(Employment Notification No. CO/ P- R/०१/२०२४ dtd. १६.०८.२०२४) या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता :

(i) ज्यांची जमीन KRCL प्रोजेक्टसाठी अधिग्रहित केलेली आहे असे Land Loser उमेदवार स्वत:, त्यांची पती/ पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात.

Maharashtra vidhan sabha
उमेदवारी अर्जांसाठी अखेरचे दोन दिवस; महायुती, मविआतील घोळ मात्र अद्याप कायम
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Candidacy to Prakash Bharsakale in Akot and Vijay Aggarwal in Akola West
भाजपकडून जुन्यांनाच संधी; अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे, अकोला पश्चिममध्ये विजय अग्रवाल यांना उमेदवारी
MHADA Mumbai Mandal Lottery 2024, MHADA,
म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२४ : लवकरच विजेत्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण, विजेत्यांना सोमवारपासून तात्पुरते देकारपत्र
recruitment of total 480 posts under various departments in maharashtra govt
नोकरीची संधी : शासनाच्या विभागांत नोकरीची संधी
india post payments bank recruitment to the post of executive for 344 vacancies on contractual basis
नोकरीची संधी : ग्रामीण डाक सेवकांसाठी ‘एक्झिक्युटिव्ह’ पदाची भरती
Mumbai airport jobs
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड ड्युटी पदांची भरती
arjuni morgaon assembly, rajkumar badole, NCP Ajit Pawar
विदर्भातील भाजपचा माजी मंत्री राष्ट्रवादीकडून लढणार, विद्यमान आमदाराची अडचण

(ii) Land loser उमेदवार वगळता कोकण रेल्वेच्या मार्गावरील (रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, उत्तर कन्नड, उडिपी आणि दक्षिण कन्नड) जिह्यांतील रहिवासी (Domiciled) (महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटक) असलेले उमेदवार ज्यांचे स्थानीय एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नाव नोंदले आहे.

(iii) Land Loser उमेदवार वगळता महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटक राज्यांतील रहिवासी (Domiciled) उमेदवार.

(iv) किमान ३ वर्षांची नियमित सेवा दिलेले KRCL चे कर्मचारी.

KRCL मधील खातेनिहाय रिक्त पदांचा तपशिल :

(१) ट्रक मेंटेनर (सिव्हील डिपार्टमेंट) ३५ पदे.

(२) पॉईंट्समन (ऑपरेटींग डिपार्टमेंट) ६० पदे . पद क्र. १ व २ साठी पात्रता : १० वी उत्तीर्ण.

(३) टेक्निशियन- III/ इलेक्ट्रिकल (इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट) – १५ पदे पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकल/वायरमन/मेकॅनिक (HT, LT Equipment and Cable Jointing)/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमधील आयटीआय कोर्स सर्टिफिकेट किंवा १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील अॅप्रेंटिसशिप कोर्स सर्टिफिकेट.

(४) टेक्निशियन- III/ मेकॅनिकल (मेकॅनिकल डिपार्टमेंट) – २० पदे पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि फिटर/मेकॅनिक डिझेल/ Mechanic Repair Maintenance of Heavy Vehicle/ मेकॅनिक ऑटोमोबाईल (अॅडव्हान्स्ड् डिझेल इंजिन)/ मेकॅनिक (मोटर वेहिकल)/ ट्रक्टर मेकॅनिक/ वेल्डर/ पेंटर ट्रेडमधील आयटीआय कोर्स सर्टिफिकेट किंवा १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील अॅप्रेंटिसशिप कोर्स सर्टिफिकेट.

हेही वाचा >>> Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

(५) ESTM- III (सिग्नल अँड टेली कम्युनिकेशन डिपार्टमेंट) – १५ पदे .

पात्रता : १०वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/वायरमन ट्रेडमधील आयटीआय कोर्स सर्टिफिकेट किंवा १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील अॅप्रेंटिसशिप कोर्स सर्टिफिकेट किंवा फिजिक्स आणि मॅथ्स विषयांसह १२ वी उत्तीर्ण.

