सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट (रिक्रूटमेंट अँड प्रमोशन डिव्हीजन) सेंट्रल ऑफिस, मुंबई ॲप्रेंटिसेस ॲक्ट, १९६१ अंतर्गत ४,५०० ॲप्रेंटिसेस पदावर २०२५-२६ साठी पदवीधर उमेदवारांची भरती. यातील काही पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत. काही राज्यांतील रिक्त पदांचा तपशिल – (कंसात स्थानिय भाषा दिलेली आहे.)

(१) महाराष्ट्र (मराठी) एकूण ५८६ (अजा – ५८, अज – ५२, इमाव – १५८, ईडब्ल्यूएस् – ५९, खुला – २५९).

(२) गुजरात (गुजराती) ३०५. (३) आंध्र प्रदेश (तेलुगू) १२८. (४) कर्नाटक (कन्नड) १५.

(५) मध्य प्रदेश (हिंदी) ४५९. (६) छत्तीसगड(हिंदी) ११४. (७) तेलंगणा (तेलुगू) १००.

(८) गोवा (कोंकणी/इंग्रजी) २८.

महाराष्ट्र राज्यातील जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशिल – अहमदनगर – ६५, अकोला – २३, अमरावती – ४४, छ. संभाजी नगर – १५, जळगाव – ४३, नागपूर – २९, नाशिक – २०, पुणे – ४७, सोलापूर – १४, ठाणे – ३०़, मुंबई उपनगर – २८, पालघर – ८, रत्नागिरी – ९, सिंधुदुर्ग – ६, ग्रेटर मुंबई – ३२, रायगड – १५, बुलढाणा – २२, वाशिम – ११, यवतमाळ – २२, बीड – ४, हिंगोली – १, जालना – २, नांदेड – ४, परभणी – १, भंडारा – ६, चंद्रपूर – ३, गडचिरोली – १, गोंदिया – २, वर्धा – ८, धुळे – २४, नंदूरबार – १८, कोल्हापूर – ६, लातूर – ५, उस्मानाबाद – १, सांगली – ५, सातारा – १४, नॉर्थ गोवा – १२, साऊथ गोवा – १६.

वयोमर्यादा – (दि. ३१ मे २०२५ रोजी) २० ते २८ वर्षे. (इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षे, दिव्यांग – ३८/४१/४३ वर्षे) (विधवा/परित्यक्ता/घटस्फोटीत महिला ज्यांनी पुर्नविवाह केलेला नाही – खुला/ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे).

पात्रता – (दि. ३१ मे २०२५ रोजी) पदवी उत्तीर्ण. उमेदवारांना ज्या राज्यातील जागांसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या राज्यातील निर्दिष्ट स्थानिक भाषा अवगत असणे आवश्यक आहे. (१ जानेवारी २०२१ नंतर पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

ट्रेनिंगचा कालावधी – १ वर्ष.

स्टायपेंड – अॅप्रेंटिसेसना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती – (i) ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा (१) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – १५ प्रश्न, (२) जनरल इंग्लिश – १५ प्रश्न, (३) लॉजिकल अॅप्टिट्यूड – १५ प्रश्न, (४) कॉम्प्युटर नॉलेज – १५ प्रश्न, (५) बेसिक रिटेल लायबिलिटी प्रोडक्ट्स – १० प्रश्न, (६) बेसिक रिटेल असेट प्रोडक्ट्स – १० प्रश्न, (४) बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स – १० प्रश्न, (५) बेसिक इन्श्युरन्स प्रोडक्ट्स – १० प्रश्न या विषयांवर आधारित एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे.

अंतिम निवड वैद्यकीय तपासणीनंतर जाहीर केली जाईल.

लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित राज्यनिहाय व कॅटेगरीनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल.

प्रतीक्षा यादी – राज्य/कॅटेगरीनिहाय निवडलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी निकालाच्या दिनांकापासून १ वर्षभरासाठी ठेवली जाईल.

ऑनलाइन परीक्षा जुलै, २०२६ च्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाईल. (tentative)

ही जाहिरात ॲप्रेंटिस पदासाठी असून बँकेतील नोकरीसंबंधी नाही, याची नोंद घ्यावी.

अर्जाचे शुल्क – दिव्यांग – रु. ४००/-. (अजा/अज/महिला/ईडब्ल्यूएस रु. ६००/-, इतर उमेदवारांना रु. ८००/-.) अर्जाचे शुल्क दि. २५ जुलै २०२५ पर्यंत भरता येईल.

उमेदवारांना निवड प्रक्रियेची माहिती बँकेच्या http://www.centralbankofindia.co.in/en किंवा https://bfsissc.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

अजा/अज, इमाव, ईडब्ल्यूएस, दिव्यांग चे आरक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले सर्टिफिकेट्स सादर करणे आवश्यक.

