सुहास पाटील

१) महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनायांतर्गत शासकीय महाविद्यालय/ संस्थेमधील विविध विषयांतील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (महाविद्यालयीन शाखा) तसेच शासकीय कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विषयांतील अधिव्याख्याता महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (महाविद्यालयीन शाखा) या संवर्गातील पद भरती.

CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Bhabha Atomic Research Centre
नोकरीची संधी
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
UPSC Preparation UPSC Preliminary Exam Paper I GS
यूपीएससीची तयारी : यूपीएससी पूर्वपरीक्षा पेपर I (GS)
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या
mpsc exam loksatta
नोकरीची संधी : आयोगाच्या अर्जांना मुदतवाढ

( I) जाहिरात क्र. ११५/ २०२३

अधिव्याख्याता (Lecturer), महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (महाविद्यालयीन शाखा) – ८६ पदे.

वेतन श्रेणी – एस-१६ (रु. ४४,९०० – १,४२,४००) अंदाजे वेतन दरमहा

रु. ७८,५००/-.

विषयनिहाय भरावयाच्या पदांचा

तपशील –

(१) समाजशास्त्र – १

(२) भौतिक शास्त्र – १४

(३) रसायन शास्त्र – १०

(४) गणित – १०

(५) जीवशास्त्र – ५

(६) मराठी – ५

(७) हिंदी – ५

(८) उर्दू – १

(९) पाली प्राकृत – १

(१०) इंग्रजी – ४

(११) तत्त्वज्ञान – २

(१२) संगीत – ३

(१३) वाणिज्य – ४

(१४) इलेक्ट्रॉनिक्स – ४

(१५) पर्यावरण – १

(१६) इतिहास – ३

(१७) राज्यशास्त्र – २

(१८) भूगोल – २

(१९) अर्थशास्त्र – ३

(२०) गृहशास्त्र – ३

(२१) मानसशास्त्र – ३

पात्रता – (दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी) संबंधित विषयातील दुसऱ्या वर्गातील पदव्युत्तर पदवी आणि बी.एड्. पदवी उत्तीर्ण. (अनुसूचित जाती (अजा))चे पुरेसे उमेदवार उपलब्ध झाल्यास त्या जागा अज/विजा/ भज-ब च्या उमेदवारांमधून भरल्या जातील. गरज असल्यास दुसऱ्या वर्गाची अट शिथिल केली जाऊ शकते.

( II) जाहिरात क्र. ११४/२०२३ – सहायक प्राध्यापक/ ग्रंथपाल/शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षणसेवा गट-अ (महाविद्यालयीन शाखा) – २१४ पदे (२ पदे अनाथांकरिता आणि ९ पदे दिव्यांग कॅटेगरी  B/ LV- २,  D/ HH  – २,  DH – ३,  SLD/ MD- २ राखीव)

वेतन श्रेणी – शैक्षणिक स्तर-१० (५७,००० – १,८२,४००)

भरावयाच्या पदांचा विषयनिहाय

तपशील-

(१) वनस्पतीशास्त्र – १३

(२) भौतिक शास्त्र – २१

(३) प्राणिशास्त्र – १२

(४) रसायनशास्त्र – २०

(५) संख्याशास्त्र – १५

(६) गणित – ११

(७) भूगर्भशास्त्र – ४

(८) सूक्ष्मजीवशास्त्र – ८

(९) जीवभौतिकशास्त्र – १

(१०) जीवरसायनशास्त्र – १

(११) संगणकशास्त्र – २

(१२) जीवशास्त्र – १

(१३) न्यायसहाय्यक विज्ञान – ९

(१४) मराठी – ३

(१५) इंग्रजी – ३

(१६) हिंदी – ३

(१७) पर्शियन – ५

(१८) उर्दू – २

(१९) अरेबिक – ४

(२०) भूगोल – ६

(२१) अर्थशास्त्र – १२

(२२) मानसशास्त्र – १२

(२३) समाजशास्त्र – २

(२४) राज्यशास्त्र – ३

(२५) गृहशास्त्र – १५

(२६) संगीत – ६

(२७) इतिहास – ४

(२८) वाणिज्य – ५

(२९) मार्केटिंग – १

(३०) फायनान्स – १

(३१) माहिती तंत्रज्ञान – १

(३२) ग्रंथपाल – ३

(३३) शारीरिक शिक्षण संचालक – ५

पात्रता – ( i) सहायक प्राध्यापक – संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि  NET/  SETउत्तीर्ण. (Ph. D. पात्रताधारकांस  NET/  SETउत्तीर्ण करणे आवश्यक नाही.)

