डॉ.मिलिंद आपटे
● माझी मुलगी यावर्षी दहावी उत्तीर्ण झाली आहे. तिला ९३.४० गुण मिळाले आहेत. तिला कॉमर्स घ्यायचे आहे. भविष्यात गणित विषय घेऊन किंवा न घेता काय संधी उपलब्ध आहेत. तिला गणितात ९० गुण मिळाले आहेत. बारावी नंतर बीकॉम करावे की बीबीए याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. – मेघा दास

-९३.४० गुण मिळाले आहेत, तिला कॉमर्स घ्यायचे आहे येवढे विचार पक्के असतील तर निर्णय योग्यच असतो. गणित विषय तिने नक्की घ्यावा. वाणिज्य विषयासोबत पूर्ण गणित घेणे भविष्यात खूप उपयोगी पडेल. सीए, सीएमए सीएफए , हे उच्च शिक्षणाचे व्यावहारिक शिक्षण आहे. शिवाय अर्थशास्त्र सांख्यिकी हे विषय तिला आयईएस इकनॉमिक सर्व्हिसेससाठी मार्ग देतात. उच्च शिक्षणासाठी अर्थशास्त्र किंवा आयएसआय इंडियन स्टॅटेस्टिकल इन्स्टिट्यूट ध्येय ठेवता येईल. बी कॉम किंवा बीबीए हा निर्णय तिच्या अभिक्षमता नुसार घ्यावा. मुलगी हुशार आणि मेहनती असेल तर वरील संधींचा विचार करावा. खूप शुभेच्छा.

● मी सध्या यूपीएससीची तयारी करत आहे. पदवी मिळून (बीकॉम) होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. ८.८० सीजीपीए मिळाले. दहावीला ७८ व बारावीला ८० मिळाले. मी यूपीएससीच्या दोन प्रिलिम्स दिल्या, परंतु यश मिळाले नसल्याने प्लान बीचा विचार करतो आहे. कृपया असे काही कोर्सेस सुचवावे ज्याचा फायदा चांगली नोकरी मिळवण्याकरता होईल. माझा जर्मन भाषा शिकण्याचा विचार सुरू आहे त्याचा काही फायदा होईल का हेही सांगावे. मला एक सुरक्षित व ग्रोइंग करिअर हवे आहे. मी हे करत असताना यूपीएससी देखील करत रहाणार आहे. – अर्शद शेख

– ज्यावेळी यूपीएससीचा विचार असतो त्यावेळी नेतृत्व आणि समाजतील स्थान हे मुख्यत्वे विचार व्यक्ति मध्ये आढळतात. त्यामुळे तिथून दूर होऊन वेगळ्या करिअरचा विचार मनात रुजणे तसे अवघड असते बीकॉम नंतर करिअरसाठी प्र्त्यक्ष व अप्रत्यक्ष कर याचे सर्टिफिकेट घेऊन त्याची प्रॅक्टिस करावी किंवा इंडस्ट्रीयल अकाऊंटिंग हा कोर्स करावा ज्यामुळे स्वयम रोजगार निर्माण होऊ शकतो किंवा नोकरी सुद्धा मिळू शकते. अन्यथा एमबीएची तयारी करावी व त्यासोबत सगळ्या बँक परीक्षा व स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा द्याव्यात. खूप शुभेच्छा.

careerloksatta@gmail.com