीचशेहून अधिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी CMAT सीईटी परीक्षा घेतली जाते. मुंबई, पुणे,नाशिक, नागपूर, अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव , कोल्हापूर , नांदेड, सोलापूर, यवतमाळ, ठाणेसह शंभरहून अधिक शहरांमध्ये ही परीक्षा यंदा २५ जानेवारी २०२५ रोजी घेतली जाईल. परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असेल. तीन तासांच्या या परीक्षेत पाच सेक्शन्स असतील. पहिला सेक्शन क्वांटिटेटिव्ह टेक्निक व डाटा इंटरप्रिटेशनवर असेल ज्यामध्ये २० प्रश्न असतील. दुसरा सेक्शन लॉजिकल रिझनिंगवर असेल ज्यामध्ये २० प्रश्न असतील तर तिसरा सेक्शन लँग्वेज कॉम्प्रिहेन्शनवर असेल ज्यामध्ये २० प्रश्न असतील. चौथा सेक्शन जनरल नॉलेजचा असेल ज्यामध्ये २० प्रश्न असतील. पाचवा सेक्शन इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्युअरशिपवर असेल ज्यामध्ये २० प्रश्न असतील. या पाचही सेक्शनमधील प्रत्येक सेक्शन ८० मार्कांचा असेल. प्रत्येक बरोबर उत्तराला ४ गुण मिळतील तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. काठीण्य पातळीवर ‘कॅट’ परीक्षेखालोखाल ही परीक्षा असून उत्तम यशासाठी कठोर परिश्रम आणि कसून सराव आवश्यक आहे. या परीक्षेच्या निकालानंतर या परीक्षेतील मार्कांवर विद्यार्थ्यांना संस्था स्तरावर ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखत याला सामोरे जावे लागते व त्यातून संस्था स्तरावर अंतिम निवड होते. ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखत यासाठी विद्यार्थ्यांना इंग्रजी कम्युनिकेशन स्किल्स आत्मसात करणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://exams.nta.ac.in/CMAT या संकेतस्थळावर १३ डिसेंबरपर्यंत भरता येतील.

हेही वाचा >>> Success Story : सायकलवरून पदार्थ विकून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली तब्बल ५,५३९ कोटींची कंपनी

एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी:

● अशा एमबीए संस्थेमध्ये प्रवेश मिळवला पाहिजे की ज्यांच्याकडे भरपूर कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतात. गेल्या ४-५ वर्षांचे प्लेसमेंट रेकॉर्ड उत्तम आहे.

● यामध्ये किती टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली याबरोबरच कमीतकमी पगार / सरासरी पगार / जास्तीतजास्त पगार यांची माहिती मिळवणे गरजेचे आहे.

● अशा एमबीए संस्थांमध्ये प्रवेश हवा असेल तर एमबीए प्रवेश परीक्षेत आणि त्यानंतर घेतल्या जाणाऱ्या ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखत यामध्ये उत्तम कामगिरी करणे अत्यावश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● यासाठीची तयारी तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.