सुहास पाटील

इंटेलिजन्स ब्युरो ( IB) (गृहमंत्रालय, भारत सरकार) ‘सिक्युरिटी असिस्टंट/मोटर ट्रान्सपोर्ट (SA/ MT)’ आणि मल्टि टास्कींग स्टाफ/ जनरल (MTS/ Gen) पदांची केंद्रीय गुप्तचर ( IB) विभागांतर्गत देशभरातील सबसिडीअरी इंटेलिजन्स ब्युरो ( SIB) कार्यालयांमध्ये भरती.  एकूण रिक्त पदे – ६७७.

who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
Siddhi Kadam Withdraw Mohol
Siddhi Kadam : मोहोळमधून रमेश कदम आणि सिद्धी कदम यांची माघार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राजू खरेंना दिलासा
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
four candidates of Rohit patil name
Rohit Patil: तासगावमध्ये चार ‘रोहित पाटील’ रिंगणात
National Commission for Medical Sciences is aggressive about MBBS admission
एमबीबीएस प्रवेशाबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग आक्रमक
Transfers of 28 police officers before assembly elections 2024
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८ अधिकाऱ्यांच्या बदल्या

(I) सबसिडीअरी इंटेलिजन्स ब्युरो ( SIB) मुंबईमधील रिक्त पदे :

( i) सिक्युरिटी असिस्टंट/मोटर ट्रान्सपोर्ट SA/ MT – १० पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).

( ii) मल्टि टास्कींग स्टाफ/ जनरल (MTS/ Gen) – १७ पदे (अज – २, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८).

(I)  SIB नागपूर ( i)  SA/ MT – ८ पदे (इमाव – २, खुला – ६).

(ii)  MTS/ Gen – ६ पदे (इमाव – १, खुला – ५).

(III)  IB मुख्यालय दिल्ली ( i)  SA/ MT – ९३ पदे (अजा – १३, अज – ६, इमाव – २४, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ४२).

( ii)  MTS/ Gen – ९८ पदे (अज – ७, इमाव- २५, ईडब्ल्यूएस – १८, खुला -४८).

पात्रता :  SA/ MT U  MTS/ Gen पदांसाठी ( i) १० वी उत्तीर्ण आणि ( ii) ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला आहे त्या राज्याच्या उमेदवाराकडे रहिवासी (Domicile) सर्टिफिकेट असणे आवश्यक.

इष्ट पात्रता : मोटार सायकल चालविण्याचा परवाना.

फक्त  SA/ MT पदांसाठी ( i)  LMV ड्रायिव्हग लायसन्स असणे आवश्यक.

( ii) उमेदवाराकडे मोटर मेकॅनिझमचे ज्ञान असावे. (उमेदवाराला मोटर वेहिकलमधील लहानसहान दोष दुरूस्त करता येणे आवश्यक.)

( iii) मोटार कार चालविण्याचा किमान १ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा : दि. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी  SA/ MT २७ वर्षेपर्यंत.  MTS/ Gen १८-२५ वर्षेपर्यंत.

कमाल वयोमर्यादेत सूट : इमाव – ३ वर्षे; अजा/ अज/ गुणवान खेळाडू – ५ वर्षे; (विधवा/ परित्यक्ता/ घटस्फोटीत महिला ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही. यांचेसाठी ३५ वर्षे अशा अजा/अजच्या महिला यांचेसाठी ४० वर्षे).

फक्त  MTS/  Gen पदांसाठी – दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत सूट – १० वर्षेपर्यंत.

SA/ MT पदांसाठी वेतन श्रेणी : पे-लेव्हल – ३ (रु. २१,७०० – ६९,१००) अधिक इतर भत्ते. (अंदाजे वेतन दरमहा रु. ४६,०००/-)

MTS/  Gen पदांसाठी वेतन श्रेणी : पे-लेव्हल – १ (रु. १८,००० – ५६,९००) अधिक इतर भत्ते. अंदाजे वेतन दरमहा रु. ३६,०००/-. मूळ वेतनाच्या २० टक्के रक्कम स्पेशल सिक्युरिटी अलाऊन्स म्हणून दिली जाईल.