परीक्षा शुल्क भरलेल्या सर्व उमेदवारांना BFSI-SSC मार्फत परीक्षेची तारीख आणि वेळ याविषयी इंटिमेशन पाठविले जाईल.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी https://nats.education.gov.in या ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर आपले नाव रजिस्टर करणे आवश्यक आहे. त्यानंतर लॉगइन करून ऑनलाइन अर्ज दि. २३ जून २०२५ पर्यंत करावा.

ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यावर उमेदवारांना BFSI SSC (info@bfsissc.com) कडून ई-मेल पाठविला जाईल. ज्यात उमेदवारांना आपली कास्ट कॅटेगरी, ट्रेनिंगकरिता जिह्याचा पसंतीक्रम इ. माहिती देण्यासाठी आणि अर्जाचे शुल्क भरण्यासाठी सूचित केले जाईल. उमेदवारांनी फोटोग्राफ्स, सिग्नेचर आणि आवश्यक ती कागदपत्रं अपलोड करावीत. शंकासमाधानासाठी info@bfsissc.com वर ई-मेल करावा.

सर्वोच्च न्यायालयात रिक्त पदे

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली – ग्रुप-बी नॉन-गॅझेटेड पदांची थेट भरती. (Advt. No. F६/RC/Sr & Jr. Programmer/२०२५ dt. ०५.०६.२०२५) एकूण रिक्त पदे – २६. (१) ज्युनियर कोर्ट असिस्टंट कम ज्युनियर प्रोग्रामर – २० पदे.

पात्रता – बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी) किंवा बी.एससी. (कॉम्प्युटर सायन्स)/बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन.

वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ६ मूळ वेतन रु. ३५,४००/- अधिक इतर भत्ते मिळून अंदाजे वेतन रु. ७०,०००/- दरमहा.

(२) सिनियर कोर्ट असिस्टंट कम सिनियर प्रोग्रामर – ६ पदे.

पात्रता – बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी) आणि संगणकीकरण क्षेत्रातील ६ वर्षांचा अनुभव किंवा एम.सी.ए./एम.एससी. (कॉम्प्युटर सायन्स) किंवा समतुल्य आणि संगणकीकरण क्षेत्रातील ६ वर्षांचा अनुभव किंवा बी.एससी. (कॉम्प्युटर सायन्स)/बी.सी.ए. किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संगणकीकरण क्षेत्रातील ७ वर्षांचा अनुभव. कायदा विषयातील पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ८ मूळ वेतन रु. ४७,६/- अधिक इतर भत्ते मिळून अंदाजे वेतन रु. ९२,०००/- दरमहा.

वयोमर्यादा – पद क्र. १ साठी ३० वर्षे, पद क्र. २ साठी ३५ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).

निवड पद्धती – दोन्ही पदांसाठी (१) लेखी परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह टाईप) (जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड), (२) ऑब्जेक्टिव्ह टाईप टेक्निकल अॅप्टिट्यूड, (३) प्रॅक्टिकल अॅप्टिट्यूड टेस्ट, (४) इंटरव्ह्यू.

ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप टेक्निकल ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये पात्रतेसाठी किमान ५०… गुण मिळविणे आवश्यक आहे. यातील पात्र उमेदवार १ः१० प्रमाणात प्रॅक्टिकल ॲप्टिट्यूड टेस्टसाठी निवडले जातील. इंटरव्ह्यूमध्ये पात्रतेसाठी किमान ५० टक्के गुण आवश्यक. इंटरह्यूकरिता रिक्त पदांच्या ३ पट उमेदवार निवडले जातील.

परीक्षा केंद्र – दिल्ली/एनसीआर, मुंबई, कोलकता, हैद्राबाद, बेंगलुरू. उमेदवारांनी किमान २ केंद्रांसाठी पसंतीक्रम द्यावयाचा आहे.

अर्जाचे शुल्क – खुला/इमाव – रु. १,०००/- आणि अजा/अज/माजी सैनिक/दिव्यांग – रु. २५०/-. फी ऑनलाइन पद्धतीने UCO Bank च्या पेमेंट गेटवेमधून भरावयाचे आहे.

ऑनलाइन अर्जासोबत फोटोग्राफ, सिग्नेचर आणि आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.

उमेदवारांनी अॅडमिट कार्ड सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करावीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही पदांसाठी http://www.sci.gov.in या संकेतस्थळावर वेगवेगळी लिंक उपलब्ध असेल. ऑनलाइन अर्ज दि. २७ जून २०२५ (२३.५५ वाजे)पर्यंत करावेत.