( ii) ग्रंथपाल – लायब्ररी सायन्स, इन्फॉरमेशन सायन्स किंवा डॉक्युमेंटेशन सायन्स किंवा समतूल्य पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि उमेदवाराने  NET/  SETपात्रता धारण केलेली असावी.

( iii) शारीरिक शिक्षण संचालक – फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स किंवा फिजिकल एज्युकेशन किंवा स्पोर्ट्स सायन्समधील पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि  NET/  SETपात्रता परीक्षा उत्तीर्ण.

उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. पुरुष – १२ मिनिटांत तीनही पदांसाठी ११ जुलै २००९ पूर्वी  Ph. D. साठी रजिस्ट्रेशन करून  Ph. D. पात्रता मिळविणारे उमेदवारांना  NET/  SETची अट लागू नाही. नेमून दिलेले अंतर धावणे. महिला नेमून दिलेले अंतर ८ मिनिटांत धावणे.

( III) जाहिरात क्र. ११३/२०२३ – सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (महाविद्यालयीन शाखा) – ४६ पदे (अजा – ६, अज – ३, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, विमाप्र – १, आदुघ – ५, इमाव – ९, खुला – १७) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी B/ LV- १,  D/ HH- १ साठी राखीव).

वेतन श्रेणी – शैक्षणिक स्तर-१३अ (१,३१,४०० – २,१७,१००) अधिक नियमानुसार भत्ते.

पात्रता – ( i) संबंधित विषयातील चांगल्या शैक्षणिक नोंदीसह  Ph. D. पदवी.

( ii) पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि अनुभव शिकविण्याचा किंवा संशोधनातील असिस्टंट प्रोफेसर पदावरील किमान ८ वर्षांचा अनुभव. (किमान ७५ रिसर्च स्कोअर असावा.)

( IV) जाहिरात क्र. ११२/२०२३ –

प्राध्यापक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (महाविद्यालयीन शाखा) – ३२ पदे (अजा – ४, अज – ३, विजा-अ – २, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, आदुघ – ३, इमाव – ८, खुला – ८) (१ पद दिव्यांग कॅटेगरी  B/ LVसाठी राखीव).

वेतन श्रेणी – शैक्षणिक स्तर-१४ (रु. १,४४,२०० – २,१८,२००).

पात्रता – संबंधित विद्याशाखेतील प्रख्यात विद्वान  Ph. D. धारक किमान १० रिसर्च जर्नल्समध्ये संशोधन वर्क प्रसिद्ध झाले आहे. (रिसर्च स्कोअर – १२०) आणि १० वर्ष शिकविण्याचा/ रिसर्चमधील अनुभव.

वयोमर्यादा – पद क्र. १ व २ साठी खुला प्रवर्ग – १९ – ३८ वर्षे, मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ – ४३ वर्षे. पद क्र. ३ व ४ साठी खुला प्रवर्ग – १९ ते ४५ वर्षे, अनाथ/ आदुघ/ मागासवर्गीय – ५० वर्षे. सर्व पदांसाठी दिव्यांग उमेदवारांना कमाल वयोमर्यादा – ४५ वर्षे.

निवड पद्धती – सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/ अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता/ अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे किंवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.

चाळणी परीक्षा घेण्याचे ठरल्यास अर्हता आणि/ अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

चाळणी परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

चाळणी परीक्षा घेतल्यास अंतिम निवडीसाठी चाळणी परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण विचारात घेतले जातील. चाळणी परीक्षा न घेतल्यास फक्त मुलाखतीमधील गुणवत्तेच्या आधारित अंतिम निवड केली जाईल.

मुलाखतीमध्ये यांच्या एकूण गुणांपैकी किमान ४१ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची शिफारीश करण्यात येईल.

प्रस्तुत सर्व पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबतचा तपशील आयोगाच्या  https:// mpsc. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परीक्षा शुल्क – रु. ३९४/- (खुला), रु. २९४/- (मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ). ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याकरिता विहीत अंतिम दि. ९ नोव्हेंबर २०२३ (२३.५९ वाजेपर्यंत) भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणेकरिता विहीत अंतिम दि. ११ नोव्हेंबर २०२३

(२३.५९ वाजेपर्यंत). चलनाद्वारे

परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दि. १३ नोव्हेंबर २०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत).

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या  https:// mpsconline. gov. in या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना उपलब्ध आहेत.

ऑनलाइन अर्ज  https:// mpsconline. gov. in  या संकेतस्थळावर दि. ९ नोव्हेंबर २०२३ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com

Story img Loader