१) महाराष्ट्र शासनाचे सेंट जॉर्जेस रुग्णालय, पी. डिमेलो रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ, जनरल पोस्ट ऑफिसमागे, मुंबई- ४०० ००१. (जाहिरात क्र. सेंजॉरु/नर्सिंग आस्था/ जीएनएम जाहिरात /२३३७/२०२४, दि. ०८.०७.२०२४) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सुरू होणाऱ्या ३ वर्षांच्या सामान्य परिचर्या व प्रसविका (GNM) अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाकरिता एकूण २० (महिला १४ व पुरुष ६) यांना प्रवेश. (ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी ५० टक्के जागा व बृहन्मुंबईमधील उमेदवारांसाठी ५० टक्के जागा)
पात्रता : १२ वी उत्तीर्ण (विज्ञान शाखेस प्राधान्य).
अर्जाची किंमत : खुला प्रवर्ग रु. २००/-; मागासप्रवर्ग – रु. १००/-.
अर्ज मिळण्याचा व अर्ज स्वीकृतीचा पत्ता : परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, तळ मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, मुंबई ४००००१. प्रवेश अर्ज मिळण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाईल प्रमाणपत्र), जात प्रमाणपत्र (आरक्षण कोट्यासाठी) तसेच १२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका असणे आवश्यक आहे.
अर्ज विक्री : दि. १७ जुलै २०२४ (संध्याकाळी ५.०० पर्यंत).
अर्ज स्वीकृती : दि. १८ जुलै (संध्याकाळी ५.०० पर्यंत).
गुणवत्ता यादी प्रसिद्ध : दि. २४ जुलै २०२४ (१२.०० वाजता). गुणवत्ता यादीतील आक्षेप व तक्रार निवारण दि. २५ जुलै २०२४ (सकाळी १२.०० ते ४.००). मुलाखत (मूळ प्रमाणपत्रांसह हजर रहावे) दि. २६ जुलै २०२४ (सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत).
अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी दि. २७ जुलै २०२४ (सकाळी १०.०० नंतर). प्रवेश अर्जासोबत खालील साक्षांकीत सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. (नियम व अटी प्रवेश पुस्तिकेमध्ये देण्यात आले आहेत.)
२) महाराष्ट्र शासनाचे गोकुळदास तेजपाल रुग्णालय (GT Hospital), मुंबई परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय (ग्रँट वैद्याकीय महाविद्यालय, संलग्न), लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१. (कार्यालयीन आदेश क्र. गोतेरु/ नर्सिंग/ प्रवेश प्रक्रिया / ३३०४/ २०२४, दि. ०९.०७.२०२४) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सुरू होणाऱ्या ३ वर्षांच्या सामान्य परिचर्या व प्रसविका (GNM) अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाकरिता एकूण २५ (महिला व पुरुष) यांना प्रवेश. (ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी ५० टक्के जागा व बृहन्मुंबईमधील उमेदवारांसाठी ५० टक्के जागा)
अर्जाची किंमत : खुला प्रवर्ग रु. २००/-; मागासप्रवर्ग – रु. १००/-.
अर्ज मिळण्याचा व अर्ज स्वीकृतीचा पत्ता : तळ मजला, ओपीडी बिल्डींगच्यासमोर, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई ४००००१. प्रवेश अर्ज मिळण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाईल प्रमाणपत्र), जात प्रमाणपत्र (आरक्षण कोट्यासाठी) तसेच १२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका असणे आवश्यक आहे.
अर्ज विक्री : दि. १७ जुलै २०२४ (संध्याकाळी ५.०० पर्यंत).
अर्ज स्वीकृती : दि. १८ जुलै (संध्याकाळी ५.०० पर्यंत).
गुणवत्ता यादी प्रसिद्ध – दि. २४ जुलै २०२४ (संध्याकाळी ४.०० नंतर). गुणवत्ता यादीतील आक्षेप व तक्रार निवारण दि. २५ जुलै २०२४ (सकाळी ९.०० ते ४.००).
मुलाखत (मूळ प्रमाणपत्रांसह हजर रहावे) दि. २६ जुलै २०२४ (सकाळी ९.०० वाजता). अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी दि. २७ जुलै २०२४ (दुपारी २.०० नंतर). प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे दि. २९ जुलै २०२४ (सकाळी ९.०० वाजता).
प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी दि. ३० जुलै २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता उपस्थित रहावे. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी दि. ३० जुलै रोजी सकाळी ९.०० वाजता उपस्थित रहावे.
दोन्ही ठिकाणच्या प्रवेश अर्जासोबत खालील साक्षांकीत सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे : शाळा सोडल्याचा दाखला; १० वी व १२ वी परीक्षांच्या गुणपत्रिका व उत्तीर्णचे प्रमाणपत्र; अलिकडील पासपोर्ट आकाराचा फोटो; अर्हताकारी परीक्षा (१२ वी) किती प्रयत्नांत उत्तीर्ण करण्यात आली, त्याबाबतचे शाळा किंवा महाविद्यालयाचे प्रमाणपत्र (Attempt Certificate); अधिवास प्रमाणपत्र (Domicile) व भारतीय नागरिकत्व (Nationality) दाखला; जात प्रमाणपत्र; जात वैधता प्रमाणपत्र; वैद्याकीय सक्षमता प्रमाणपत्र (Medical Fitness Certificate); आधारकार्ड.