राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (RCF) (भारत सरकारचा उपक्रम). आपल्या ट्रॉम्बे, मुंबईमधील ऑपरेटींग युनिटमध्ये अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत एकूण १६५ ग्रॅज्युएट/ टेक्निशियन/ ट्रेड अॅप्रेंटिसेस ट्रेनी पदांची भरती.

(ए) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस पदे – एकूण ३१ पदे. अॅप्रेंटिसशिप कालावधी १२ महिने. स्टायपेंड दरमहा रु. ९,०००/-.

(१) सेक्रेटरिअल असिस्टंट३१ पदे.

पात्रता : (कोणतीही शाखा) पदवी उत्तीर्ण. (इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक) प्रशिक्षण कालावधी १२ महिने.

(बी) टेक्निशियन अॅप्रेंटिसेस एकूण ५४ पदे. प्रशिक्षण कालावधी १ वर्ष. स्टायपेंड दरमहा रु. ८,०००/-.

(१) डिप्लोमा केमिकल १४ पदे.

(२) डिप्लोमा कॉम्प्युटर २ पदे.

(३) डिप्लोमा इलेक्ट्रिकल १० पदे.

(४) डिप्लोमा इन्स्ट्रूमेंटेशन १० पदे.

(५) डिप्लोमा मेकॅनिकल १८ पदे.

पात्रता : पद क्र. (बी) १ ते ५ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदविका उत्तीर्ण.

(सी) ट्रेड अॅप्रेंटिसेस एकूण ८० पदे. स्टायपेंड दरमहा रु. ७,०००/-.

(१) अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट (AOCP) ६३ पदे. प्रशिक्षण कालावधी १ वर्ष.

पात्रता : (दि. १ एप्रिल २०२४ रोजी) B. Sc. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स (केमिस्ट्री मुख्य विषयांसह उत्तीर्ण).

(२) इलेक्ट्रिशियन ३ पदे. पात्रता : १२ वी (विज्ञान विषयासह) उत्तीर्ण.

(३) हॉर्टिकल्चर असिस्टंट ६ पदे. पात्रता : १२ वी उत्तीर्ण. पद क्र. २ व ३ साठी प्रशिक्षण कालावधी २ वर्ष.

(४) इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) १ पद. प्रशिक्षण कालावधी १२ महिने. पात्रता – B. Sc. (PCM) (फिजिक्स मुख्य विषयासह).

(५) लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट) ८ पदे. प्रशिक्षण कालावधी १२ महिने. पात्रता B.Sc. (PCM or B) उत्तीर्ण. सर्व पदांसाठी पात्रता परीक्षा किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अंतिम वर्षाच्या गुणांची टक्केवारी किंवा शेवटच्या दोन सेमिस्टर्सच्या गुणांची टक्केवारी) (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना किमान ४५ टक्के गुण आवश्यक) कॅटेगरी निहाय रिक्त पदांचा तपशील एकूण १६५ पदे (अजा ३३, अज २६, इमाव १८, ईडब्ल्यूएस ३२, खुला ५६) सर्व पदांसाठी पात्रता परीक्षा दि. १ जुलै २०२१ किंवा त्यानंतर उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा : (दि. १ जुलै २०२४ रोजी) सर्व पदांसाठी १८ ते २५ वर्षे. (वयोमर्यादेत सूट इमाव ३ वर्षे, अजा/ अज ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

निवड पद्धती पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी बनविली. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. कागदपत्रांच्या पडताळणीतून योग्य ठरलेल्या उमेदवारांना अॅप्रेंटिस ट्रेनी पदावर नेमणूक दिली जाईल, त्यांना १ आठवड्याचा कालावधी जॉईन करण्यासाठी देण्यात येईल. दिलेल्या वेळेच्या पूर्वी निवडलेले उमेदवार जॉईन झाले नाहीत तर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. निवडलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी बनविली जाईल. CGPA/ CPI किंवा इतर ग्रेड्सचे परसेंटेजमध्ये रूपांतर करण्याचे संबंधित युनिव्हर्सिटी/ इन्स्टिट्यूशनकडील सर्टिफिकेट रिपोर्टंगच्यावेळी सादर करणे आवश्यक.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ट्रेड अॅप्रेंटिसेस पदांसाठी https:// apprenticeshipindia. gov. in; टेक्निशिअन अॅप्रेंटिसेस/ ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस पदांसाठी www. nats. education. gov. in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक ऑनलाइन अर्ज www. rcfitd. com या संकेतस्थळावर दि. १९ जुलै २०२४ (संध्या. ५.०० वाजे) पर्यंत करावेत. अर्जासोबत (फोटोग्राफ व सही वगळता) इतर कोणतेही कागदपत्र अपलोड करावयाची नाहीत. शंकासमाधानासाठी apprentice2023 @rcfltd. com या ई-मेलवर संपर्क साधा.