इंडियन आर्मीमध्ये अविवाहित पुरुष व अविवाहीत महिला लॉ ग्रॅज्युएट्सना शॉर्ट सर्व्हिस कमिशन ‘जज ॲडव्होकेट जनरल ब्रँच’ (JAG Entry Scheme १२३rd Course (APR २०२६)) साठी प्रवेश. रिक्त पदे – पुरुष – ५, महिला – ५. पात्रता – एल्एल्.बी. पदवी किमान सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि CLAT PG-२०२५ स्कोअर सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे (LL.M. उत्तीर्ण आणि LL.M. परीक्षेस बसलेल्या उमेदवारांनासुद्धा). उमेदवार बार काऊंसिलकडे रजिस्ट्रेशन करण्यास पात्र असावा.वयोमर्यादा – ( १ जानेवारी २०२६ रोजी) २१ ते २७ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९९ ते १ जानेवारी २००५ दरम्यानचा असावा.)

निवड पद्धती – शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारा प्रयागराज, भोपाळ, बंगलोर आणि जालंदर यापैकी एक परीक्षा केंद्र अलॉटमेंट कळविली जाईल.त्यानंतर उमेदवारांनी इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर लॉगइन करून एसएसबीची तारीख (प्रथम येणाऱ्यास प्रथम पसंती) निवडावयाची आहे. एसएसबी इंटरव्ह्यूचे स्टेज-१ उत्तीर्ण करणाऱया उमेदवारांना स्टेज-२ साठी पाठविले जाईल. एस्एस्बी इंटरव्ह्यूचा कालावधी ५ दिवसांचा असेल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.

कार्यकाळ – शॉर्ट सर्व्हिस कमिशन १४ वर्षांसाठी असेल. सुरूवातीला १० वर्षे जो आणखीन ४ वर्षांनी वाढविला जाऊ शकतो. १० वर्षांच्या कमिशननंतर ऑफिसर्सना परमनंट कमिशन मिळविता येईल.ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना ४९ आठवड्यांचे प्री-कमिशनिंग ट्रेनिंग ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (OTA) चेन्नई येथे दिले जाईल. प्री-कमिशनिंग ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱया उमेदवारांना ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रटेजिक स्टडीज’ हा डिप्लोमा मद्रास विद्यापीठाकडून दिला जाईल. अर्ज केल्याच्या दिनांकानंतर लग्न केलेले उमेदवार निवड झाली असले तरी ते ट्रेनिंगसाठी अपात्र ठरतील. ट्रेनिंग दरम्यान लग्न केल्यास उमेदवारांना परत पाठविले जाईल. जेंटलमेन आणि लेडी कॅडेट्सना ट्रेनिंग दरम्यान रु. ५६,१००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यानच्या देय भत्त्यांची थकबाकी कॅडेट्सना ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिली जाईल.वेतन – दरमहा रु. ५६,१००/- (पे-लेव्हल – १०) रु. १५,५००/- मिलिटरी सर्व्हिस पे इतर भत्ते. अंदाजे रु. १७-१८ लाख प्रतीवर्ष CTC.

ऑनलाइन अर्ज http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर पुरुष उमेदवारांनी ३ सप्टेंबर २०२५ (१५.०० वाजे)पर्यंत आणि महिला उमेदवारांनी ४ सप्टेंबर २०२५ (१५.०० वाजे)पर्यंत करावेत.शंकासमाधानासाठी http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ‘Feedback/Queries’ ऑप्शन उपलब्ध आहे.