सुहास पाटील

GATE परीक्षा आता बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी. उत्तीर्ण उमेदवारांनासुद्धा देता येणार. ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनीअरिंग ( GATE). नॅशनल को-ऑर्डिनेशन बोर्ड (NCB)- GATE, डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन (MoE), भारत सरकार यांच्या वतीने इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (IISc) बंगलोर आणि बॉम्बे, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास आणि रूरकी या सात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी ( IITs) संयुक्तपणे  GATE ही राष्ट्रीय परीक्षा आयोजित करीत असतात.  GATE 2024 या परीक्षेसाठी  ककरू बेंगळूरु ही ऑर्गनायिझग इन्स्टिटय़ूट आहे. देशभरातील २३ IITs; ३१ नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) आणि ४ इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs) (पुणे, बंगळूरु, हैदराबाद आणि भुवनेश्वर);  IISc बंगलोर, ७ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (IISERs) (पुणे, भोपाळ, मोहाली, तिरूपती, कोलकात्ता, तिरूअनंतपुरम् आणि बेरहामपूर) मधील मास्टर्स (ME/ M. Tech.) आणि डॉक्टोरल (Ph. D.) प्रोग्राम्स इन इंजिनीअरिंग/ सायन्स/ कॉमर्स/ आर्ट्सच्या प्रवेशासाठी आणि/ किंवा  MoE आणि इतर गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स/ असिस्टंटशिप्स मिळविण्यासाठी  GATE ही पात्रता परीक्षा आहे.

Educational Opportunity Admission to Doctorate of Philosophy
शिक्षणाची संधी: डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी करण्यासाठी प्रवेश
Central Institute of Fisheries Education Mumbai recruitment 2024
CIFE Mumbai recruitment 2024 : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! पाहा अधिक माहिती
Job Opportunity UPSC Exams career
नोकरीची संधी: यूपीएससीच्या परीक्षा
Indian Institute of Management Mumbai hiring post
IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये नोकरीची संधी! पाहा माहिती

काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज (PSUs) (जसे की  BHEL,  GAIL,  HAL,  IOCL,  NTPC,  NPCIL,  ONGC,  PGCI B) इंजिनिअरींग पदांवरील भरतीसाठी आणि देशभरातील व परदेशातील अनेक विद्यापीठामधील उच्च शिक्षणासाठी  GATE स्कोअर ग्राह्य धरला जातो.

केंद्र सरकारमधील ग्रुप-ए पदांवर (Senior Field Officer (Tele),  Senior Research Officer ( CRYPTO),  Senior Research Officer ( S & T)) भरती.  GATE स्कोअर आधारित केली जाते.

हेही वाचा >>> स्पर्धेत धावण्यापूर्वी : स्पर्धा स्वत:शीच

 GATE 2024 स्कोअर रिझल्ट जाहीर झाल्या दिवसापासून ३ वर्षेपर्यंत वैध असेल.

 GATE 2024 परीक्षा एकूण ३० विषयांसाठी आयोजित केली जाईल. (२०२१ पासून नवीन एन्व्हायर्मेटल सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग (XH) व ह्युमॅनिटिज अ‍ॅण्ड सोशल सायन्स ( ऌ) या दोन विषयांचा समावेश केला आहे.) २०२२ पासून जीओमॅटिक्स इंजिनीअरिंग (GE) व नेव्हल आर्किटेक्चर अ‍ॅण्ड मरिन इंजिनीअरिंग (NM) या दोन नवीन विषयांचा समावेश केला आहे. २०२४ परीक्षेत डेटा सायन्स अ‍ॅण्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स (DA) या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.

ह्युमॅनिटिज अ‍ॅण्ड सोशल सायन्स (XH) या पेपरमध्ये पुढील विषयांचा समावेश आहे. इकॉनॉमिक्स, लिंग्विस्टिक्स (भाषाशास्त्र), फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, सोशिऑलॉजी.

 IIT मद्रास, कानूपर, खरगपूर आणि बॉम्बेमध्ये ह्युमॅनिटिजमधील मास्टर्स अ‍ॅण्ड डॉक्टोरल प्रोग्राम्ससाठी प्रवेश दिले जातात.

