डॉ.मिलिंद आपटे
● माझे वय २६ आहे. माझे डिप्लोमा इन फार्मसी २०२० मध्ये (७८.५०), बी.फार्मसी २०२३ मध्ये (७२.७८) पूर्ण झाले आहे. आणि आता एम.फार्म (फार्माकॉलॉजी) च्या शेवटच्या वर्षाला आहे. तर पुढे नोकरीसाठी काय करावे लागेल, कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळेल. साधारण वेतन काय असते? अजून काही नवीन करायची आवश्यकता आहे का? – पुष्पक बारी
– आरोग्यसेवेमध्ये फार्माकोलॉजीचे वाढते महत्त्व लक्षात घेता, फार्माकोलॉजीचे भविष्य आशादायक आहे. इतके कष्ट घेत आहात तर पुढे संशोधनाकडे जाण्याचा सल्ला नक्कीच द्यावा लागेल, अन्यथा शैक्षणिक, संशोधन, औषध उद्याोगातील भूमिका आणि नियामक बाबींमध्ये संधी उपलब्ध आहेत. औषध निरीक्षक, फार्मस्युटीकल मार्केटिंग मॅनेजर, फार्मास्युटिकल विक्री प्रतिनिधी, फार्मास्युटिकल लॅब सायंटिस्ट
हे वरील काही ठळक करिअर आहेत, वेतन म्हणाल तर वार्षिक ४ लाख ते ७ लाख असू शकते.
● सध्या मी नव्याने सुरू झालेल्या IARI संस्थांपैकी एका संस्थेत B. Sc. ऑनर्स (कृषी) करत आहे. मला संशोधनाची आवड आहे आणि माझा कल मुख्य विज्ञान ( Pure Sciences) कडे आहे. मी पूर्वी IISER सारख्या संस्थेत प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात यश मिळाले नाही. सध्या जवळपास सर्वजण स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा सल्ला देतात, त्यामुळे करिअरच्या दृष्टीने नेमके काय निवडावे – संशोधन की स्पर्धा परीक्षा – याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. कृपया या संदर्भात मला योग्य मार्गदर्शन करावे. – अर्पिता झाडके
– तुमचा कल संशोधांनकडे आहे असे लक्षात येते. आजूबाजूच्या वातावरणा मुळे बरेचदा असे मन विचलित होते कारण संशोधना मध्ये रुचि असणारे फार कमी त्यामुळे अशी अवस्था होवू शकते पण शेवटी हा पूर्णपने तुमचा निर्णय असावा किंवा समुपदेशकाकडे जावून सल्ला घ्यावा कारण तुमच्या क्षमता आणि कल या दोन्ही गोष्टी समजून घेणे या ठिकाणी गरजेचे आहे. खूप शुभेच्छा.
careerloksatta@gmail. com