सुहास पाटील
१) इंडिया एक्झिम बँक ( India Exim Bank) ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांची थेट भरती मोहीम. ( Advt. No. HRM/ MT/ २०२३-२४/ ०१) एकूण रिक्त पदे – ४२.
(१) (बँकिंग ऑपरेशन्स) मॅनेजमेंट ट्रेनी (MT) – ३५ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १६). १ पद दिव्यांग कॅटेगरी D/ HH उमेदवारांसाठी राखीव.
पात्रता – M. B. A./ P. G. D. B. A. फिनान्स स्पेशलायझेशन किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा चार्टर्ड अकाऊंटंट (CA) (ICAI कडील मेंबरशिप असणे आवश्यक) (उमेदवारांना पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळालेले असावेत.) पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत,
त्यांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पात्रता धारण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
मॅनेजमेंट ट्रेनीजना लोन्स ऑपरेशन्स अॅण्ड मॉनिटिरग/ लाईन्स ऑफ क्रेडिट/ इंटरनल ऑडिट/ रिस्क मॅनेजमेंट/ ट्रेझरी अँड अकाऊंट्स/ रिकव्हरी किंवा बँकेच्या इतर कोणत्याही ग्रुपमध्ये नेमले जाईल.
उमेदवारांकडे excellent communication skills आणि कॉम्प्युटर आणि इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी वापरण्याचे कौशल्य अवगत असावे.
(२) मॅनेजर (डिजिटल टेक्नॉलॉजी) – ७ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ५).
पात्रता – B. E./ B. Tech. (कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन) किंवा टउअ किमान ६० टक्के गुण.
(३) मॅनेजमेंट ट्रेनी (राजभाषा) – २ पदे. पात्रता – पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि हिंदी किंवा इंग्रजी विषयासह पदव्युत्तर पदवी. (पदवीला अनुक्रमे इंग्रजी किंवा हिंदी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीला ते माध्यम असावे.)
इष्ट पात्रता – हिंदीतून इंग्रजी किंवा इंग्रजीतून हिंदी ट्रान्सलेशन डिप्लोमा कोर्स किंवा किमान १ वर्षांचा ट्रान्सलेशनमधील अनुभव.
(४) मॅनेजर ट्रेनी (अॅडमिनिस्ट्रेशन) – १ पद (खुला).
पात्रता – सिव्हील/ इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा हॉटेल अॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट/ फॅसिलिटिज मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी (पदवी/ पदव्युत्तर पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण).
वयोमर्यादा – १ ऑक्टोबर २०२३ रोजी २१ ते २८ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे)
निवड पद्धती – ऑनलाइन टेस्ट (ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे प्रश्न) आणि इंटरह्यू. ऑनलाइन टेस्टची निश्चित तारीख आणि वेळ उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.
अंतिम निवड यादी बनविताना डिस्क्रीप्टिव्ह पेपरमधील १०० पैकी गुणांना ८० टक्के वेटेज आणि इंटरह्यूमधील १०० पैकी गुणांना २० टक्के वेटेज दिले जाईल.
इंटरह्यूला सामोरे जाण्यापूर्वी उमेदवारांना सायकोमेट्रिक टेस्ट द्यावी लागेल. ज्यासाठी गुण दिले जाणार नाहीत.
ऑनलाइन टेस्ट अंदाजे डिसेंबर २०२३ मध्ये आयोजित केली जाईल.
इंटरह्यू मुंबई आणि/ किंवा नवी दिल्ली येथे होतील.
ऑनलाइन टेस्टसाठीची केंद्र – मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ MMR Region,, नागपूर, अहमदाबाद, बेंगळूरु, हैदराबाद, बिलासपूर, भोपाळ इ.
