How To Verify HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर झाला आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १०,४९६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १,९२९ महाविद्यालयांतील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

अनेकदा गुणपत्रिका खरी आहे की खोटी असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. मग नेमका याचा तपास कसा घ्यायचा याबद्दल आपल्याला कोणालाच कल्पना नसते. तर याच्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…विद्यार्थी शाळेतून मिळालेली इयत्ता १२ वीच्या परीक्षेची हार्डकॉपी गुणपत्रिका खरी आहे की नाही, हे ऑनलाइन पडताळून पाहू शकतात. ऑनलाइन डेटाबेसमध्ये १९९० पासूनचे सर्व रेकॉर्डस उपलब्ध आहेत. फक्त तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

बारावीच्या गुणपत्रिकेची ऑनलाईन पडताळणी कशी करायची (Verify HSC 12th Mark Sheet 2025)

१. सगळ्यात पहिला boardmarksheet.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

२. तुमचे अकाउंट नसल्यास, वैयक्तिक माहिती भरून नवीन खाते तपार करा.

३. युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्ना कोड टाकून लॉगिन करा.

४. ‘Verify HSC and SSC Mark Sheet’ या पर्यायावर क्लिक करा.

५. त्यानंतर ‘Verify HSC/12th Mark Sheet’ हा टॅब निवडा.

६. परीक्षेचे वर्ष, सत्र, बैठक क्रमांक, एकूण गुण आणि कॅप्चा कोड भरा.

७. ‘Submit’ बटणावर क्लिक करा.

८. तुमची HSC ई-गुणपत्रिका साईटवर दिसेल. हार्डकॉपीमधील माहितीशी तुलना करून तुमची गुणपत्रिका खरी आहे ना याची खात्री करून घ्या.

गुणपत्रिका तपासण्याची डायरेक्ट लिंक…

https://boardmarksheet.maharashtra.gov.in.emarksheet.cc/HSCINPUT.php