सुहास पाटील

१) गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील जिल्हा पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२२-२०२३ मध्ये रिक्त होणाऱ्या गट-क मधील पोलीस शिपाई/पोलीस शिपाई चालक/सशस्त्र पोलीस शिपाई/बँड्समन पोलीस शिपाई/कारागृह शिपाईच्या रिक्त पदांची भरती. एकूण १७,४७१. पदनिहाय पोलीस घटकांमधील रिक्त पदे –

Assam Rifles , First Ex Servicemen Association Center, Maharashtra, nashik, Assam Rifles Ex Servicemen, Assam Rifles Ex Servicemen Association Center, Assam Rifles Ex Servicemen nashik, Directorate General of Assam Rifles
आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांसाठी महाराष्ट्रात प्रथमच केंद्र
29 Naxalites killed on Chhattisgarh-Maharashtra border
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर तब्बल २९ नक्षलवाद्यांचा खात्मा, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई
police maharashtra
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस कर्मचारी ‘घरगडी’! राज्यभरात तीन हजारांवर पोलीस…
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

(अ) पोलीस शिपाई (गट-क) या पदासाठी – एकूण रिक्त पदे – ९,५९५

(ब) पोलीस शिपाई चालक (गट-क) या पदासाठी – एकूण रिक्त पदे – १६८६

(क) समादेशक राज्य राखीव पोलीस बल ( srpf) सशस्त्र पोलीस शिपाई (गट-क) या पदासाठी – एकूण पदे ४,३४९

वयोमर्यादा – (दि. ३१ मार्च २०२४ रोजी) (अ) पोलीस शिपाई/पोलीस शिपाई बँड्समन/कारागृह शिपाई पदासाठी खुला – १८-२८ वर्षे, मागास प्रवर्ग/ अनाथ – १८-३३ वर्षे, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त – १८-४५ वर्षे, अंशकालीन पदवीधर – १८-५५ वर्षे (माजी सैनिकांवर अवलंबून असलेले (मुलगा, मुलगी, पत्नी) – खुला – १८-३१ वर्षे, मागास प्रवर्ग – १८-३६ वर्षे).

(ब) पोलीस शिपाई चालक पदांसाठी – खुला – १९-२८ वर्षे, मागास प्रवर्ग/अनाथ – १९-३३ वर्षे, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त – १९-४५ वर्षे, अंशकालीन पदवीधर – १९-५५ वर्षे (माजी सैनिकांवर अवलंबून असलेले (मुलगा, मुलगी, पत्नी) – खुला – १९-३१ वर्षे, मागास प्रवर्ग – १९-३६ वर्षे).

(क) SRPF सशस्त्र पोलीस शिपाई – खुला – १८-२५ वर्षे, मागास प्रवर्ग/अनाथ – १८-३० वर्षे, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त – १८-४५ वर्षे, अंशकालीन पदवीधर – १८-५५ वर्षे, (माजी सैनिकांवर अवलंबून असलेले (मुलगा) – खुला – १८-२८ वर्षे, मागास प्रवर्ग – १८-३३ वर्षे).

सर्व पदांसाठी खेळाडू उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट मिळेल.

पात्रता – सर्व पदांसाठी (पोलीस शिपाई बँड्समन पद वगळता) (अ) १२ वी उत्तीर्ण किंवा समतूल्य पात्रता.

(ब) माजी सैनिक – १५ वर्षे. सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा १० वी उत्तीर्ण किंवा IASC ( Indian Army Special Certificate of Education) प्रमाणपत्र.

(क) नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद – शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार जे इ. ७ वी परीक्षा उत्तीर्ण आहेत ते भरतीकरता पात्र ठरतील.

शारीरिक पात्रता – (अ) पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई तसेच पोलीस शिपाई बँड्समन/कारागृह शिपाई पदांसाठी उंची – पुरुष – किमान १६५ सें.मी. महिला – किमान १५५ सें.मी. छाती – पुरुष – ७९-८४ सें.मी.

पोलीस शिपाई बँड्समन पदांसाठी पुरुष व महिला उमेदवारांसाठी उंचीत २.५ सें.मी. ची सूट, तसेच छाती मोजमापात २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून.

(ब) पोलीस शिपाई चालक पदाकरिता – उंची – पुरुष – १६५ सें.मी. महिला – १५८ सें.मी. छाती – पुरुष – ७९-८४ सें.मी.

(क) राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता – उंची – पुरुष – १६८ सें.मी. छाती – ७९-८४ सें.मी.

