Success Story of Kishan Bagaria: तंत्रज्ञानाचा योग्य वापर माहीत असेल तर त्याने तुम्ही तुमचे जीवन सुधारू शकता असं म्हणतात. आज अनेक तरुण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन उंची गाठत आहेत. फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इन्स्टाग्राम असो, आज संपूर्ण जग त्यांना ओळखते, ज्यांनी हे अ‍ॅप्स विकसित केले. या सर्वांची एक खास गोष्ट म्हणजे त्यांना सुरुवातीच्या काळात अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं, पण आज त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखलं जातं.

आज आपण आसाममधील दिब्रुगढ या छोट्या शहरातून आलेल्या किशन बागरियाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी स्वत:ला सिद्ध केले.

IAS Sreenath, Success Story
Success Story : कुली म्हणून करायचे काम, मोफत Wifi च्या मदतीने अभ्यास करून दिली UPSC परीक्षा अन् झाले IAS अधिकारी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Enrol in a training institute and get a free tablet lure to students from institutes
“प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्या अन् मोफत ‘टॅबलेट’ मिळवा”, संस्थांकडून विद्यार्थ्यांना आमिष
andaman and nicobar additional commissioner ias vasant dabholkar Success Story
माझी स्पर्धा परीक्षा : समाजाचं ऋण फेडण्याचा मार्ग
rahul kumar Success Story
Success Story : गरीब परिस्थिती, इंटरव्ह्यूला जाण्यासाठी नव्हते कपडे… परिस्थितीवर मात करून मिळवला ६७ वा क्रमांक
Success Story Of Varun Baranwal
Success Story : वडिलांचा गेला आधार, स्वत: उचलली जबाबदारी; सायकल दुरुस्तीचं काम करणारा बनला आयएएस अधिकारी
emotional video will make you remember your school days
“डियर शाळा, फक्त खांद्यावर दप्तर नाही पण लोक अजूनही धडा शिकवून जातात” तरुणाचा VIDEO VIRAL
Loksatta editorial Loksatta editorial on symbolic changes in new lady of justice statue by supreme court
अग्रलेख: न्यायदेवता… न्यायप्रियता!

किशन बागरियाचा प्रवास स्वयं-शिक्षण आणि दृढनिश्चयाचा प्रभाव अधोरेखित करतो. अवघ्या १२ व्या वर्षी तो स्वतः कोडिंग शिकला आणि नंतर Texts.com हे लोकप्रिय युनिफाइड मेसेजिंग ॲप त्याने विकसित केले.

कोण आहे किशन बागरिया? (Who is Kishan Bagaria)

आसाममधील दिब्रुगढ येथील किशन बागरिया याने अवघ्या १२ व्या वर्षी कोडिंगचा प्रवास सुरू केला. शैक्षणिक मार्गाचा अवलंब करण्याऐवजी, कुतूहल आणि तंत्रज्ञानाची आवड असल्याने त्याने ऑनलाइन रिसोर्सद्वारे स्वतःला कोडिंग शिकवले.

किशन बेसिक शिक्षणाच्या पलीकडे गेला; त्याने विंडोज ॲप्लिकेशन्स विकसित करण्यास सुरुवात केली, यावेळी त्याने स्वत: शिकलेलं कौशल्य उपयोगी आणलं. स्वतंत्रपणे शिकण्याच्या त्याच्या क्षमतेने त्याने त्याच्या भविष्यातील उद्योजकीय उपक्रमांचा भक्कम पाया घातला.

हेही वाचा… अपघातात गमावले दोन्ही पाय पण पठ्ठ्याने जिद्द सोडली नाही; IIT-JEE परीक्षा उत्तीर्ण करत मिळवली गुगलमध्ये नोकरी, नागा नरेशचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचाच

Texts.comची सुरूवात

२०२० मध्ये किशनने Texts.com हे युनिफाइड मेसेजिंग ॲप बनवण्यावर काम करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे वापरकर्त्यांना Twitter, WhatsApp आणि Instagram सारख्या विविध प्लॅटफॉर्मवरील संदेश एकाच ठिकाणी व्यवस्थापित करण्याची परवानगी मिळते. ॲपच्या या अनोख्या वैशिष्ट्याने त्याला स्पर्धकांपासून वेगळं केलं.

टेक्स्ट्स प्रोटोटाइप मित्रांसह शेअर केल्यानंतर किशनला जबरदस्त सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या अ‍ॅपची माऊथ पब्लिसिटी झाली आणि नाविन्यपूर्ण ॲप वापरून पाहण्यास उत्सुक असलेल्या वापरकर्त्यांचे आणि उद्योग व्यावसायिकांचे या ॲपने लक्ष वेधून घेतले.

टेक्स्ट्सची लोकप्रियता वाढल्याने, वर्डप्रेसची मूळ कंपनी ऑटोमॅटिकचे लक्ष वेधून घेतले. तीन महिन्यांच्या वाटाघाटीनंतर ऑटोमॅटिकचे संस्थापक, मॅट मुल्लेनवेग यांनी किशनची क्षमता ओळखली आणि २०२३ मध्ये त्याला ते वैयक्तिकरित्या भेटले.

हेही वाचा… लहानपणीच गमावली दृष्टी पण हार मानली नाही, आधी IIT मग UPSC उत्तीर्ण होऊन झाले IAS; वाचा अंकुरजीत सिंग यांचा प्रेरणादायी प्रवास

ऑक्टोबर २०२३ मध्ये Automattic द्वारे Texts.com USD 50 दशलक्ष (अंदाजे 4,160 कोटी रुपये) मध्ये ताब्यात घेण्यात आले. मुलेनवेग यांनी किशनची “जनरेशनल टेच जिनियस” म्हणून प्रशंसा केली आणि त्याची विलक्षण प्रतिभा आणि दृष्टी अधोरेखित केली.

अफाट यश असूनही किशन टेक्स्ट्सच्या वाढीमध्ये सक्रियपणे गुंतलेला आहे, यूएसमध्ये ऑटोमॅटिकच्या समर्थनासह प्लॅटफॉर्मचे नेतृत्व तो करत आहे. त्याचा प्रवास एक शक्तिशाली स्मरणपत्र आहे, की अगदी पदवी नसतानाही उत्कटता, स्वयं-शिक्षण आणि नाविन्यपूर्ण यश मिळवू शकतो. किशन बागरिया याची कहाणी सर्वत्र इच्छुक उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. जिद्द आधीपासून चालत आलेले पारंपरिक अडथळे दूर करू शकते हे सिद्ध करते.