डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षक पदांच्या २९० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करु शकतात, तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२३ ही आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची माहिती जाणून घेऊया.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती २०२३ –
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक.
एकूण रिक्त पदे – २९०
- सहाय्यक प्राध्यापक – ४५
- शिक्षक – २४५
शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी – M.Sc/ M.Tech + NET/ Ph.D.
शिक्षक पदासाठी – M.Sc/ M.Tech/ M.E + SET/ NET/ Ph.D.
अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – २०० रुपये.
- मागासवर्गीय – १०० रुपये.
नोकरी ठिकाण – औरंगाबाद.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १० जून २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जून २०२३
भरतीसंदर्भातील अधिकच्या माहितीसाठी http://www.bamu.ac.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.
सहायक प्राध्यापक पदांची जाहिरात पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1wO3xPLDXf_POttEG4p3IbKMTbR8V1PSe/view?pli=1) या लिंकवर क्लिक करा.
शिक्षक पदांची जाहिरात पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1RMZvNRyrenh4rkm9lb31if591H5C2ATw/view) या लिंकवर क्लिक करा.