● १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण अविवाहीत पुरुषांना इंजिनीअर होऊन पर्मनंट कमिशन मिळविण्यासाठी इंडियन आर्मीमध्ये जानेवारी, २०२६ पासून सुरू होणाऱ्या ‘१० २ टेक्निकल एन्ट्री स्कीम ( TES) – ५४’ कोर्ससाठी जेईई मेन्स २०२५ च्या स्कोअरवर आधारित प्रवेश. प्रवेश क्षमता – ९०.

पात्रता – १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स विषयांत (पीसीएम) किमान सरासरी ६० गुण आवश्यक आणि जेईई मेन्स २०२५ परीक्षेस बसलेले असावेत.

अर्जामध्ये उमेदवारांनी १२ वीला त्यांनी मिळविलेले PCM विषयातील गुणांची दोन डेसिमल पॉईंटपर्यंतची टक्केवारी दाखविणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – १६ १/२ ते १९ १/२ वर्षे. उमेदवाराचा जन्म २ जुलै २००६ ते १ जुलै २००९ दरम्यानचा असावा. १० वी प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.

उंची – किमान १५७ सें.मी. (२.५ सें.मी. पर्यंत उंचीमध्ये सूट दिली जाईल. यासाठी मेडिकल बोर्डाचा दाखला सादर करावा लागेल. ज्यात ‘उमेदवाराचे ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उंची वाढू शकते.’ असे सर्टिफाय केलेले असेल.) वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात.

छाती – ८१-८६ सें.मी.

निवड पद्धती – JEE ( Mains) मधील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना (कट ऑफ मार्क्स अंदाजे जुलै २०२५ च्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध केले जातील.) प्रयागराज (यूपी), भोपाळ (एम्पी), बंगलोर (कर्नाटक), जालंदर (पंजाब) यापैकी एका सिलेक्शन सेंटरचे आणि एसएसबी इंटरव्ह्यूसाठीच्या तारखा यांचे वाटप केले जाईल. ऑगस्ट/ सप्टेंबर, २०२५ मध्ये एस्एस्बी इंटरव्ह्यू दोन फेजेसमध्ये घेतला जाईल. (कालावधी ५ दिवस) फेज-१ मधून अनुत्तीर्ण उमेदवारांना परत पाठविले जाईल. एसएसबी इंटरव्ह्यूमधील कामगिरीवर आधारित गुणवत्ता यादी बनविली जाईल. अंतिम निवड वैद्याकीय तपासणी नंतर केली जाते.

ज्या उमेदवारांना एसएसबी साठी निवडले आहे, त्यांनी संबंधित कॅडेट्स ट्रेनिंग विंग्सच्या ३ नावांना पसंतीक्रम द्यावा लागेल. ( CTW, CME, पुणे; CTW, MCTE, Mhow आणि CTW- MCEME, सिकंदराबाद)

वेतन – ४ वर्षांच्या ट्रेनिंगनंतर कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर परमनंट कमिशन दिले जाईल. वेतन असेल – मूळ पगार रु. ५६,१००/- मिलिटरी सर्व्हिस पे रु. १५,५००/- अधिक इतर भत्ते. एकूण वेतन अंदाजे रु. १७-१८ लाख प्रतिवर्ष ( CTC). ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर जेंटलमेन कॅडेट्सना ट्रेनिंगच्या कालावधीसाठीचे रु. ५६,१००/- वरील इतर भत्त्यांची थकबाकी दिली जाईल. युनिफॉर्म अलाऊंस रु. २५,०००/- प्रति वर्ष. ट्रेनिंग दरम्यान पहिल्या ३ वर्षांसाठी रु. १५ लाखांचा विमा संरक्षण व त्यानंतर रु. १ कोटीचे विमा संरक्षण दिले जाईल.

ऑनलाइन अर्ज www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर १२ जून २०२५ पर्यंत करावेत. शंकासमाधानासाठी Rtg वेबसाईट www. joinindianarmy. nic. in वर उमेदवारांना Feedback/ Queries Option वापरता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhaspatil237 @gmail. com