निवड पद्धती : टियर-१ – परीक्षा दोन्ही पदांसाठी – ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० गुणांसाठी वेळ १ तास. (ए) जनरल अवेअरनेस – ४० गुण, (बी) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – २० गुण, (सी) न्यूमरिकल/ अ‍ॅनालायटिकल/ लॉजिकल अ‍ॅबिलिटी अ‍ॅण्ड रिझिनग – २० गुण, (डी) इंग्लिश लँग्वेज – २० गुण. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.

रिक्त पदांच्या १० पट उमेदवार टियर-१ मधून टिचर-२ साठी निवडले जातील.

SA/ MT पदांसाठी टियर-२ – मोटर मेकॅनिझम अ‍ॅण्ड ड्रायिव्हग टेस्ट कम इंटरव्ह्यू – ५० गुण (पात्रतेसाठी किमान २० गुण आवश्यक).

उमेदवारांनी मोटर वेहिकल प्रशिक्षक सांगेल त्याप्रमाणे चालविणे. मोटर वेहिकलचे उमेदवारास प्रॅक्टिकल नॉलेज असणे आवश्यक. वेहिकलचे मेंटेनन्स तसेच लहानसहान दोष दुरुस्त करता येते का हे तपासले जाईल.

टियर-२ – MTS/ Gen  पदांसाठी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑन इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन (बेसिक्स ऑफ इंग्लिश लँग्वेज, व्होकॅबिलरी, ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, समानार्थी, विरुद्धार्थी, शब्द आणि त्यांचा योग्य वापर इ. (कॉम्प्रिहेन्शन टेस्ट करण्यासाठी) आणि १५० शब्दांचा पॅराग्राफ रायटिंग – ५० गुणांसाठी वेळ १ तास. (पात्रतेसाठी किमान २० गुण आवश्यक)

SA/  MT पदांसाठी अंतिम निवड यादी टियर-१ व टियर-२ मधील एकत्रित गुणवत्तेनुसार बनविली जाईल.

MTS/  Gen पदांसाठी अंतिम निवड यादीसाठी जे उमेदवार टियर-२ परीक्षा उत्तीर्ण करतील त्यांचे टियर-१ च्या गुणवत्तेनुसार केली जाईल.

अंतिम निवड उमेदवारांची चारित्र्य आणि पूर्वचरित्र तपासणी केल्यानंतर मेडिकल टेस्ट घेऊन केली जाईल.

टियर-१ – परीक्षेसाठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र : अमरावती, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे. उमेदवारांनी ५ परीक्षा केंद्रांसाठी पसंतीक्रम देणे आवश्यक.

उमेदवार ज्या राज्याचा रहिवासी (Domicile) आहे फक्त त्या राज्यातील  SIB साठी अर्ज करू शकतात.

अर्जाचे शुल्क : खुला प्रवर्ग/ इमाव/ ईडब्ल्यूएसचे पुरुष उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. ५०/- अधिक रिक्रूटमेंट प्रोसेसिंग चार्जेस रु. ४५०/- (एकूण रु. ५००/-). इतर उमेदवारांसाठी, रिक्रूटमेंट प्रोसेसिंग चार्जेस रु. ४५०/- (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ असले तरी त्यांना रिक्रूटमेंट प्रोसेसिंग चार्जेस भरणे आवश्यक.)

अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने दि. १३ नोव्हेंबर २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत भरता येईल. SBI चलानने अर्जाचे शुल्क दि. १६ नोव्हेंबर २०२३  भरता येईल.

ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर जनरेट झालेले ई-चलान ४ दिवसांकरिता व्हॅलिड असेल. शंकासमाधानासाठी अ‍ॅप्लिकेशन पोर्टलवर  Helpdesk Tab उपलब्ध आहे किंवा हेल्पडेस्क फोन नं. ९९८६६४०८११. (सोमवार ते शनिवार (१०.०० ते १८.०० वाजे) दरम्यान संपर्क साधा.)  अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस/ दिव्यांग कॅटेगरीतील उमेदवारांकडे दि. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी (Appendix – 1, 2, 3, 4 & 5)प्रमाणे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नमुन्यातील सर्टिफिकेट धारण करणे आवश्यक.

