डॉ. मिलिंद आपटे
१) मला १० वीला ८५% गुण मिळाले (२०२२). पुढे आयटीआय (ट्रेड – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) ८५.५% गुणांसह पूर्ण केले (२०२४). सध्या मी टाटा मोटर्स (पुणे) मध्ये १ वर्षाची ॲप्रेंटिसशीप करत आहे. सोबतच मी APCOER, Pune येथे बी.व्होक ला प्रवेश घेतला आहे. हा स्किल बेस्ड डिग्री कोर्स (कालावधी – ३ वर्षे)असल्यामुळे मी याची निवड केली, परंतु या कोर्सचा भविष्यात नेमका काय स्कोप आहे? तसेच ग्रॅज्युएशन नंतर पुढील शिक्षणाचे कोणते पर्याय आहेत ? सरकारी तसेच खासगी क्षेत्रात कोणकोणत्या संधी आहेत, याविषयी कृपया मार्गदर्शन करावे.- राजवर्धन तायडे, पुणे

– खरे तर हे प्रश्न तुम्ही APCOER येथे विचारले असते तर जास्त बरे झाले असते. असो. वरील बी.व्होक हा यूजीसी मान्यताप्रत पदवी कोर्स आहे. त्यामुळे पुढील सर्व शिक्षणा साठी उपयुक्त आहे म्हणजेच GATE वगैरे परीक्षा देवून पीजी करू शकतोस, तसेच हा कौशल्य आधारित कोर्स असल्याने उत्पादन क्षेत्रात संधी मिळतील. सरकारी क्षेत्रातील सर्व संधी आहेतच, यूजीसीची मान्यता असलेली पदवी असल्याने तिथे अडचण नाही, तसेच APCOER, Pune सुद्धा ७ लेवल पूर्ण झाल्यावर संधी उपलब्धा करून देतात असे दिसतेय. त्यामुळे उत्तमरित्या हा कोर्स पूर्ण कर. खूप शुभेच्छा.

२) सर मी आता एफवायबीएला आहे आणि मला पदवीनंतर मला यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे. मी जनरल कॅटेगरी मधला, मराठी माध्यमातील विद्यार्थी आहे. मला आता महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापासून काय करायला हवे? यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मार्गदर्शन कराल का? – राहुल सिंग

– अभ्यासक्रम समजून घे. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या यूपीएससी अभ्यासक्रमाशी परिचित होणे हे गरजेचे आहे. यामुळे कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित करायचे हे कळेल आणि व्यर्थ बाबींवर वेळ वाया घालवण्याचे टाळता येईल. इतिहास, भूगोल, राजकारण, अर्थव्यवस्था, पर्यावरण, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी यासह प्रत्येक विषयासाठी मानक पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके आणि यूपीएससी अभ्यास साहित्य गोळा कर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दररोज एक विश्वासार्ह वर्तमानपत्र वाचण्यास सुरुवात कर आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी मासिक चालू घडामोडी मासिके वाच. सुरुवातीस फक्त बातम्या वाचा संपादकीय वाचणे टाळ, भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया तयार करण्यासाठी मूलभूत पुस्तकांपासून सुरुवात कर. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र यासारख्या विषयांसाठी एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके (सहावी ते बारावी) वाचावीत, कारण ती एक भक्कम पाया प्रदान करतात.

ऑप्शन कोणता निवडावा याचे उत्तर म्हणजे वरील वाचन बऱ्यापैकी झाल्यावर तुलाच त्यातील एक विषय निवडताना मदत होईल कारण हे विषय आवडीवर अवलंबून आहे ४८ विषयांमधून तुला निवडायचे आहे, पण कोणत्या ऑप्शन विषया मधील यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे याचा विचार करावास. परीक्षा मराठीतून देता येते. शुभेच्छा