मर्चंट नेव्ही (मेरिटाईम इंडस्ट्री)मध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी. मेरिटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (MTI), पवई, मुंबई येथे डिजी शिपिंग (भारत सरकार) द्वारे मंजूर ६ महिन्यांचा जनरल पर्पज रेटींग (जीपी रेटींग) कोर्स आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या जहाजावरील १२ महिन्यांचा स्ट्रक्चर्ड शिपबोर्ड ट्रेनिंग घेऊन एनव्हीसी डेक ऑफिसर बनण्यासाठी १८ महिन्यांच्या कोर्सकरिता प्रवेश.

पात्रता – १० वी (इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांसह) किमान सरासरी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (१० वी किंवा १२ वीला इंग्रजी विषयात किमान ४० टक्के गुण आवश्यक.) किंवा १२ वी (कोणतीही शाखा) किमान सरासरी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (उमेदवार १० वी (इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांसह उत्तीर्ण असावा; १० वी किंवा १२ वीला इंग्रजी विषयात किमान ४० टक्के गुण आवश्यक.)

किंवा फिटर/मशिनिस्ट/मेकॅनिक/वेल्डर/टर्नर ट्रेडमधील २ वर्षं कालावधीचा आयटीआय कोर्स अंतिम वर्षी किमान सरासरी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (१० वी/१२ वीला इंग्रजी विषय किमान ४० टक्के गुण आवश्यक.)

अजा/अज उमेदवारांसाठी पात्रता परीक्षेतील गुणांमध्ये ५ टक्के सूट दिली जाईल. (इंग्रजी विषयासाठी ही सूट लागू नाही.) १२ वी (विज्ञान) किमान सरासरी ४० टक्के गुण आणि इंग्रजी विषय ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

वयोमर्यादा – (प्रवेश घेण्याच्या दिवशी) १७.५ वर्षे ते २५ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – अजा/अज – ५ वर्षे, इमाव – ३ वर्षे, महिला उमेदवारांसाठी अधिकची २ वर्षे). शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी ः mti@sci.co.in, फोन नं. ९१८३६९६७६४३९.

कोर्स फी – पुरुष – रु. ४,५०,०००/-; महिला – रु. ३,६०,०००/-. कोर्स फी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड असेट्स लिमिटेड (SCILAL) – MTI, मुंबई यांच्या नावे भरावयाचे आहे. शैक्षणिक कर्ज मिळविण्यासाठी SCILAL – MTI यांचेकडून आवश्यक ती कागदपत्र दिली जातील.

स्टायपेंड – उमेदवारांना १२ महिन्यांच्या स्ट्रक्चर्ड शिपबोर्ड ट्रेनिंगच्या दरम्यान दरमहा रु. १०,०००/- स्टायपेंड दिले जाईल.निवड पद्धती – पात्र उमेदवारांना मुंबई, दिल्ली, कोलकता किंवा चेन्नई केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण करणाऱया उमेदवारांमधून रिक्त पदांच्या १ः३ प्रमाणात उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी निवडले जाईल. ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची (MCQ) कालावधी २ तास (यात प्रोफेशनल नॉलेज टेस्ट, इंग्लिश लँग्वेज टेस्ट, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड टेस्ट आणि रिझनिंग अॅबिलिटी टेस्ट यांचा समावेश असेल.) उमेदवारांना प्रत्येक टेस्ट उत्तीर्ण करावी लागेल.

ऑनलाइन परीक्षा दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता घेण्याचे नियोजित आहे.

अर्जाचे शुल्क – अजा/अज/महिला उमेदवार रु. ७००/-, इतरांसाठी रु. १,०००/-.

इंटरह्यूकरिता निवडलेल्या उमेदवारांची यादी आणि इंटरह्यूचा दिनांक, वेळ इ. तपशील https://www.mti.shipindia.com/notification या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल. इंटरह्यू १८ ते २० नोव्हेंबर २०२५ दरम्यान मुंबई येथे होतील. उमेदवारांना ई-मेल द्वारे सूचित केले जाईल. इंटरव्ह्यूच्या वेळी उमेदवारांकडे इंडियन पासपोर्ट असणे आवश्यक.

ऑनलाइन टेस्ट आणि इंटरव्ह्यू उत्तीर्ण उमेदवारांना समुपदेशनानंतर डीजी शिपिंगद्वारा मान्यताप्राप्त डॉक्टर्सकडून वैद्यकिय चाचणी करून घ्यावी लागेल. यासाठीची फी उमेदवारांनाच भरावी लागेल.

अंतिम निवड यादी MTI च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी विस्तृत माहिती https://www.mti.shipindia.com/Notification वर उपलब्ध आहे.

ऑनलाइन अर्ज आणि अर्जाचे शुल्क https://sci.marineims.com/applicationform/gprating या लिंकमधून दि. २ नोव्हेंबर २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.