GATE 2024 परीक्षा दिनांक ३, ४, १०, ११ फेब्रुवारी २०२४ रोजी (प्रत्येक दिवशी दोन सेशन्समध्ये) देशभरातील २०२ केंद्रांवर आणि परदेशातील ६ केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे.

GATE 2024 साठी  IIT बॉम्बे झोनमध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बारामती, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, पनवेल-रायगड, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, वसई-पालघर, वर्धा, यवतमाळ, संगमनेर-लोणी-शिर्डी इ. ३७ केंद्रांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : महाराष्ट्रातील एकूण किनारपट्टीवर किती बेटे आणि खाड्या बघायला मिळतात?

GATE 2024 साठी पुढील पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक – बी.ई./ बी.टेक./ बी.फार्म./ बी.आर्च./बी.एस्सी. (रिसर्च)/ बी.एस./ फार्म.डी. (१० २ नंतर ६ वर्षांचा कोर्स)/एम.बी.बी.एस./ एम.एस्सी./ एम.ए./ एम.सी.ए./इंटिग्रेटेड एमई/ एम.टेक./ बी.एस्सी./ बी.ए./ बी.कॉम. (पदवीच्या तिसऱ्या किंवा त्यापुढील वर्षांत शिकणारे उमेदवार  GATE 2024 साठी पात्र आहेत.)

पुढील ७ प्रोफेशनल सोसायटीज/ इन्स्टिटय़ूशन्समधील इंजिनीअरिंग पदवी समतूल्य परीक्षा उत्तीर्ण करणारे उमेदवार  GATE 2024 साठी पात्र आहेत. दी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) (IE), दी इन्स्टिटय़ूट ऑफ सिव्हील इंजिनीअर्स (ICE), दी इन्स्टिटय़ूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन इंजिनीअर्स (IETE), दी एअरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (AeSI), दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल इंजिनीअर्स (IIChemE), दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मेटल्स ( IIM) आणि दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअर्स (IIE).

परीक्षा पद्धती –  GATE 2024 चे सर्व विषयांचे पेपर्स पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असतील, ज्यात (i) मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ( MCQ), (ii) मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन ( MSQ) आणि/ किंवा (iii) न्यूमरिकल अ‍ॅन्सर टाईप ( NAT) अशाप्रकारच्या प्रश्नांचा समावेश असेल.

उमेदवारांना दिलेल्या जोड विषयांतील यादीतून एक किंवा दोन विषय निवडता येतील.

GATE-2024 परीक्षेसाठी कोणतीही वयाची अट ठेवलेली नाही.

विषयवार गुणांची विभागणी अशी असेल – आर्किटेक्चर आणि प्लानिंग (AR), केमिस्ट्री (CY), इकॉलॉजी आणि इव्हेल्यूशन (EY), जीऑलॉजी आणि जीओफिजिक्स (GG), मॅथेमॅटिक्स (MA), फिजिक्स (PH), ह्युमॅनिटिज अ‍ॅण्ड सोशल सायन्स (XH) आणि  L पेपर्ससाठी जनरल अ‍ॅप्टिटय़ूड – १५ गुण  विषयासाठी ८५ गुण, एकूण १०० गुण.

वरील विषय वगळता इतर विषयांसाठी – जनरल अ‍ॅप्टिटय़ूड – १५ गुण   इंजिनीअरिंग मॅथेमॅटिक्स – १३ गुण  विषयावरील प्रश्नांसाठी ७२ गुण, एकूण १०० गुण.

प्रत्येक पेपरसाठी १८० मिनिटांचा कालावधी असेल. प्रश्न १ किंवा २ गुणांसाठी असतील. MCQ type प्रश्नांच्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील. MSQ/ NAT type प्रश्नांच्या चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

काही संस्थांमध्ये फक्त  GATE-2024 च्या स्कोअरवर आधारित प्रवेश दिले जातील. काही संस्थांमध्ये प्रवेश  GATE-2024 मधील कामगिरी (७० टक्के वेटेज) आणि अ‍ॅडमिशन टेस्ट/ इंटरह्यूमधील कामगिरीवर (३० टक्के वेटेज) देवून दिले जातील.

