सुहास पाटील

‘एनटीपीसी’तील संधी

एनटीपीसी लिमिटेड ( NTPC) (भारत सरकारचा उपक्रम), नवी दिल्ली. (Advt. No. ०४/२०२४) ‘असिस्टंट एक्झिक्युटिव्ह (ऑपरेशन्स)’ पदांची NTPC च्या देशभरातील स्टेशन्स, प्रोजेक्ट्स/ JVs/ Subsidiary ठरावीक मुदतीकरिता भरती.

Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
Shares of Crystal Integrated closed lower on the first day
क्रिस्टल इंटिग्रेटेडचे समभाग पहिल्या दिवशी घसरणीसह बंद
The state government has decided to allow two more companies of generic drugs Mumbai
जेनेरिक औषधांची ‘दुकानदारी’ सुरूच; आणखी दोन कंपन्यांना राज्य सरकारच्या पायघडय़ा

एकूण रिक्त पदे – २२३ (अजा – ३९, अज – २४, इमाव – ४०, ईडब्ल्यूएस – २२, खुला – ९८). नेमणुकीचा कालावधी ३ वर्षे जो आणखीन २ वर्षांनी वाढविला जावू शकतो.

पात्रता – (दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी किमान ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी गुणांची अट नाही.) आणि किमान १ वर्षाचा पॉवर प्लांट/ ऑपरेशन्स/ मेंटेनन्स कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – (दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी) ३५ वर्षे (इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे, दिव्यांग ४५ वर्षे).

वेतन – रु. ५५,०००/- दरमहा अधिक एचआरए किंवा कंपनी अकोमोडेशन, रात्रपाळी भत्ता, वैद्याकीय सुविधा इ.

निवड पद्धती – प्राप्त अर्जांची छाननी करून ऑनलाईन स्क्रिनिंग टेस्ट/ सिलेक्शन टेस्ट/इंटरह्यू घेवून निवड प्रक्रियेसाठी उमेदवार शॉर्ट लिस्ट केले जातील.

अर्जाचे शुल्क – रु. ३००/-. (अजा / अज/ दिव्यांग / माजी सैनिक / महिला उमेदवारांना फी माफ आहे.)

ऑनलाइन शुल्क ऑनलाइन पद्धतीने अथवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही ब्रँचमधून ३०९८७९१९९९३ CAG Branch, नवी दिल्ली या अकाऊंटमध्ये भरता येतील. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी सिस्टीमध्ये जनरेट झालेली अॅप्लिकेशन स्लिप (ज्यावर युनिक अॅप्लिकेशन नंबर दिलेला असेल) डाऊनलोड करून घ्यावी.

ऑनलाइन अर्ज www. ntpc. co. in या संकेतस्थळावर दि. ८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावेत.

आकाशवाणीतील संध

प्रसार भारती, प्रसार भारती हाऊस, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली-११०००१ कडून मुंबई विभागासाठी एडिटोरीअल एक्झिक्युटिव आणि वृत्तनिवेदक व अनुवादक पदासाठी अर्ज करण्याची सूचना.

प्रसार भारतीमध्ये रिजनल न्यूज युनिट, आकाशवाणी, मुंबई येथे पूर्णवेळ करारावर एडिटोरीअल एक्झिक्युटिव आणि वृत्तनिवेदक व अनुवादक पदासाठी प्रसार भारती, वृत्तसेवा विभाग, आकाशवाणी यांनी अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवले आहेत.

पद – एडिटोरीअल एक्झिक्युटिव आणि वृत्तनिवेदक व अनुवादक (मराठी)

पदांची संख्या – 

कामाचे ठिकाण – आरएनयू, आकाशवाणी, मुंबई

प्रतिबद्धता कालावधी – २ वर्षे

वय – अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला ५८ वर्षांपेक्षा जास्त नाही

एकत्रित मोबदला – रु.४०,०००-५०,००० प्रति महिना (वाटाघाटीनुसार)

आवश्यक पात्रता.-

१) पत्रकारितेतील पदवी/ पदव्युत्तर पदविका तसेच ३ वर्षे प्रकाशन संस्था अथवा वृत्त संस्थामंध्ये काम करण्याचा अनुभव

२) भाषेवर प्रभुत्व, इंग्रजी/हिंदीमधून मराठीत भाषांतर कौशल्य

AV माध्यमासाठी व्हॉइस ऑडिशन आणि प्रेझेंटेशन स्कील असणे आवश्यक आहे

कामाचे स्वरूप –

न्यूज बुलेटिन्स, वृत्त मासिके आणि इतर कोणतेही विशेष कार्यक्रम आवश्यकतेनुसार तयार करणे

विशेष कार्यक्रमांसाठी मुलाखती घेणे

रेडिओ आणि डिजिटल माध्यमांसाठी आकर्षक पद्धतीने स्क्रिप्ट लिहणे.

वार्तांकन, लेखन आणि सोशल मीडिया हाताळण्यात प्रावीण्य असावे.

प्रतिबद्धतेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत:

ही पदे पूर्णपणे कराराच्या आधारावर आहेत. प्रसारभारतीमध्ये कायमस्वरुपी भरतीसाठी दावा करता येणार नाही.

करार केल्यानंतर पदावरील व्यक्तीला इतर कोणतेही काम घेण्याची परवानगी दिली जाणार नाही

प्रतिबद्धतेचा कालावधी सुरुवातीला दोन वर्षांचा असेल.

वार्षिक मूल्यांकनासह संस्थेच्या आवश्यकता आणि कार्यप्रदर्शन पुनरावलोकनाच्या आधारावर वाढवता येऊ शकते.

कोणतेही कारण न देता दोन्ही बाजूने एका महिन्याच्या किंवा एक महिन्याच्या नोटीससह प्रतिबद्धता बंद/समाप्त केली जाऊ शकते

या कराराच्या गुंतवणुकीसाठी पेन्शनरी लाभाचा कोणताही दावा केला जाणार नाही

निवडलेल्यांची चाचणी आणि/ किंवा मुलाखत घेण्याचा अधिकार प्रसार भारतीकडे आहे

उमेदवार चाचणी/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/ DA वगैरे अदा केला जाणार नाही.

अंतिम निवडीच्या वेळी पदांची संख्या कमी किंवा वाढवली जाऊ शकते.

देऊ केलेल्या मोबदल्यासाठी योग्य उमेदवारासाठी वाटाघाटी केली जाऊ शकते

जे उमेदवार पात्र आहेत आणि वरील अटी व शर्तींवर काम करण्यास इच्छुक आहेत

तसेच नमूद केलेली आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेले उमेदवार

प्रसार भारती वेब लिंकवर ऑनलाइन http:// applications. prasarbharati. org/ वर ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात.

स्वयं-साक्षांकित प्रतीसह कागदपत्रे सबमिशन करण्यात काही अडचण आल्यास, ते ईमेलवर पाठवता येईल. त्यासाठी इ-मेल -nsdrnudeskapplications@gmail.com

suhassitaram@yahoo.com