सुहास पाटील

बँक ऑफ इंडिया ( BOI) मुख्यालय, मुंबई. एकूण १४३ ऑफिसर्स पदांची भरती. ( Project No. २०२३-२४/१ Notice dt. ०१.०२.२०२४) (१) लॉ ऑफिसर्स ( Stream SPL) ( Scale MMGS- II) – २५ पदे (अजा – ७, अज – २, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ९) (१ पद दिव्यांग कॅटेगरी OC साठी राखीव).

पात्रता – कायदा विषयातील पदवी आणि किमान ४ वर्षांचा व्यावसायिक कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – २५-३२ वर्षे.

(२) लॉ ऑफिसर्स ( Stream SPL) ( Scale MMGS- III) – ३१ पदे (अजा – ४, अज – ३, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १३) (प्रत्येकी १ पद दिव्यांग कॅटेगरी HI/ OC साठी राखीव).

पात्रता – कायदा विषयातील पदवी आणि किमान ६ वर्षांचा व्यावसायिक कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – २५-३५ वर्षे.

(३) क्रेडिट ऑफिसर्स (स्ट्रीम – जनरल बँकींग ऑफिसर) – २५ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी VI साठी राखीव).

पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि MBA/ PGDBMN/ PGDM/ PGBM/ PGDBA (फिनान्स/बँकिंग अँड फिनान्स स्पेशलायझेशनसह)/ कॉमर्स/ सायन्स/इकॉनॉमिक्स विषयांतील पदव्युत्तर पदवी किंवा CA/ ICWA/ CS आणि पब्लिक सेक्टर बँक किंवा प्रायव्हेट बँक (ज्यांचा दि. ३१ मार्च २०२३ रोजी रु.१ लाख कोटीचा business mix होता) मधील ऑफिसर पदावरील किमान २ वर्षाचा कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – २३-३५ वर्षे.

(४) चिफ मॅनेजर ( Stream SPL) ( Scale SMGS- IV) – ९ पदे.

(५) सिनियर मॅनेजर आणि Misc. Officers ( Stream SPL) ( Scale MMGS- III) – ५१ पदे (अजा – ८, अज – ३, इमाव – १५, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २०).

(६) इकॉनॉमिस्ट ( Stream SPL) ( Scale MMGS- II) – १ पद (खुला).

(७) टेक्निकल अॅनालिस्ट ( Stream SPL) ( Scale MMGS- II) – १ पद (खुला).

पद क्र. ५, ६ व ७ साठी पात्रता – संबंधित कामाचा किमान ५-१० वर्षांचा अनुभव आवश्यक. पात्रता BOI च्या वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये पहावी.

वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.

निवड पद्धती – ऑनलाईन टेस्ट आणि/किंवा पर्सोनल इंटरह्यू. (प्राप्त अर्जांमधून उमेदवारांची संख्या लक्षात घेवून निवड पद्धती राबविली जाईल.)

ऑनलाइन परीक्षा – (१) इंग्लिश लँग्वेज – २५ गुण, वेळ ३० मिनिटे. (२) पदाशी संबंधित प्रोफेशनल नॉलेज – १०० गुण, वेळ ६० मिनिटे. (३) जनरल अवेअरनेस (बँकिंग इंडस्ट्रीशी संबंधित नॉलेजसह) – २५ गुण, वेळ ३० मिनिटे. एकूण १५० गुण, वेळ २ तास. परीक्षेविषयी इतर माहिती उमेदवारांना कॉल लेटरसोबत ‘ Information Handout’ डाऊनलोड करता येईल.

प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

इंटरह्यू – प्रोफेशनल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस या विषयातील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या तीन पट उमेदवारांना इंटरह्यूकरिता बोलाविले जाईल. इंटरह्यूच्या वेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्र तपासणीसाठी सादर करणे आवश्यक.

अंतिम निवड यादी बनविताना ऑनलाइन परीक्षा आणि इंटरह्यूमधील गुणांना ८०:२० प्रमाणात वेटेज दिले जाईल.

परीक्षा केंद्र – मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ MMR, पणजी, भोपाळ, रायपूर इ.

अर्जाचे शुल्क – अजा/अज/दिव्यांग – रु. १७५/-; इतरांना रु. ८५० (ऑनलाइन मोडने).

ऑनलाइन अर्ज www. bankofindia. co. in या संकेतस्थळावर दि. १० एप्रिल २०२४ पर्यंत करावेत. ( Application Registration/ Payment of Fees/ Photograph, Signature, Left thumb impression and hand written Declaration scan and upload)