अर्जाचे शुल्क – खुला आणि इमाव – रु. ६००/-, अजा/ अज/ दिव्यांग/ ईडब्ल्यूएस – रु. १००/-. (फक्त इंटिमेशन चार्जेस)
ऑनलाइन टेस्ट – (ए) ऑब्जेक्टिव्ह टाईप (पात्रता स्वरूपाची) MCQ (१) रिझिनग अॅण्ड क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड, (२) इंग्लिश लँग्वेज, (३) कॉम्प्युटर नॉलेज/अॅप्टिटय़ूड, (४) फिनान्शियल अवेअरनेस (बँकिंग इंडस्ट्री निगडीत), (५) डेटा अॅनालिसिस अॅण्ड इंटरप्रिटेशन यावर प्रत्येकी २० प्रश्न, एकूण १०० प्रश्न, प्रत्येकी १ गुण, एकूण १०० गुण, वेळ ८० मिनिटे.
ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ साठी ५ ऑप्शन्स असतील. चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.
(बी) डिस्क्रीप्टिव्ह पेपर (यातील गुण इंटरह्यूकरिता उमेदवार निवडण्यासाठी वापरले जातील.)
(१) इंग्लिश पेपर निबंध लेखन १ प्रश्न, १५ गुण, पत्रलेखन – १ प्रश्न, १० गुण, एकूण २५ गुण.
(२) प्रोफेशनल नॉलेज – ५ प्रश्न, प्रत्येकी १५ गुणांसाठी, एकूण गुण – ७५. १ अधिक
२ साठी एकूण गुण १००, वेळ १०० मिनिटे. (ए अधिक बी) एकूण २०० गुण, वेळ १८० मिनिटे.
ऑब्जेक्टिव्ह टेस्टमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांचाच डिस्क्रीप्टिव्ह पेपर तपासला जाईल. रिक्त पदांच्या १:५ प्रमाणात उमेदवार इंटरह्यूसाठी डिस्क्रीप्टिव्ह पेपरमधील गुणवत्तेनुसार निवडले जातील.
१ वर्ष कालावधीची ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर मॅनेजमेंट ट्रेनीजना ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड/ स्केलवरील डेप्युटी मॅनेजर पदावर कायम केले जाईल. ट्रेनिंग दरम्यान स्टायपेंड असेल रु. ५५,०००/- दरमहा. डेप्युटी मॅनेजर पदांसाठी वेतन रु. १७ लाख प्रतिवर्ष (CTS).
प्री-रिक्रूटमेंट ट्रेनी – जे उमेदवार प्री-रिक्रूटमेंट ट्रेनिंगसाठी आपली मागणी ऑनलाइन अर्जात नोंद करतील अशा राखीव गटातील उमेदवारांसाठी बँक प्री-रिक्रूटमेंट ट्रेनी आयोजित करणार आहे. याची माहिती उमेदवारांना १० नोव्हेंबर २०२३ नंतर कळवण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज https:// www. eximbankindia. in/ careers या वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये दिलेल्या https:// ibpsonline. ibps. in/ iebmtoctst/ या लिंकमधून दि. १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत करावेत. (Apply Online & gt; New Registration & gt; upload photograph, signature, left thumb impression, hand written declaration Image & gt; Preview & gt; Complete Registration & gt; Payment & gt; E- reciept will be generated & gt; submit) ऑनलाइन रजिस्ट्रेशननंतर उमेदवारांनी सिस्टीम जनरेटेड ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मची आणि ई-रिसिप्टची (ज्यात फी भरल्याची माहिती असेल.) पिंट्रआऊट घ्यावी.
१) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) (रिफायनरिज डिव्हिजन – गुजरात, मथुरा, हल्दिया, पानिपत, गुवाहाटी, बरौनी, दिग्बोई, बोंगायगाव, पॅरादिप) मध्ये ट्रेड अॅप्रेंटिसेसची भरती. एकूण रिक्त पदे – १,७२०.
(१) ट्रेड अॅप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) केमिकल (कोड – १०१) – एकूण ४११ पदे (गुजरात – ५८).
(२) ट्रेड अॅप्रेंटिस – बॉयलर (मेकॅनिकल) (कोड – १०३) – एकूण ५९ पदे (गुजरात – ९).