(६) असिस्टंट लोको पायलट (इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट) – १५ पदे

पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि आर्मेचर अँड कॉईल वाईंडर/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ हिट इंजिन/ इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक मोटर वेहिकल/ मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ अँड टीव्ही/ रेफ्रिजरेशन अँड ए.सी. मेकॅनिक/ ट्रक्टर मेकॅनिक/ टर्नर/ वायरमन ट्रेडमधील आयटीआय कोर्स सर्टिफिकेट.

किंवा १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट कोर्स.

किंवा १० वी उत्तीर्ण आणि मेकॅनिक/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा अलाईड विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा. (वरील विषयातील इंजिनीअरिंग पदवीधारक उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.)

(७) स्टेशन मास्टर (ऑपरेटिंग डिपार्टमेंट) १ पद

(८) गुड्स ट्रेन मॅनेजर (ऑपरेटिंग डिपार्टमेंट) ५ पदे

(९) कमर्शियल सुपरवायझर (कमर्शियल डिपार्टमेंट) ५ पदे

पद क्र. ७ ते ९ साठी पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.

(१०) सिनियर सेक्शन इंजिनीअर/इलेक्ट्रिकल (इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट) ५ पदे

पात्रता – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग पदवी (४ वर्षं कालावधीची) किंवा अलाईड विषयातील इंजिनीअरिंग पदवी.

(११) सिनियर सेक्शन इंजिनिअर/सिव्हील (सिव्हील डिपार्टमेंट) ५ पदे

पात्रता – ४ वर्षं कालावधीची सिव्हील इंजिनीअरिंग पदवी किंवा अलाईड विषयातील इंजिनीअरिंग पदवी.

वयोमर्यादा : (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) १८ ते ३६ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; माजी सैनिक (खुला/ईडब्ल्यूएस) – ३ वर्षे, इमाव – ६ वर्षे, अजा/अज – ८ वर्षे (सेनादलातील सेवा वगळता); दिव्यांग (खुला/ईडब्ल्यूएस) – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा/अज – १५ वर्षे; KRCL चे कर्मचारी (खुला/ईडब्ल्यूएस) – ४ वर्षे, इमाव – ७ वर्षे, अजा/अज – ९ वर्षे)

वेतन श्रेणी : पद क्र. १ व २ साठी पे-लेव्हल – १ (रु. १८,०००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ३३,८००/-.

पद क्र. ते ६ साठी पे-लेव्हल – २ (रु. १९,९००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ३७,२००/-.

पद क्र. ८ साठी पे-लेव्हल – ५ (रु. २९,२००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ५७,०००/-.

पद क्र. ७ व ९ साठी पे-लेव्हल – ६ (रु. ३५,४००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ६८,०००/-.

पद क्र. १० व ११ साठी पे-लेव्हल – ७ (रु. ४४,९००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ८४,८००/-.

निवड पद्धती : सर्व पदांसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट (CBT) कागदपत्र पडताळणी आणि वैद्याकीय तपासणी यांचा समावेश असेल.

पद क्र. १ (ट्रक मेंटेनर) व पद क्र. २ (पॉईंट्समन) साठी CBT (१०० प्रश्न (बेसिक सायन्स – २० प्रश्न, बेसिक मॅथेमॅटिक्स – ३० प्रश्न, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स – ५० प्रश्न) १०० गुणांसाठी वेळ ९० मिनिटे) आणि कागदपत्र पडताळणीनंतर रिक्त पदांच्या ३ पट उमेदवार शारीरिक क्षमता चाचणी (PET) साठी निवडले जातील.

पद क्र. १ व २ साठी शारीरिक क्षमता चाचणी – पुरुषांसाठी १,००० मीटर अंतर ४ मि. १५ सेकंदांत धावणे. महिलांसाठी ४०० मीटर अंतर ३ मि. १० सेकंदांत धावणे.

शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी helpdeskrectcell@krcl.co.in परीक्षा शुल्क – रु. ७५०/- रु. १३५/- (GST) एकूण ८५०/

उमेदवारांना पदनिहाय पसंतीक्रम ऑनलाइन अर्जात नोंद करावयाचा आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी KRCL ची वेबसाईट www.konkanrailway.com वर आपले नाव रजिस्टर करावे. ऑनलाइन अर्ज ६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत करता येतील.