सुहास पाटील

विद्यार्थी जनहो जागे व्हा आणि केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत ग्रुप-सी व ग्रुप-बी (अराजपत्रित) पदांवर भरती होण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करून प्रतिष्ठित/सन्माननीय पदांवर भरती व्हा.

rte, rte admission, rte maharashtra,
आरटीई प्रवेशांबाबत सरकारला दणका, निकालावर याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?
नोकरीची संधी: केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमधील भरती
नोकरीची संधी: केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमधील भरती
Chandrakant Patil, Chandrakant Patil minister,
मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या शिक्षण संस्थांची मान्यता रद्द, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा
tuition fees, scheme, Government,
दर महिन्याला ६ ते १० हजार विद्यावेतन, सरकारची आणखी एक योजना
mumbai high court
विशेष मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्याचे काय झाले? उच्च न्यायालयाची केंद्र-राज्य सरकारला विचारणा
Barty awarded contracts to institutes with no experience in JEE and NEET exam coaching Nagpur
‘जेईई’,‘नीट’चा अनुभव नसणाऱ्या संस्थांना विनानिविदा कंत्राट; ‘बार्टी’च्या संस्था निवडीच्या…
nagpur, higher studies, free admission,
उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जात आहात, शासकीय वसतिगृहांमध्ये मोफत प्रवेशाचा लाभ घ्या, मुलींसाठीही संधी, या तारेखपर्यंत…
State Level II CET for BMS BMS BBA BCA Admission
प्रवेशाची पायरी: बीएमएस/ बीएमएस/ बीबीए/ बीसीए प्रवेशासाठी राज्यस्तरीय द्वितीय सीईटी

(III) पदवी उत्तीर्ण पात्रतेच्या निकषानुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षा – (६) कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन, २०२४ –

जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक ११ जून २०२४. परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ दरम्यान घेतली जाणार आहे.

पात्रता – पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – काही पदांसाठी १८-२७ वर्षे/१८-३० वर्षे. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर पदासाठी ३२ वर्षेपर्यंत.

वेतन – पे-लेव्हल – ४ साठी रु. ५०,०००/- पासून ते पे-लेव्हल – ८ साठी रु. ८७,०००/- दरमहा वेतन असलेली विविध पदे.

परीक्षा पद्धती – टायर-१ संगणक आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा जनरल अ‍ॅण्ड रिझिनग इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन प्रत्येकी २५ प्रश्न, प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण, एकूण १०० प्रश्न, २०० गुण, वेळ ६० मिनिटे.

टायर-२ – संगणक आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा – सेक्शन-१ – मोडय़ुल-१, पेपर-१ (सर्व पदांसाठी अनिवार्य आहे.) मॅथेमॅटिकल अ‍ॅबिलिटी – ३० प्रश्न; मॉडय़ुल – २ – रिझिनग अ‍ॅण्ड जनरल इंटेलिजन्स – ३० प्रश्न, एकूण – ६० प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण १८० गुण, वेळ २ तास १५ मिनिटे.

सेक्शन-२ – मॉडय़ुल – १ – इंग्लिश लँग्वेज अ‍ॅण्ड कॉम्प्रिहेन्शन – ४५ प्रश्न, प्रत्येकी ३ गुण; मॉडय़ुल – २ – जनरल अवेअरनेस – २५ प्रश्न, एकूण ७० प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण २१० गुण, वेळ १ तास.

सेक्शन-३ – मॉडय़ुल-१ – कॉम्प्युटर नॉलेज – २० प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण ६० गुण, वेळ १५ मिनिटे.

सेक्शन-२ – सेक्शन-३ – मॉडय़ुल – २ – डेटा एन्ट्री स्पीड टेस्ट दिलेला उतारा टाईप करणे ३५ मिनिटांत २,००० की डिप्रेशन्स.

पेपर-१ मधील सेक्शन – १, सेक्शन – २, सेक्शन – ३ मधील मॉडय़ुल-१ मधील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.

