Indian Maritime University Recruitment 2023 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारतीय समुद्री विश्वविद्यालयातर्फे शिक्षण आणि प्रशासकीय कर्मचारी ( Faculty) या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज पाठवू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ मे पर्यंत आहे तर अर्जाची कागदी प्रत जमा करण्याची शेवटची तारीख ९ मे आहे. निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत साधारणत: मे २०२३ मध्ये आयोजित केली जाईल. भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती २०२३ तपशील : ही भरती प्रक्रिया २६ पदांसाठी होणार आहे ज्यापैकी १४ पदांची भरती असोसिएट प्रोफेसरसाठी आणि १२ पदांची भरती असिस्टंट प्रोफेसरसाठी होणार आहे. हेही वाचा : CRPF Recruitment 2023: २१२ सब- इंस्पेक्ट आणि अस्टिटंट इंस्पेक्टर पदांसाठी भरती, १ मे पासून करु शकता अर्ज भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती २०२३ अर्जाचे शुल्क : एसी/एसटी उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क ७००/- रुपये आहे तर इतर उमेदवारासाठी अर्जाचे शउल्क १००० रुपये आहे. अर्ज भरण्याची थेट लिंक - हेही वाचा : Railway Recruitment 2023: अर्ज शुल्क न भरता मिळू शकते रेल्वेमध्ये नोकरी! ‘या’ पदासाठी होणार भरती, मिळेल चांगला पगार भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती २०२३, अर्ज कसा पाठवावा? इच्छूक आणि पात्र उमेदवार हे www.imu.edu.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज पाठवू शकतात. अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची प्रत खाली दिलेल्या पत्यावर जमा करावी. पत्ता - नोंदणी निंबधक अधिकारी, भारतीय समुद्र विश्वविद्यालय, सेम्मनचेरी, शोलिंगनाल्लूर पोस्ट, चेन्नई- ६०००११९