प्रोग्रामिंग/ डेटा सायन्समध्ये करिअर करायचे आहे. IIT मद्रास देत आहे ८ महिने कालावधीचा डिप्लोमा इन प्रोग्रामिंग अॅरण्ड डेटा सायन्स. पात्रता – किमान १२ वी उत्तीर्ण. (कोणतीही शाखा)
कोर्स वर्क : ८ थिअरी कोर्सेस आणि दोन प्रोजेक्ट्स द्वारा हँड्स ऑन ट्रेनिंग.
कौशल्य : सर्टिफाईड प्रोग्रामर किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून प्रोग्राममधून बाहेर पडा.
सध्या IIT, मद्रास खालील दोन डिप्लोमा ऑफर करत आहे.
( I) डिप्लोमा इन प्रोग्रामिंगमध्ये काय शिकाल –
(१) फूल स्टॅक डेव्हलपमेंट (२) जावामध्ये प्रोग्रामिंग (३) पायथनमध्ये प्रोग्रामिंग (४) अॅाडव्हान्स्डे SQL (५) डेटाबेस डिझाईन (६) वेब डिझाईन डेव्हलपमेंट (७) अढक डेव्हलपमेंट
( II) डिप्लोमा इन डेटा सायन्समध्ये काय शिकाल –
(१) प्रीडिक्टिव्ह अॅ नालायटिक्स (२) मशिन लर्निग टेक्निक्स (३) डेटा व्हिज्युअनायझेशन टूल्स (४) स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग (५) बिझनेस अॅ्नालायटिक्स (६) पायथन प्रोग्रामिंग (७) स्किट लर्न आणि टेन्सरफ्लोसारख्या लायब्ररी
कोर्स फी : प्रत्येक डिप्लोमासाठी रु. ७०,५००/-.
डिप्लोमाकरिता प्रवेश घेण्यासाठी पात्रता परीक्षा : (Qualifer Exam) दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी घेतली जाईल.
डिप्लोमा इन प्रोग्रामिंगसाठी पात्रता परीक्षेकरिता विषय – इंग्रजी, अॅगप्टिटय़ूड अॅगण्ड लॉजिकल रिझिनग आणि बेसिक मॅथेमॅटिक्स. वेळ ३ तासांचा असेल.

डिप्लोमा इन डेटा सायन्ससाठी पात्रता परीक्षेकरिता विषय- इंग्लिश, पायथनमधील प्रोग्रामिंग, मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स. वेळ ४ तास. डिप्लोमा पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान एकूण पात्रता स्कोअर आणि किमान पात्रता परीक्षा स्कोअर मिळविणे आवश्यक आहे. पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणारेच संबंधित डिप्लोमा प्रोग्रामसाठी नोंदणी करण्यास पात्र असतील.
२४ डिसेंबर २०२३ रोजी डिप्लोमा पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी केवळ जानेवारी २०२४ टर्ममध्ये नोंदणी करण्यास आणि कार्यक्रमात सामील होण्यास पात्र असतील.
परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, सोलापूर.
नोंदणी आणि शिकण्यासाठी अनिवार्य आवश्यकता : चांगले इंटरनेट कनेक्शन तसेच लॅपटॉप किंवा डेस्कटॉप.
टर्म स्ट्रक्चर : प्रत्येक वर्ष प्रत्येकी चार महिन्यांच्या तीन टम्र्समध्ये विभागले जाते. जानेवारी टर्म, मे टर्म आणि सप्टेंबर टर्म.
चार महिन्यांच्या प्रत्येक टर्ममध्ये १२ आठवडय़ांचे कोर्स वर्क (व्हिडीओ लेक्चर्स आणि असाईन्मेंट्स), २ इन-पर्सन इन्व्हिजिलेटेड क्विझ प्रश्नमंजुषा) आणि एंड टर्म परीक्षा असतात.
अभ्यासक्रम नोंदणी : प्रत्येक टर्ममध्ये विद्यार्थी ४ अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करू शकतात. मूलभूत अभ्यासक्रम शिकणाऱ्यांनी पहिल्या टर्ममध्ये खालील दोन मूलभूत अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त उमेदवार पहिल्या टर्ममध्ये आणखी एक किंवा दोन अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करणे निवडू शकतो.
प्रोग्रामिंगमध्ये डिप्लोमा : पायथनमध्ये संगणकीय विचार (Computational thinking) आणि प्रोग्रामिंग इन पायथन.
डेटा सायन्समध्ये डिप्लोमा : डेटा सायन्ससाठी गणित आणि डेटा सायन्ससाठी सांख्यिकी (Statistics)
प्रकल्प ( project) : दोन अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येकी २ क्रेडिट्सचा प्रकल्प घटक असतो. प्रोग्रामिंगमध्ये डिप्लोमा – मॉडर्न अॅ्प्लिकेशन डेव्हलपमेंट- I प्रोजेक्ट आणि मॉडर्न अॅंप्लिकेशन डेव्हलपमेंट – II प्रोजेक्ट.
डेटा सायन्समध्ये डिप्लोमा : बिझनेस डेटा मॅनेजमेंट – प्रोजेक्ट आणि मशिन लर्निग प्रॅक्टिस – प्रोजेक्ट.
फी स्ट्रक्चर : प्रत्येक टर्म, त्या विशिष्ट टर्ममध्ये नोंदणी केलेल्या कोर्ससाठीच फी भरावी लागेल.

