सुहास पाटील

१) सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट (रिक्रूटमेंट ॲण्ड प्रमोशन डिव्हीजन) सेंट्रल ऑफिस, मुंबई (जाहिरात दि. २१ फेब्रुवारी २०२४) ॲप्रेंटिसेस ॲक्ट, १९६१ अंतर्गत ३,००० ॲप्रेंटिसेस पदावर पदवीधर उमेदवारांची भरती. यातील काही पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत.

job opportunities
नोकरीची संधी: भारतीय लष्करातील संधी
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती
Job Opportunity Job Opportunity in Bank of India career
नोकरीची संधी: बँक ऑफ इंडियातील संधी

● काही राज्यांतील रिक्त पदांचा तपशील –

(१) महाराष्ट्र – ३२० (२) गुजरात – २७० (३) आंध्र प्रदेश – १०० (४) कर्नाटक – ११० (५) मध्य प्रदेश – ३०० (६) छत्तीसगड – ७६ (७) तेलंगणा – ९६ (८) गोवा – ३०

● महाराष्ट्र राज्यातील रिजननिहाय रिक्त पदांचा तपशील – अहमदनगर – २८, अकोला – ३०, अमरावती – ३६, औरंगाबाद – २३, जळगाव – २३, नागपूर – २७, नाशिक – ३३, पुणे – २६, सोलापूर – २०, ठाणे – २३़, NMRO – २२, पणजी – ७, SMRO – २२.

वयोमर्यादा – दि. ३१ मार्च २०२४ रोजी २० ते २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १ एप्रिल १९९६ ते ३१ मार्च २००४ दरम्यानचा असावा.) (इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षे, दिव्यांग – ३८/४१/४३ वर्षे) विधवा/परित्यक्ता/ घटस्फोटीत महिला ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही.

पात्रता – दि. ३१ मार्च २०२४ रोजी पदवी उत्तीर्ण. उमेदवारांना ज्या राज्यातील जागांसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या राज्यातील निर्दिष्ट स्थानिक भाषा अवगत असणे आवश्यक आहे. (उमेदवारांनी ८ वी/१० वी/१२ वी/पदवीला स्थानिय भाषा अभ्यासलेली असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक.) (३१ मार्च २०२० नंतर पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

ट्रेनिंगचा कालावधी – १ वर्षे. १ वर्षाचा ॲप्रेंटिसशिप कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या ॲप्रेंटिसेसना बँकेमधील भरतीमध्ये नियमानुसार वेटेज/सवलत दिली जाईल. उमेदवारांना असेसमेंट टेस्ट द्यावी लागेल ज्यात थिअरॉटिकल पार्ट आणि ऑन जॉब ट्रेनिंग यांचा समावेश असेल थिअरी असेसमेंट (BFSI) सेक्टर स्किल काऊन्सिल ऑफ इंडिया आणि प्रॅक्टिकल असेसमेंट बँकेकडून केली जाईल. लेखी परीक्षेतून पात्र उमेदवारांना इंटरह्यू द्यावा लागेल आणि (BFSI- SSC यांनी जारी ( issued) केलेले) नॅशनल ॲप्रेंटिसशिप सर्टिफिकेट मिळवावे लागेल.

स्टायपेंड – ॲप्रेंटिसेसना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती – ( i) ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा (१) जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲप्टिट्यूड ॲण्ड कॉम्प्युटर नॉलेज, (२) बेसिक रिटेल लायबिलिटी प्रोडक्ट्स, (३) बेसिक रिटेल असेट प्रोडक्ट्स, (४) बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स, (५) बेसिक इन्श्युरन्स प्रोडक्ट्स या विषयांवर आधारित प्रश्न (८ वी/१० वी किंवा १२ वीला/पदवीला स्थानिय भाषा अभ्यासलेली असल्यास (तसा पुरावा गुणपत्रक/प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.) अंतिम निवड वैद्याकीय तपासणीनंतर जाहीर केली जाईल. लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित राज्यनिहाय व कॅटेगरीनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल.

प्रतीक्षा यादी – राज्य/ कॅटेगरीनिहाय निवडलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी निकालाच्या दिनांकापासून १ वर्षभरासाठी ठेवली जाईल.

ऑनलाइन परीक्षा १० मार्च, २०२४ रोजी आयोजित केली जाईल. (tentative) ही जाहिरात ॲप्रेंटिस पदासाठी असून बँकेतील नोकरीसंबंधी नाही, याची नोंद घ्यावी.

अर्जाचे शुल्क – दिव्यांग – रु. ४००/-. (अजा/ अज/ महिला /ईडब्ल्यूएस रु. ६००/-, इतर उमेदवारांना रु. ८००/-.)

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर आपले नाव रजिस्टर करणे आवश्यक आहे. त्यानंतर www. nats. education. gov. in वर लॉगइन करून ऑनलाइन अर्ज दि. ६ मार्च २०२४ पर्यंत करावा. ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यावर उमेदवारांना BFSI wwy ( naik. ashwini@bfsissc. com) कडून ई-मेल पाठविला जाईल. (ज्यात उमेदवाराने भरलेल्या परीक्षा शुल्काची माहिती असेल.) उमेदवारांना निवड प्रक्रियेची माहिती बँकेच्या www. centralbankofindia. co. in या संकेतस्थळावर ‘ Career Section’मध्ये प्रसिद्ध केली जाईल. अजा/अज, इमाव, ईडब्ल्यूएस, दिव्यांगांचे आरक्षण घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी www. centralbankofindia. co. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातील सर्टिफिकेट्स सादर करणे आवश्यक. परीक्षा शुल्क भरलेल्या सर्व उमेदवारांना BFSI- SSC मार्फत परीक्षेची तारीख आणि वेळ याविषयी इंटिमेशन पाठविले जाईल. उमेदवारांनी नेमून दिलेल्या तारखेला आणि वेळी स्वत:चा कॅमेरा, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप किंवा स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर ऑनलाइन लेखी परीक्षा द्यावयाची आहे. उमेदवारांना ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर अपलोड केलेले आयडी प्रूफ परीक्षेच्या वेळी Display करावे लागेल.

suhassitaram@yahoo. Com