● स्टेट बँक ऑफ इंडिया, ‘ज्युनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स)’ च्या एकूण ७,३९३ पदांची भरती. नियमित पदे (अजा – ७८८, अज – ४५०, इमाव – ११७९, ईडब्ल्यूएस – ५०८, खुला – २२५५, एकूण – ५१८०) (एकूण २२२ पदे अपंग उमेदवारांसाठी आणि माजी सैनिक प्रवर्गात एकूण ७२२ पदे राखीव
महाराष्ट्र/मुंबई मेट्रो सर्कलमध्ये एकूण ५५० पदे भरावयाची आहेत. (अजा – ४७, अज – ४२, इमाव – १२७, ईडब्ल्यूएस – ४७, खुला – २१३) (यात माजी सैनिकांसाठी बॅकलॉगमधील ७४ पदांचा समावेश आहे.) (स्थानिय भाषा – मराठी).
मुंबई मेट्रो सर्कलमधील गोवा राज्यातील पदे – एकूण १४ ३ (अजा – , अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – १) (१ पद अपंग कॅटेगरी व्हीआय साठी राखीव) (स्थानिय भाषा – कोकणी).
वयोमर्यादा – ( १ एप्रिल २०२५ रोजी) २० ते २८ वर्षे (इमाव – ३१ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३३ वर्षेपर्यंत, विकलांग – ३८/४१/४३ वर्षेपर्यंत) (विधवा/परित्यक्ता महिलांसाठी खुला/ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे).
पात्रता – (दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.
१६ ऑगस्ट २०२५ पर्यंत ज्यांनी SBI ¸मधून अॅप्रेंटिसशिप यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि त्यांनी नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट मिळविले आहे, त्यांना कमाल वयोमर्यादेत सूट.
निवड पद्धती – ऑनलाइन टेस्ट – फेज-१ प्रीलिमिनरी एक्झाम – (सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात येईल.) ऑब्जेक्टिव्ह टेस्ट – १०० गुणांसाठी वेळ १ तास. (इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, न्यूमरिकल अॅबिलिटी – ३५ प्रश्न, रिझनिंग अॅबिलिटी – ३५ प्रश्न, एकूण १०० प्रश्न) (प्रत्येक सेक्शनसाठी २० मिनिटांचा कालावधी असेल.)
फेज-२ मुख्य परीक्षा – जनरल/फिनान्शियल अवेअरनेस – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३५ मिनिटे; जनरल इंग्लिश – ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटे; क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४५ मिनिटे; रिझनिंग अॅबिलिटी अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड – ५० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे. एकूण १९० प्रश्न. एकूण २०० गुण, वेळ २ तास ४० मिनिटे. सर्व राज्यातील उमेदवारांसाठी परीक्षा हिंदी/इंग्रजी माध्यमातून आणि स्थानिय भाषेतून घेतली जाईल.
फेज-३ – लोकल लँग्वेज प्रोफिशिअन्सी टेस्ट ( LLPT) – ऑनलाइन टेस्टमधून उत्तीर्ण उमेदवारांनी १० वी/१२ वी स्तरावर लोकल लँग्वेज अभ्यासलेली आहे, अशांना लँग्वेज टेस्ट द्यावी लागणार नाही. महाराष्ट्रासाठी स्थानिय भाषा मराठी आहे. गोवा राज्यासाठी स्थानिय भाषा कोंकणी आहे.
लँग्वेज टेस्टमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची रिक्त पदांच्या ५० राज्यनिहाय प्रतिक्षायादी बनविली जाईल. अंतिम निवड यादी मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार तयार केली जाईल. (प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाकरिता असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.)
हेल्प डेस्क नंबर ०२२-२२८२०४२७ वर बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत संपर्क साधावा किंवा शंका समाधानासाठी http://cgrs.ibps.in या ई-मेल आय्डीवर मेल करावा. .
ऑनलाइन अर्ज https://bank.sbi/web/careers/ current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/ current-openings या संकेतस्थळावर २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत करावेत.
मुंबई उच्च न्यायालयात संधी
● हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर अॅट बॉम्बे ( BHC) (उच्च न्यायालय, मुंबई), मुंबई मुख्यालय प्रिंसिपल सिट) येथे ‘पर्सोनल असिस्टंट टू दी हॉनरेबल जज’ (‘माननीय न्यायाधीशांचे स्वीय सहायक’) पदांची भरती. (जाहिरात १४.०८.२०२५)
एकूण रिक्त पदे – ३५. (९ पदांची प्रतीक्षा यादी बनविली जाईल.) (अपंग उमेदवारांसाठी १ राखीव पद)
वेतन श्रेणी – एस-२३ रु. ६७,७०० – २,०८,७०० अधिक देय भत्ते. अंदाजे वेतन दरमहा रु. १,३०,०००/-.
पात्रता – ( i) पदवी उत्तीर्ण. (कायदा विषयातील पदवीधारकांस प्राधान्य) (किमान १० वर्षं स्टेनोग्राफर (निम्न श्रेणी) किंवा किमान ८ वर्षं स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) पदावरील कोर्ट/ट्रिब्युनल/अॅडव्होकेट जनरल यांचे कार्यालय/गव्हर्नमेंट प्लिडर यांचे कार्यालयातील कामाचा अनुभव असल्यास किमान पात्रतेची अट शिथिल केली जाईल.)
( ii) इंग्लिश शॉर्टहँडमधील १२० श.प्र.मि. वेगाची आणि इंग्लिश टायपिंगमधील ५० श.प्र.मि. वेगाची शासकीय परीक्षा उत्तीर्ण.
( iii) मान्यताप्राप्त संस्थेकडील MS- Office, MS- Word, Word Star-७ आणि Open Office Org यासह विंडोज आणि लिनक्समधील वर्ड प्रोसेसरवरील प्रोफिशिअन्सी सर्टिफिकेट.
वयोमर्यादा – ( १४ ऑगस्ट २०२५ रोजी) खुला प्रवर्ग – २१ ते ३८ वर्षे. मागासवर्गीय – २१ ते ४३ वर्षे.
निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची शॉर्टहँड टेस्ट आणि टायपिंग टेस्ट (प्रत्येक टेस्टसाठी ४० गुण) आणि २० गुणांसाठी मुलाखत ( Viva- Voce) घेतली जाईल.
अंतिम निवड शॉर्टहँड टेस्ट, टायपिंग टेस्ट आणि मुलाखतमधील एकत्रित गुणवत्तेनुसार केली जाईल.
अर्जाचे शुल्क – रु. १,०००/- स्टेट बँक कलेक्ट पेमेंट लिंकमधून १ सप्टेंबर २०२५ पर्यंत भरता येईल. ऑनलाइन अर्ज https://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर १ सप्टेंबर २०२५ (संध्याकाळी ५ वाजे)पर्यंत करावेत.