इंटेलिजन्स ब्युरो (IB) (गृह मंत्रालय, भारत सरकार)मध्ये ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/Executive (ACIO-II/Exe)’ Examination २०२५. एकूण रिक्त पदे – ३,७१७. वेतन श्रेणी – लेव्हल-७ (४४,९०० – १,४२,०००) मूळ वेतनाच्या २० टक्के स्पेशल सिक्युरिटी अलाऊन्स अंदाजे वेतन दरमहा रु. ९६,०००/-.
(१) ACIO-II/Executive – ३,७१७ पदे (अजा – ५६६, अज – २२६, इमाव – ९४६, ईडब्ल्यूएस – ४४२, खुला – १,५३७).
पात्रता – (१० ऑगस्ट २०२५ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) (अपंग उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.)
वयोमर्यादा – (१ ऑगस्ट २०२५ रोजी) १८ ते २७ वर्षे.
निवड पद्धती – (1) लेखी परीक्षा (i) टियर-I – १०० ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ प्रश्न, (१) करंट अफेअर्स, (२) जनरल स्टडीज, (३) न्यूमरिकल अॅप्टिट्यूड, (४) रिझनिंग/लॉजिकल ॲप्टिट्यूड, (५) इंग्लिश. प्रत्येकी २० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण १०० गुण, वेळ १ तास. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.
(ii) टियर-II – डिस्क्रीप्टीव्ह टाईप पेपर ५० गुण, वेळ १ तास. (निबंध – २० गुण, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन – १० गुण, दीर्घोत्तरी – २ प्रश्न, प्रत्येक १० गुणांसाठी (करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स, सोशिओ-पॉलिटिकल इश्युज इ. २० गुण))
(२) मुलाखत – टियर-III -मुलाखत १०० गुणांसाठी.
परीक्षा केंद्र – अमरावती, छ. संभाजी नगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर. उमेदवारांनी ५ परीक्षा केंद्रांसाठी (शहरं) पसंतीक्रम द्यावयाचा आहे.
लेखी परीक्षेतील टियर-I मधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या १० पट उमेदवार टियर-II साठी निवडले जातील.
टियर-II मध्ये पात्रतेसाठी किमान १७ गुण आवश्यक.
टियर-I मध्ये पात्रतेसाठी खुला/ईएसडब्ल्यू – ३५ गुण, इमाव – ३४ गुण, अजा/अज – ३३ गुण आवश्यक.
टियर-I आणि टियर-II मधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या ५ पट उमेदवार टियर-III साठी निवडले जातील.
टियर-I, टियर-II आणि टियर-III मधील एकत्रित गुणवत्तेनुसार अंतिम गुणवत्ता यादी बनविली जाईल. चारित्र्य आणि पूर्वकाल तपासणी आणि वैद्यकिय परीक्षा घेऊन अंतिम निवड केली जाईल.
अर्जाचे शुल्क – सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना भरती प्रक्रिया शुल्क रु. ५५०/- भरणे अनिवार्य.
शंकासमाधानासाठी ॲप्लिकेशन पोर्टलवर उपलब्ध हेल्प डेस्क टॅबवर लॉगइन करून संपर्क साधा किंवा फोन नं. ०२२६१०८७५१३ वर संपर्क साधा. (सोमवार ते शनिवार १०.०० ते १८.०० वाजेदरम्यान.)
ऑनलाइन अर्ज http://www.mha.gov.in किंवा http://www.ncs.gov.in या संकेतस्थळावर १० ऑगस्ट २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.