Job opportunity in CBI apply immediately
सीबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी, त्वरित अर्ज करा…
Inlaks Shivdasani Scholarship, Indian Students in Higher Education, Indian Students Abroad Education, Supporting Indian Students, scolarship for abroad education, marathi news, education news, scolarship news, abroad scolarship, career article, career guidance, scolarship for students, indian students,
स्कॉलरशीप फेलोशीप : इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?

मूलभूत अभ्यासक्रम : रु. ४,/- प्रती कोर्स.
कौशल्य वृद्धिंगत अभ्यासक्रम : रु. ७,५००/- प्रती कोर्स.
इतर सर्व (५ कोर्सेस) डिप्लोमा कोर्स : रु. १०,/- प्रती कोर्स.
प्रकल्प : रु. २,५००/- प्रती प्रकल्प.
सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीवर अवलंबून फीमध्ये सवलत दिली जाते. ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. १ लाख ते ५ लाखादरम्यान आहे अशा अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस उमेदवारांना ५० टक्के सूट.
ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. १ लाखापेक्षा कमी आहे अशा ईडब्ल्यूएस/ इमाव/ अजा/अज/ इमाव, ईडब्ल्यूएसचे दिव्यांग/ अजा, अजचे दिव्यांग उमेदवारांना फीमध्ये ७५ टक्के सूट दिली जाईल.
अर्जाचे शुल्क : खुला/ इमाव – रु. ६,/-; अजा/ अज/ दिव्यांग – रु. ३,/-; अजा/ अजचे दिव्यांग उमेदवार – रु. १,५००/-.
जानेवारी २०२४ पासून सुरू होणाऱ्या बॅचसाठी अर्जाचा फॉर्म diploma. iitm. ac. in या संकेतस्थळावर दि. २४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत भरता येईल. जो कोणी पात्र आहे तो अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आणि अर्ज फी भरून अर्ज करू शकतो.
महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ६ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लि., मुंबई यांचेमार्फत भरती.
परीक्षा कोड क्रमांक : १११/२०२३२४.
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक.
एकूण पदे : १९.
नोकरीचे ठिकाण : नागपूर जिल्हा.
पात्रता : पदवी उत्तीर्ण व MS- CITकिंवा समतूल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्षे.
प्राधान्य : वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येईल. कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
भाषेचे ज्ञान : मराठी/ इंग्रजी/ हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
वेतन : प्रथम ६ महिन्यांकरिता ट्रेनी कालावधीत रु. १५,०००/- दरमहा.
त्यानंतर १२ महिन्यांकरिता प्रोबेशन कालावधीत रु. १९,०००/- दरमहा.
सेवेत कायम केल्यानंतर सुरूवातीचे वेतन रु. ३२,०००/- दरमहा.
निवड पद्धती : १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
कागदपत्र पडताळणी : ऑफलाइन परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखतीकरिता शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल.
परीक्षा शुल्क : रु. ८००/- अधिक १८ टक्के जीएसटी असे एकूण रु. ९४४/-.
बँक खात्याचा तपशील :
Bank Account Name – The Maharashtra Urban Co- operative Banks Federation Ltd.
Bank Name – UCO Bank, Wadala Branch, Mumbai – 400031.
Saving A/ c No. – 09780210001950
IFSC Code – UCBA0000978
परीक्षा शुल्काची रक्कम ही वर नमूद केल्याप्रमाणे बँकेमध्ये NEFT/ RTGS/ UPIद्वारे भरून बँकेकडून परीक्षा शुल्क भरल्याची माहिती (Transaction ID/ UTR No.) ऑनलाइन अर्ज भरताना नमूद करावी.

ऑनलाइन अर्ज http:// www. mucbf. in/ या संकेतस्थळावर दि. १७ नोव्हेंबर २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत करावेत.
परीक्षा दिनांक, मुलाखत दिनांक व परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

suhassitaram@yahoo.com