Indian Army 140th Technical Graduate Course : भारतीय सैन्यात १४० व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमासाठी (TGC-140) इंजिनियरिंगमधील पदवीधर अविवाहित पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), डेहराडून येथे जानेवारी २०२५ मध्ये भारतीय सैन्यात कायमस्वरूपी कमिशनसाठी अभ्यासक्रम सुरू होईल. इच्छुक उमेदवार http://www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ९ मे २०२४ आहे.

रिक्त जागांचा तपशील

भारतीय सैन्याने १४० व्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रम (TGC-140) भरतीसाठी ३० रिक्त जागा अधिसूचित केल्या आहेत. जर तुम्ही इंजिनियरिंगची पदवी घेतली असेल आणि तुम्हाला भारतीय सैन्यात भरती व्हायचे असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
UPSC Civil Services Final Result 2023 Released Marathi News
UPSC CSE Final Result 2023 Out: यूपीएससीचे निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेश प्रधान दुसऱ्या क्रमांकावर!

शाखानिहाय रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे :
पोस्टचे तपशील
सिव्हिल : ७ पदे
कॉम्प्युटर सायन्स : ७ पदे
इलेक्ट्रिकल : ३ पदे
इलेक्ट्रॉनिक्स : ४ पदे
मेकॅनिकल : ७ पदे
विविध इंजिनियरिंग स्ट्रीम : २ पदे

पात्रता

आवश्यक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले किंवा अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पण, उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) येथे प्रशिक्षण सुरू झाल्यापासून १२ आठवड्यांच्या आत त्यांची अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक असेल.

पण, अंतिम वर्षाचे सर्व उमेदवार; ज्यांची अंतिम सत्र परीक्षा १ जानेवारी २०२५ नंतर होणार आहे, ते या पदासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय २० ते २७ वर्षांदरम्यान असावे. १ जानेवारी २०२५ रोजी वयाची गणना केली जाईल. सरकारी नियमांच्या आधारे वयात सवलत दिली जाईल.

भारतीय सैन्य TGC-140 निवड प्रक्रिया

सर्वांत आधी अर्ज स्क्रीनिंग चाचणी होईल. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखत झाल्यानंतर उमेदवांराना सर्व्हिसेस सिलेक्शन (बोर्ड- एसएसबी)साठी बोलावले जाईल. अशा सर्व निवड प्रक्रियांत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शेवटी वैद्यकीय तपासणीमध्ये सामील व्हावे लागेल. एसएसबी मुलाखतीच्या आधारावर उमेदवाराला मिळालेल्या गुणांनुसार अभियांत्रिकी स्ट्रीम / विषय मेरिट तयार केले जाईल.

याप्रमाणे अर्ज करा

इच्छुक उमेदवार फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भारतीय सैन्य TGC-140 साठी अर्ज फक्त ऑनलाइन मोडद्वारे केला जाऊ शकतो; इतर कोणत्याही मोडद्वारे अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्जासोबत कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नाही म्हणजेच सर्व श्रेणींतील उमेदवार या भरतीसाठी विनामूल्य अर्ज करू शकतात.

Online अर्ज:  https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1bQ6UGYeKnS1MLhT4Y0SMh3a0Bpgqbftx/view

‘अशाप्रकारे’ करा ऑनलाइन अर्ज

१) सर्वप्रथम http://www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२) लेटेस्ट नोटिफिकेशन आणि अर्जातील अटी वाचा.
३) Apply Online वर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन करा.
४) लॉग इन करून अर्ज भरा आणि त्यात आवश्यक फाइल्स अपलोड करा.
५) आवश्यक शुल्क भरा.
६) अर्ज पूर्णपणे नीट वाचून सबमिट करा आणि प्रिंट घ्या.
७) प्रिंट घ्या; जेणेकरून ती प्रत तुम्हाला भविष्यातील वापरासाठी उपयोगी येईल.