 GATE ऑनलाइन प्रोसेसिंग सिस्टीम (GOAPS) वेबसाईट  https://gate2024.iisc.ac.in/ वर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दि. ३० ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाली आहे.

अर्जाचे शुल्क – प्रत्येक पेपरसाठी महिला  – अजा/अज/दिव्यांग – रु. ९००/-, इतरांसाठी – रु. १,८००/-.

ऑनलाइन अर्ज विलंब शुल्कासह (रु. ५००/-) ऑनलाइन अर्ज दि. १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत भरता येतील.

ऑनलाइन अर्जात काही बदल करावयाची असल्यास दि. ७ ते ११ नोव्हेंबर २०२३ दरम्यान करता येईल.

अ‍ॅडमिट कार्ड ३ जानेवारी २०२४ पासून https://gate.iitk.ac.in// या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.

GATE परीक्षा दि. ३, ४, १०, ११ फेब्रुवारी २०२४ रोजी (प्रत्येक दिवशी दोन सत्रांमध्ये) घेतली जाईल.

अ‍ॅप्लिकेशन पोर्टलवर Answer Key दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी उपलब्ध केल्या जातील.

Answer Key वरील हरकती उमेदवारांना २२ ते २५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान घेता येतील.

GATE-2024 परीक्षेचा निकाल दि. १६ मार्च २०२४ रोजी जाहीर होईल. २३ मार्च २०२४ पासून स्कोअर कार्ड डाऊनलोड करता येतील.

सोसायटी फॉर अ‍ॅप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग रिसर्च (SAMEER), IIT कँपस, पवई, मुंबई – ४०० ०७६ Vacancy Circular 09/2023  dt. 21 st September 2023) ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा इंजिनिअर्स अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी पदांची अ‍ॅप्रेंटिस अ‍ॅक्ट अंतर्गत भरतीसाठी वॉक-इन-इंटरह्यू. एकूण रिक्त पदे – २८. ( क) ग्रॅज्युएट इंजिनिअर्स अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी – एकूण २० पदे.

(१) इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन – १६ पदे (इंटरह्यू दि. १७ ऑक्टोबर २०२३).

(२) कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग/आयटी – २ पदे (इंटरह्यू दि. १८ ऑक्टोबर २०२३).

(३) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – २ पदे (इंटरह्यू दि. १८ ऑक्टोबर २०२३).

पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विषयातील पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(II) डिप्लोमा इंजिनिअर्स अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी.

इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन – ८ पदे (इंटरह्यू दि. १७ ऑक्टोबर २०२३).

पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.

उमेदवारांनी बोर्ड ऑफ अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी (BOAT) मुंबई यांचेकडे नोंदणी केलेली असावी. पात्रता परीक्षा ३ वर्षांच्या आत उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार इंटरह्यूसाठी पात्र आहेत.

स्टायपेंड – ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी रु. १०,५००/-, डिप्लोमा अ‍ॅप्रेंटिस टेनी रु. ८,५००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

अ‍ॅप्रेंटिस ट्रेनीज, एम्प्लॉईजसाठी उपलब्ध असलेली बसची सोय आणि कँटीन सेवा घेण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा – २५ वर्षे.

वॉक-इन-इंटरह्यू तपशिल – वेळ सकाळी ९.३० वाजता (सकाळी १०.०० वाजेनंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.)

(१) इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन ग्रॅज्युएट – १७ ऑक्टोबर २०२३.

(२) मेकॅनिकल इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग/आयटी ग्रॅज्युएट आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन डिप्लोमा – १८ ऑक्टोबर २०२३.

वॉक-इन-इंटरह्यू ठिकाण –  SAMEER,  IIT Campus,  Hill Side,  Powai,  Mumbai – 400 076.

उमेदवारांनी  http://www.sameer.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरातीसोबत दिलेल्या नमुन्यातील अर्ज पूर्ण भरून सोबत पुढील मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्सचा एक संच घेऊन उपस्थित रहावे.

(१) १० वी/१२ वीचे मार्कशिट, (२) पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि सर्व सेमिस्टर्सचे मार्कशिट, (३) अनुभव (असल्यास) दाखला, (४) जन्मतारखेचा पुरावा, (५) पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ.suhassitaram@yahoo.com