Job Fair : डायरेक्टोरेट जनरल रिसेटलमेंट (DGR)कडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. माजी सैनिकांसाठी (Ex-Servicemen) करिअर पर्याय प्रदान करण्यासाठी मुंबईत मानखुर्द येथे होणारा हा कार्यक्रम संरक्षण मंत्रालयांतर्गत आयोजित करण्यात आला आहे. २ मार्च रोजी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन सकाळी ९ ते ११.३० या दरम्यान रजिस्ट्रेशन (नोंदणी) करू शकणार आहेत.

कार्यक्रमात नाव नोंदणी करण्यासाठी पत्ता, वेळ, कागदपत्रे यांची सविस्तर माहिती पाहू…

28 kg of on single use plastic seized by nmmc in navi mumbai
नवी मुंबईत २८ किलो एकल वापर प्लास्टिक जप्त, ९० हजार रुपयांचा दंड वसूल
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन
Bhushan Gagrani BMC commissioner
मुंबईला मिळाले नवे आयुक्त, ‘या’ अधिकाऱ्यावर आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेची जबाबदारी
prepaid meter
प्रीपेड की पोस्टपेड वीज मीटर हवा ? ग्राहकांना निवड करू देण्याची जनहित याचिकेद्वारे मागणी

पत्ता :

स्पोर्ट्स ग्राउंड, तानाजी डिफेन्स कॉलनी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द (पू), मुंबई- ४०० ०८८.

वेळ :

उमेदवार सकाळी ९ ते ११.३० या दरम्यान रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत.

कागदपत्रे :

माजी सैनिक (Ex-Servicemen) आय कार्ड आणि फोटोसह नवीन बायोडेटाच्या (CV/Bio) पाच झेरॉक्स (प्रत).

नोकरी शोधणाऱ्यांसाठी फायदे:

टॉप पीएसयू / कॉर्पोरेट्सकडून अनेक नोकऱ्यांच्या संधींमध्ये मोफत प्रवेश मिळेल.

हेही वाचा…NTPC Recruitment 2024 : एनटीपीसीमध्ये नोकरीची उत्तम संधी! ‘या’ पदांच्या १०१ जागांसाठी भरती जाहीर; आजच करा अर्ज

ऑनलाइन स्टॉल बुक करण्याची सोय :

तसेच दिग्गज कॉर्पोरेट्सना ऑनलाईन स्टॉल बुक करायचा आहे. ते त्यांच्या कंपनीचा स्टॉल http://www.dgrindia.gov.in वरसुद्धा बुक करू शकतात.

अधिक माहितीसाठी https://dgrindia.gov.in/ ही अधिकृत वेबसाइट एकदा तपासून घ्यावी. आणि इच्छुक उमेदवारांनी येत्या शनिवारी मानखुर्द येथे जाऊन स्वतःची नावनोंदणी करावी.