अन्य अर्हता – (अ) पोलीस शिपाई पदाकरिता ( i) उमेदवाराकडे हलकी वाहने चालविण्याचा परवाना असावा. नसल्यास ट्रेनिंगनंतर २ वर्षांच्या आत तो मिळविणे आवश्यक. ( ii) संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक. ( iii) गडचिरोली जिह्याकरिता पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अतिरिक्त १०० गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी द्यावी लागेल. गडचिरोलीतील रिक्त पदांसाठी फक्त गडचिरोली जिह्यात राहणाऱ्या उमेदवारांनाच अर्ज करता येईल. त्यांनी वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक.

विहीत नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

एन्सीसी ‘क’ प्रमाणपत्रधारक उमेदवार पाच अधिकच्या (बोनस) गुणांसाठी पात्र असतील.

(ब) पोलीस शिपाई चालक पदांसाठी अन्य अर्हता –

( i) उमेदवाराने हलके वाहन ( LMV TR) चालविण्याचा वैध परवाना धारण करणे आवश्यक. (ii) पोलीस शिपाई चालक पदावर रुजू झाल्यापासून ५ वर्षांच्या आत अवजड वाहन ( HMV) चालविण्याचा परवाना मिळविणे आवश्यक. ( iii) नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांच्या आत संगणक अर्हता धारण करणे आवश्यक.

(क) सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी अन्य अर्हता –

( i) नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांच्या आत संगणक अर्हता धारण करणे आवश्यक.

निवड पद्धती – शारीरिक चाचणी –

(१) पोलीस शिपाई/पोलीस शिपाई बँड्समन/कारागृह शिपाई पदाकरिता – ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल.

पुरुष – १,६०० मीटर धावणे २० गुण, १०० मीटर धावणे १५ गुण, गोळाफेक – १५ गुण.

महिला – ८०० मीटर धावणे २० गुण, १०० मीटर धावणे १५ गुण, गोळाफेक – १५ गुण.

(२) पोलीस शिपाई चालक पदाकरिता – ५० गुणांची शारीरिक चाचणी.

पुरुष – १,६०० मीटर धावणे – ३० गुण, गोळाफेक – २० गुण.

महिला – ८०० मीटर धावणे – ३० गुण, गोळाफेक – २० गुण.

(३) सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता – १०० गुणांची शारीरिक चाचणी.

पुरुष – ५ कि.मी. धावणे – ५० गुण, १०० मीटर धावणे – २५ गुण, गोळाफेक – २५ गुण.

पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी – शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी द्यावी लागेल. (अ) हलके मोटर वाहन चालविणे – २५ गुण, (ब) जीप प्रकारातील वाहन चालविणे – २५ गुण.

कौशल्य चाचणी फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

( II) लेखी चाचणी – शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी निवडले जातील. लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.

पोलीस आयुक्त, मुंबई शहर यांच्या घटकावरील भरती प्रक्रिया वगळता सर्व पोलीस घटकांच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल.

पोलीस शिपाई/पोलीस शिपाई बँड्समन/कारागृह शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता लेखी परीक्षेत (१) अंकगणित, (२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, (३) बुद्धिमत्ता चाचणी, (४) मराठी व्याकरण या विषयांचा समावेश असेल.

(२) पोलीस शिपाई चालक पदाकरिता – १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. लेखी चाचणीमध्ये (१) अंकगणित, (२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, (३) बुद्धिमत्ता चाचणी, (४) मराठी व्याकरण, (५) मोटार वाहन चालविणे/ वाहतुकीचे नियम यांचा समावेश असेल. कालावधी ९० मिनिटे.

शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे कागदपत्र पडताळणीच्या अधिन राहून तात्पुरती गुणवत्ता यादी बनविली जाईल. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांचाच अंतिम निवड सूची/प्रतीक्षा सूचीमध्ये समावेश करण्यात येईल.

परीक्षा शुल्क – प्रत्येक पदासाठी खुला प्रवर्ग रु. ४५०/-, मागास प्रवर्ग रु. ३५०/-.

अर्ज ऑनलाइन भरण्याकरिता आवश्यक माहिती policerecruitment2024 mahait. org व www. mahapolice. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकत नाही. (१) पोलीस शिपाई, (२) पोलीस शिपाई चालक, (३) बँड्समन, (४) राज्य राखीव बलातील सशस्त्र पोलीस शिपाई, (५) कारागृह शिपाई अशा एकूण ५ पदांकरिता प्रत्येक पदाकरिता १ याप्रमाणे उमेदवार ५ स्वतंत्र अर्ज करू शकतात.

उमेदवारांनी संकेतस्थळावर जावून अर्ज सादर करताना त्या घटकात रिक्त असलेल्या पदांचा विचार करावा. प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल.

ऑनलाइन अर्ज policerecruitment2024 mahait. org या संकेतस्थळावर दि. १५ एप्रिल २०२४ (२४.०० वाजे)पर्यंत करावेत.