पेपर-२ – स्टॅटिस्टिक्स – १०० प्रश्न, प्रत्येकी २ गुण, एकूण २०० गुण, वेळ १२० मिनिटे. (ज्युनियर स्टॅटिस्टिकल, ऑफिसर पदासाठी)

पेपर-३ – जनरल स्टडीज

(फिनान्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स) १०० प्रश्न, प्रत्येकी २ गुण, एकूण २०० गुण, वेळ १२० मिनिटे.

पेपर-२ व पेपर-३ मधील चुकीच्या उत्तरासाठी ०.५० गुण वजा केले जातील.

(७) ज्युनियर इंजिनीअर (सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अॅलण्ड  QSC) एक्झामिनेशन, २०२४ –

जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक २९ फेब्रुवारी २०२४. परीक्षा मे-जून २०२४ दरम्यान घेतली जाणार आहे.

पात्रता – सिव्हील/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअिरग डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण. (काही पदांसाठी डिप्लोमा धारकांसाठी २ वर्षांचा अनुभव आवश्यक)

वयोमर्यादा – ३० वर्षेपर्यंत (काही पदांसाठी ३२ वर्षेपर्यंत).

वेतन – पे-लेव्हल – ६ अंदाजे वेतन दरमहा रु. ६६,०००/-.

निवड पद्धती – पेपर-१ – संगणकावर आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा जनरल इंटेलिजन्स अॅ-ण्ड रिझिनग – ५० प्रश्न, जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, इंजिनिअरींगवरील प्रश्न – १००, प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण २०० गुण, वेळ २ तास.

(८) सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अ‍ॅण्ड सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सेस एक्झामिनेशन, २०२४ साठीची जाहिरात दि. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर होणार आहे. परीक्षा मे/ जून २०२४ दरम्यान होणार आहे.

पात्रता – पदवी उत्तीर्ण. वयोमर्यादा –

२०-२५ वर्षे.

वेतन – पे-लेव्हल – ६, अंदाजे वेतन दरमहा रु. ६६,०००/-.

निवड पद्धती – पेपर-१ – शारीरिक मापदंड चाचणी (PST), शारीरिक क्षमता चाचणी (PET), पेपर-२, वैद्यकीय तपासणी.

पेपर-१ – जनरल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड रिझनिंग, जनरल नॉलेज अ‍ॅण्ड जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅपप्टिटय़ूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन प्रत्येकी ५० प्रश्न/५० गुण, एकूण २०० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास.

पेपर-२ – (ऑब्जेक्टिव्ह टाईप) इंग्लिश लँग्वेज अ‍ॅण्ड कॉम्प्रिहेन्शन २०० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास.

(९) ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्यनियर ट्रान्सलेटर अ‍ॅण्ड सिनियर हिंदी ट्रान्सलेटर एक्झामिनेशन, २०२४ साठीची जाहिरात दि. २३ जुलै २०२४ रोजी जाहीर झाली आहे. परीक्षा ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घेतली जाईल.

पात्रता – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवीला हिंदी/ इंग्रजी विषय अभ्यासलेले असावेत किंवा हिंदी/ इंग्रजी माध्यम असावे.) आणि हिंदी ट्रान्सलेटर सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण.

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

वेतन – ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर/ ज्युनियर ट्रान्सलेटर पदांसाठी पे-लेव्हल – ६ अंदाजे वेतन रु. ६६,०००/-; सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी पे-लेव्हल – ७, अंदाजे वेतन रु. ८२,०००/-.

परीक्षा पद्धती – पेपर-१ (ऑब्जेक्टिव्ह टाईप) सामान्य हिंदी आणि सामान्य इंग्रजी प्रत्येकी १०० प्रश्न/१०० गुण; वेळ – २ तास. पेपर-२ – (डिस्क्रीप्टीव्ह) ट्रान्सलेशन आणि निबंध २०० गुण, वेळ २ तास.

अंतिम निवड करताना पेपर-१ व पेपर-२ चे एकत्रित गुणांचा विचार केला जाईल.

ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षांसाठी प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातात.

क्रमश:

suhassitaram@yahoo.com