SA/  MT पदांसाठी दिव्यांग उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. उमेदवार  SA/  MT किंवा  MTS/  Gen किंवा दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकतात. दोन्ही पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना (टियर-१ परीक्षा उत्तीर्ण केल्यास)  MTS/ Gen पदांच्या टियर-२ पदांसाठी परीक्षा देता येईल. त्यांना  SA/  MT पदांसाठी विचारात घेतले जाईल. त्यानंतर  MTS/  Gen पदांसाठी विचार केला जाईल.

ऑनलाइन अर्ज  MHA ची वेबसाईट  www. mha. gov. in किंवा  NCS पोर्टल  www. ncs. gov. in वर दि. १३ नोव्हेंबर २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ( BEL) (संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा उपक्रम) ( Advt.  No. 17556/ HR/ All- India dt. 04.10.2023). पुढील पदांची भरती. (१) प्रोबेशनरी इंजिनिअर/ ए- II – १२४ पदे. पात्रता : टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदवी.

(२) प्रोबेशनरी इंजिनीअर/  ए- II – ६३ पदे. पात्रता : मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी.

(३) प्रोबेशनरी इंजिनीअर/  ए- II(कॉम्प्युटर सायन्स) – १८ पदे. पात्रता : कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग पदवी.

(४) प्रोबेशनरी ऑफिसर (एचआर)/ ए- कक – १२ पदे. पात्रता : MBA/MSW/  PG Degree/ Diploma in HRM/ IR/ PM. पद क्र. १ ते ४ साठी खुला प्रवर्ग/ इमाव/ईडब्ल्यूएस उमेदवारांनी पदवी किंवा  AMIE/ AMIETE/ GIET फस्र्ट क्लाससह उत्तीर्ण केलेली असावी. (अजा/ अज/दिव्यांग उमेदवारांना गुणांची अट नाही.)

(५) प्रोबेशनरी अकाऊंट्स ऑफिसर (एचआर)/ ए- कक – १५ पदे.

पात्रता :  CA/ CMA Final  उत्तीर्ण.

वेतन श्रेणी : रु. ४०,००० – ३ टक्के – १,४०,००० अधिक इतर भत्ते. सीटीसी प्रती वर्ष रु. १२ ते १२.५ लाख.

वयोमर्यादा : (दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी) पद क्र. १ ते ४ साठी २५ वर्षे. पद क्र. ५ साठी ३० वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे)

नोकरीचे ठिकाण : पुणे, नवी मुंबई, बेंगळूरु, हैदराबाद इ.

अर्जाचे शुल्क : रु. १,०००/- + जीएस्टी = रु. १,१८०/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती : पात्र उमेदवार कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी निवडले जातील. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (जी डिसेंबर २०२३ मध्ये घेतली जाईल.) मधून उमेदवार इंटरव्ह्यूकरिता निवडले जातील. अंतिम निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि इंटरह्यूमधील कामगिरीवर आधारित.

परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे. परीक्षेसाठी कॉल लेटर  BEL च्या वेबसाईटवर अपलोड केले जातील. ई-मेलने पाठविले जाणार नाहीत. शंकासमाधानासाठी हेल्पडेस्क नं. ९१९५१३१६५५८६ किंवा अ‍ॅप्लिकेशन पोर्टलवरील हेल्पडेस्क टॅब निवडलेल्या उमेदवारांना ६ महिन्यांचे ओरिएंटेशन/ ऑन जॉब ट्रेनिंग दिले जाईल. त्यांना ३ वर्षांसाठी सव्‍‌र्हिस अ‍ॅग्रिमेंट करावे लागेल.

ऑनलाइन अर्ज  https:// bel- india. in  या संकेतस्थळावर दि. २८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत करावेत. अर्जाची पिंट्रआऊट आणि पेमेंट अ‍ॅक्नॉलेजमेंट स्लिप जपून ठेवावी.