Konkan Railway Recruitment 2024: कोकण रेल्वेत नोकरीसाठी संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे विभागात १९० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख आधी ७ ऑक्टोबर २०२४ अशी होती; पण आता ही अंतिम तारीख २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वाढवfण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (KRCL) अध्यक्ष व व्यवस्थापक (CMD) संतोष कुमार झा यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करीत ही अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे उमेदवार आता २१ ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज सादर करू शकतात. पण, ही भरती प्रक्रिया नेमक्या कोणत्या पदांसाठी होत आहे आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी काय असेल या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ…

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे १९० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत WWW.konkanrailway.com वर अर्ज करू शकतात.

Konkan Railway Recruitment 2024 KRCL Konkan Railway Corporation Limited Bharti
Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेत १० वी, १२ वी ते पदवीधरांना नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया होणार सुरु
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
ankita walawalkar aka kokan hearted girl replied to netizen
“गावी कोणीही या मुलीचं Welcome केलं नाही” नकारात्मक कमेंट करणाऱ्या युजरला अंकिताने सुनावलं; म्हणाली, “मी मुद्दाम…’
ONGC Bharti 2024
ONGC Bharti 2024 : १०वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! ONGC अंतर्गत २२३६ पदांची भरती सुरू; जाणून घ्या, किती मिळणार पगार ?
Ratan Tata Will Tito dog
Ratan Tata Will: रतन टाटांनी १० हजार कोटींची संपत्ती सोडली, इच्छापत्रात श्वानाचीही केली सोय; नोकर, भाऊ-बहीण, शंतनू नायडूचाही उल्लेख
Mumbai airport jobs
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड ड्युटी पदांची भरती
india post payments bank recruitment to the post of executive for 344 vacancies on contractual basis
नोकरीची संधी : ग्रामीण डाक सेवकांसाठी ‘एक्झिक्युटिव्ह’ पदाची भरती
Congress 1st candidate list 2024 for Legislative Assembly Election 2024 Declared in Marathi
Congress Candidate List 2024 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ‘हा’ उमेदवार लढणार

पदांची नावे आणि तपशील :

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गत होणाऱ्या या भरती प्रक्रियेंतर्गत सीनियर सेक्शन इंजिनीयर (Civil) पदासाठी ०५ जागा, सीनियर सेक्शन इंजिनीयर (Electrical) पदासाठी ०५ जागा, स्टेशन मास्टर पदासाठी १० जागा, तसेच कमर्शियल सुपरवायजर ०५ जागा, गुड्स ट्रेन मॅनेजर ०५ जागा, टेक्निशियन III (Mechanical) २० जागा, टेक्निशियन III (Electrical) १५ जागा, ESTM-III (S&T) पदासाठी १५ जागा, असिस्टंट लोको पायलट पदासाठी १५ जागा, पॉइंट्समन पदासाठी ६० जागा आणि ट्रॅक मेंटेनर-Iपदासाठी ३५ जागा, अशा मिळून एकूण १९० जागांवर भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेतील रिक्त पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. इयत्ता १० वी, १२ वीसह कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकतात. पण, यासह काही पदांसाठी १२ वीत Physics & Maths या विषयांत उत्तीर्ण असण्यासह इंजिनियरिंगमधील विविध विषयांमधील पदवी आवश्यक आहे. या पदवी विषयांमध्ये (Civil, Mechanical/ Electrical / Electronics, Automobile) ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman/ Armature and Coil Winder, / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) समावेश आहे. किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile) आवश्यक आहे.

हेही वाचा – CIDCO Lottery 2024 : सिडको लॉटरीसाठी कसा करावा ऑनलाइन अर्ज? आवश्यक कागदपत्रं अन् पात्रता काय? सर्वकाही वाचा एका क्लिकवर

वयाची अट : उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२४ दरम्यान किमान १८ ते ३६ असणे आवश्यक आहे. पण, एससी आणि एसटी उमेदवारांना वयात ०५ वर्षे, तर ओबीसी उमेदवारांना ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार हे २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. ही अर्जाची प्रक्रिया १६ सप्टेंबर २०२४ पासून सुरू झाली आहे.

अर्ज शुल्क : ८८५ रुपये

नोकरीचे ठिकाण : कोकण रेल्वे

पगार

भरती प्रक्रियेत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना विविध पदांनुसार दरमहा ४४,९०० ते १८,००० रुपयांदरम्यान पगार दिला जाणार आहे.

अधिकृत जाहिरात आणि पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
konkanrailway.com

अधिकृत वेबसाईट
konkanrailway.com

उमेदवारांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नका.

लोटे एमआयडीसीमधील रेल्वे रोलिंग स्टोक कंपोनंन्ट्स फॅक्टरीसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असल्याची अफवा पसरवली जात आहे. अनेक जण त्या अफवांवर विश्वास ठेवत आहेत. पण, या अफवा खोट्या असून रेल्वे रोलिंग फॅक्टरीसाठी कोणतीही भरती प्रक्रिया राबवली जात नसल्याचे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (KRCL) अध्यक्ष व व्यवस्थापक (CMD) संतोष कुमार झा यांनी स्पष्ट केले.