IITM Recruitment 2024 : भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) अंतर्गत भरती मोहीम जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज tropmet.res.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२४ असणार आहे.

IITM Recruitment 2024 : भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे आणि पदसंख्या, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण, अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Gokhale Institute Pune
मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेतील घटना
28 kg of on single use plastic seized by nmmc in navi mumbai
नवी मुंबईत २८ किलो एकल वापर प्लास्टिक जप्त, ९० हजार रुपयांचा दंड वसूल

नोकरी ठिकाण – पुणे</p>

रिक्त पदे आणि पदसंख्या – भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेंतर्गत ३० ‘रिसर्च असोसिएट’ आणि ‘रिसर्च फेलो’ (Research Associate & Research Fellow) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा – रिसर्च असोसिएटसाठी उमेदवाराचे वय २५ वर्षे आणि रिसर्च फेलो या पदासाठी वय २८ वर्षे असावे.

रिक्त जागा तपशील – ३० रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम सुरू आहे. त्यापैकी १० रिक्त जागा रिसर्च असोसिएट पदासाठी; तर २० रिक्त जागा रिसर्च फेलो पदासाठी आहेत.

हेही वाचा…NHPC Recruitment 2024 : NHPC मध्ये इंजिनियर्सना नोकरीची संधी! ‘या’ २६९ पदांसाठी भरती सुरू; २६ मार्चपूर्वी करा अर्ज

कसा कराल अर्ज –

  • tropmet.res.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवर आयआयटीएम रिसर्च असोसिएट आणि रिसर्च फेलो या पदासाठी PER/04/2024 या जाहिरातीवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल.
  • नंतर Apply लिंकवर क्लिक करा.
  • अर्जाचा फॉर्म भरा.
  • सर्व आवश्यक माहिती कागदपत्रे अपलोड करून द्यावी.
  • अर्ज शुल्क भरावे.
  • संदर्भासाठी या फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घ्यावी.
  • अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.