पात्रता – पद क्र. १ व २ साठी इ. रू. (फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री)
(३) ट्रेड अॅप्रेंटिस (फिटर) – मेकॅनिकल (कोड – १०२) – एकूण १८९ पदे (गुजरात – ४२).
पात्रता – आयटीआय फिटर कोर्स.
(४) टेक्निशियन अॅप्रेंटिस – केमिकल (कोड – १०४) – एकूण ३४५ पदे (गुजरात – ५८).
(५) टेक्निशियन अॅप्रेंटिस – मेकॅनिकल (कोड – १०५) – एकूण १६९ पदे (गुजरात – ३९).
(६) टेक्निशियन अॅप्रेंटिस – इलेक्ट्रिकल (कोड – १०६) – एकूण २४४ पदे (गुजरात – ४९).
(७) टेक्निशियन अॅप्रेंटिस – इन्स्ट्रमेंटेशन (कोड – १०७) – एकूण ९३ पदे (गुजरात – २५).
पद क्र. ४ ते ७ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअिरग डिप्लोमा.
(८) ट्रेड अॅप्रेंटिस – अकाऊंटंट (कोड – १०९) – एकूण ३९ पदे (गुजरात – ५).
पात्रता – B. Com.
(९) ट्रेड अॅप्रेंटिस – सेक्रेटरियल असिस्टंट (कोड – १०८) – एकूण ७९ पदे (गुजरात – १४).
पात्रता – B. A./ B. Sc./ B. Com.
(१०) ट्रेड अॅप्रेंटिस – डेटा एन्ट्री ऑपरेटर (फ्रेशर अॅप्रेंटिस) (कोड – ११०) – एकूण ४९ पदे (गुजरात – ८).
(११) ट्रेड अॅप्रेंटिस – डेटा एन्ट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेट होल्डर) (कोड – १११) – एकूण ३३ पदे
(गुजरात – ७).
पद क्र. १० व ११ साठी पात्रता – १२ वी उत्तीर्ण.
पद क्र. ३ व ५ ते ११ साठी दिव्यांग उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी – पद क्र. १, ३ ते ८, १० व ११ साठी १२ महिने. पद क्र. २ साठी २४ महिने; पद क्र. ९ साठी १५ महिने. उमेदवारांना दरमहा नियमानुसार स्टायपेंड दिले जाईल.
वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी १८-२४ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)
निवड पद्धती – लेखी परीक्षेतील गुणानुक्रमे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ कालावधी २ तास. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. त्यानंतर मेडिकल फिटनेस टेस्ट घेतली जाईल.
लेखी परीक्षा, कॉल लेटर, निकाल इ. www. iocl. com/ www. iocrefrecruit. in या संकेतस्थळावर आणि उमेदवारांच्या रजिस्टर्ड ई-मेलवर उपलब्ध केली जाईल. गुजरात रिफायनरी, गुवाहाटी, बरोनी, दिग्बोयी, बोंगायगाव रिफायनरीसाठी लेखी परीक्षा संबंधित रिफायनरीच्या ठिकाणी घेतली जाईल.
अॅडमिट कार्ड २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ दरम्यान डाऊनलोड करता येतील.
लेखी परीक्षा ३ डिसेंबर २०२३ रोजी घेतली जाईल.
लेखी परीक्षेचा निकाल दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर केला जाईल.
कागदपत्र पडताळणी – १८ डिसेंबर ते ६ डिसेंबर २०२३ दरम्यान घेतली जाईल.
उमेदवार फक्त एकाच ट्रेड/ डिसिप्लिनसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
ऑनलाइन अर्ज www. iocl. com या संकेतस्थळावर दि. २० नोव्हेंबर २०२३ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत. ( Whatl s New & gt; Engagement of Apprentices under Refineries Division & gt; Detailed Advertisement & gt; Apply Online)
suhassitaram@yahoo.com