● स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc), दिल्ली पोलीसमध्येहेड काँस्टेबल (मिनिस्ट्रीयल) (पुरुष आणि महिला) पदांच्या भरतीसाठी डिसेंबर २०२५/जानेवारी २०२६ मध्ये संगणक आधारित परीक्षा घेणार आहे. या परीक्षेतून पुढील ५०९ पदांची भरती होणार आहे.

वयोमर्यादा – (१ जुलै २०२५ रोजी) १८ ते २५ वर्षे (इमाव – २८ वर्षेपर्यंत; अजा/अज – ३ वर्षेपर्यंत) (पुनर्विवाह न केलेल्या विधवा/ परित्यक्ता/घटस्फोटित महिला – खुला/ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे) (दिल्ली पोलीस दलातील किमान ३ वर्षांची कायमस्वरूपी सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा – ४० वर्षे, इमाव – ४३ वर्षे, अजा/अज – ४५ वर्षे)

(१) हेड काँस्टेबल (मिनिस्ट्रीयल) पुरुष – ३४१ पदे (अजा – ४९, अज – १३, इमाव – ७७, ईडब्ल्यूएस- ३४, खुला – १६८) यापैकी पुरुष (माजी सैनिकांसाठी) ४६ पदे (अजा – ९, अज – ७, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १७).

(२) काँस्टेबल (मिनिस्ट्रीयल) महिला – १६८ पदे (अजा – २४, अज – ७, इमाव – ३८, ईडब्ल्यूएस – १७, खुला – ८२).

वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ४, अंदाजे वेतन दरमहा रु. ५२,०००/-.

पात्रता – ( २० ऑक्टोबर २०२५ रोजी) १२ वी उत्तीर्ण. टायपिंग स्पीड इंग्रजी – ३० श.प्र.मि. किंवा हिंदी – २५ श.प्र.मि.

निवड पद्धती – ( i) कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशन, ( ii) शारीरिक क्षमता चाचणी, शारीरिक मापदंड चाचणी ( PE MT) ( iii) टायपिंग टेस्ट – २५ गुणांची (वेळ १० मिनिटे), ( iv) कॉम्प्युटर फॉरमॅटिंग टेस्ट (एमएस-वर्ड, एमएस-पॉवरपॉईंट, एमएस-एक्सेल) (फक्त पात्रता स्वरूपाची) (वेळ ३० मिनिटे). टायपिंग टेस्ट इंग्रजीमध्ये ५० श.प्र.मि. चा स्पीड दिल्यास २५ गुण दिले जातील. हिंदीमध्ये ४५ श.प्र.मि. साठी २५ गुण दिले जातील आणि वैद्याकीय तपासणी.

CBE – पार्ट-ए – जनरल अवेअरनेस – २० प्रश्न, पार्ट-बी – क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (प्राथमिक अंकगणित) – २० प्रश्न, पार्ट-सी – जनरल इंटेलिजन्स – २५ प्रश्न, पार्ट-डी – इंग्लिश लँग्वेज (बेसिक) – २५ प्रश्न, पार्ट-इ – कॉम्प्युटर फंडामेंटल्स, MS- Excel, MS- Word, कम्युनिकेशन, इंटरनेट www आणि वेब ब्राऊजर्स इ. – १० प्रश्न, प्रत्येकी १ गुण, एकूण गुण १००, वेळ ९० मिनिटे.

(परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल.) परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल.

कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशन ( CBE) (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची, प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील.)

PE MT साठी अॅडमिशन सर्टिफिकेट्स दिल्ली पोलीसच्या http://www.delhipolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. PE MT टेस्ट दिल्ली पोलीसच्या तीन ट्रेनिंग अॅकॅडमी येथे होतील.

NCC उमेदवारांना त्यांच्या CBE च्या गुणांमध्ये बोनस गुण मिळविले जातील. NCC ‘ C’ सर्टिफिकेट – ५ गुण, NCC ‘ B’ सर्टिफिकेट – ३ गुण, NCC ’ A’ सर्टिफिकेट – २ गुण. अंतिम निवड यादी CBE मधील गुण व बोनस गुण एकत्रित करून बनविली जाईल. ज्या उमेदवारांनी राष्ट्रीय रक्षा विद्यापीठा ( RRU) मधून पदवी/पदव्युत्तर पदविका डिस्टींक्शनसह उत्तीर्ण केली आहे, त्यांना ५ गुण, फर्स्ट क्लाससाठी ४ गुण, सेकंड क्लाससाठी ३ गुण, पास क्लाससाठी २ गुण अधिकचे दिले जातील.

परीक्षा शुल्क – रु. १००/- फक्त ऑनलाइन पद्धतीने २१ ऑक्टोबर २०२५ (२३.०० वाजे)पर्यंत भरता येईल. अजा/अज/अपंग/महिला प्रवर्गांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पणजी इ. (उमेदवारांनी एकाच रिजनमधील ३ परीक्षा केंद्रांसाठी पसंतीक्रम देणे आवश्यक.)

पीएसटी/पीईटी चाचणी फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

निवड यादी आणि रिक्त पदांच्या १५ टक्के पदांसाठी प्रतिक्षा यादी लेखी परीक्षेतील गुण, टायपिंग टेस्टमधील गुण आणि बोनस गुण एकत्रित करून बनविली जाईल.

ऑनलाइन अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती जाहिरातीमधील Annexure- I आणि Annexure- II मध्ये दिलेली आहे.

ऑनलाइन अर्जात सुधारणा करण्यासाठी वेबसाईटवर करेक्शन विंडो २७ ते २९ ऑक्टोबर (२३.०० वाजे) दरम्यान उपलब्ध असेल.

शंकासमाधानासाठी दिल्ली पोलीस रिक्रूटमेंट हेल्पडेस्क नं. १८००३०९३०६३ (कार्यालयीन वेळेत). ऑनलाइन अर्ज https://ssc.gov.in या संकेतस्थळावर २० ऑक्टोबर २०२५ (२३.०० वाजे) पर्यंत करावेत.